मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पंधरावा|प्रसंग सोळावा| प्रसंग समाप्ति प्रसंग सोळावा प्रशस्ती बद्धमुक्त मुक्तबद्ध देवता-मुखवटे सर्वांस गुरुकृपेनेंच उद्धार वेषधारी गुरु मुसलमान ईश्र्वर जन्मकुळगोत पहात नाहीं अधर्मांतून मुक्तता अष्टधा प्रकृति प्रसंग समाप्ति प्रसंग महिमा प्रसंग सोळावा - प्रसंग समाप्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग समाप्ति Translation - भाषांतर कोठें गेला असेल संस्कार । या वेगळा भेदाचाहि विचार । तें शुद्ध करूनियां घ्यावें अक्षर । आपला म्हणउनी ॥९७॥हा ग्रंथ करून सद्गुरूनें । शेख महंमद वाढविला भूषणें । ऐसें आदिपुरुषाचें महिमानें । न कळेचि ईश्र्वरा ॥९८॥प्रसंग सोळावा जाला पूर्णत्वें । सत्रावा आरंभिला ग्रासून जिवशिव नावें । शिवत्वहि ग्रासिलें सद्भावें । सोऽहं तत्त्वबोधासंगें ॥९९॥वैराग्य बोधाचीहि जाली शांति । निज शोधा सद्गुरूची संगती । वैकुंठ मुक्तीची ही विपत्ती । दृश्य अदृश्य नाहीं ॥१००॥जैसें हुताशनाचे ज्वाळ । वोणवा लागलया दिसती प्रबळ । येर्हवीं तें असती अचळ । गारे काष्टापोटीं ॥१०१॥दंभें वाची गतल्याची कथनीं । शूरत्व आचरोनि दाखवित ना कोणी । विरक्त आत्मज्ञानी ये मेदिनीं । थोडे असती ॥१०२॥सद्गुरूची पाउलें धरूनी शिरीं । संग्रामास पातलों अंतरीं । तें ऐकावें शूर नरीं । शेख महंमद वदती ॥१०३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP