प्रसंग सोळावा - ईश्र्वर जन्मकुळगोत पहात नाहीं

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


अविंध यातीस निपजलों । कुराण पुराण बोलो लागलो । वल्‍ली साधुसिद्धांस मानलों । स्‍वहितपरहितागुणें ॥६६॥
ज्‍याला नवजिता ईश्र्वर । त्‍याचा शोधूं नये कुळाचार । पहा दुर्गंधा केली सुंदर । व्यास निपजले तेथें ॥६७॥
दुर्गंधी होती ते सुगंधा नांव पावली । कुशीस उपजोन व्यासें कीर्ति केली । ते सिंदळकी न पाहिजे म्‍हणीतली । ईश्र्वरलीलाच ऐसी ॥६८॥
हनुमंत पहा यातीचा वानर । त्‍यास गुज बोले तो रामचंद्र । संपल्‍या देहाचा अवतार । द्वापारीं भेट दिधली ॥६९॥
रामाचे गुरु वशिष्‍ठ ॠषि । त्‍याला प्रसवली उर्वशी । गर्गाचार्य गंधर्वीचे कुशीं । ते कृष्‍णाचे गुरु ॥७०॥
गाईचें पोटीं गौतम ॠषि । मार्कंडेय जाले मार्कंडीसी । साठ पुत्र जाले नारदासी । स्त्रिकल्‍पें स्त्री जाला ॥७१॥
हरिणीचे पोटीं शृंगॠषि । दहा अवतार घेणें त्‍यासी । गर्भदुःखें भोगी अंबॠषि । म्‍हणोनि करुणा केली ॥७२॥
सांगतां अठ्यांशी सहस्रांच्या कुळ्या । म्‍हणती येणें केल्‍या रांडोळ्या । श्रोतेजन ऐकती ना सोंवळ्या । भावें हा निज ग्रंथ ॥७३॥
साधुसंतांच्या याती उमगिती । यालागीं दृष्‍टांत मांडिले संतीं । पार्‍हेरा न दिल्‍या कोप न धरिती । श्रोते संत योगी ॥७४॥
श्रोत्‍याला वक्ता विनवी भावें । न्यून ठायीं पूर्ण करावें । मज वेगळेपण न सांडावें । नेणतां स्‍वयें  दास तुमचा ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP