मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पंधरावा|प्रसंग सोळावा| वेषधारी गुरु प्रसंग सोळावा प्रशस्ती बद्धमुक्त मुक्तबद्ध देवता-मुखवटे सर्वांस गुरुकृपेनेंच उद्धार वेषधारी गुरु मुसलमान ईश्र्वर जन्मकुळगोत पहात नाहीं अधर्मांतून मुक्तता अष्टधा प्रकृति प्रसंग समाप्ति प्रसंग महिमा प्रसंग सोळावा - वेषधारी गुरु श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत वेषधारी गुरु मात्र बुडतात व बुडवतात Translation - भाषांतर परी सद्गुरु पाहिजे लाधला । वेषधार्यानें मुलुख बुडविला । त्यांनीं दांभिक बडिवार केला । कपट शिकोनियां ॥५६॥मुसलमानांत होऊनियां पिरु । मराठियांत म्हणवी सद्गुरु । तोचि तारील भवसागरु । येर बुडोन बुडविती ॥५७॥निज गुरुसंगें तरले अपार । सांगतां वाढेल विस्तार । अळुमाळ निरोपिले चतुर । श्रोत्यां प्रश्र्निकां ॥५८॥हे साक्ष ऐका महापुराण । यावेगळे बोलती साधु सज्जन । तरीं हें ना ऐकती अज्ञान । निःशंक भूतें पुजिती ॥५९॥जो जड देह धरुनि जाला पाषाण । तो केंवि तारील भक्तांलागुन । जरी टाळेवर घातला उचलोन । तरी अशुद्ध सांडेल ॥६०॥पहा हे सोनें रुपें सिदोरी । त्यांची हे मूर्ख दैवतें भूतें करी । त्यापुढें जिते जिवांस मारी । नवस करूनियां ॥६१॥एक म्हणती हा यातीचा मलवंश । म्हणोनि निखंदितो आमुच्या देवतांस । याचा मानूं ना आम्ही विश्र्वास । प्रतिभा निखंदिल्या ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP