प्रसंग सोळावा - प्रशस्‍ती

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ॐ नमो बारा राशी पंधरा तिथी । साता वारांची सौभाग्‍य पंथी । लवणमिसें निशिदिन कथी । सार असार निवडी ॥१॥
मातेच्या दुधें अनुसंधानें बाळ । भुकेलें होय तेव्हां करी तळमळ । एरवीं नाठवी मांडी खेळ । तैसा जना विषय ॥२॥
सर्व जीव उदकापासुनी । उदकाला आठवीत ना कोणी । तृषा लागल्‍या धा मोकलुनी । स्‍मरण करिताती ॥३॥
जागतां निद्रेचा हेत नाहीं । निद्रा आलिया जागृति लोपली पाही । तैसी या जनास सोय नाहीं । ईश्र्वरभजनाची ॥४॥
मन इंद्रियें चळल्‍या उपरी । कामविषयाचा घोक करी । येरव्ही म्‍हणती ब्रह्मचारी । सैताडपणें ॥५॥
डेरा भरोनि क्षीर प्यालें । मिश्रित धृताच्या आभारा नाहीं आलें । तदन्यायें या जनास जालें । ईश्र्वराधाराविण ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP