मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| अभंग २६ ते ३० उपदेश अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० उपदेश - अभंग २६ ते ३० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग २६ ते ३० Translation - भाषांतर २६. नाना व्रत तप दान । मुखीं हरी स्मरण ॥१॥येथें असों द्यावा भाव । पुरवी अंतरींचें देव ॥२॥हाचि विश्वास धरुनी । कृपा करील चक्रपाणी ॥३॥भक्तिभाव ज्याचा पुरा । त्यासी धांवतो सामोरा ॥४॥लक्ष लावा पायांपाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥२७. शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥१॥गजमाथां मोतीं सर्पाचा तो मान । गेलियाही प्राण हातां नये ॥२॥सिंहाचें तें नख पतिव्रतेचें स्तन । गेलियाही प्राण हातां नये ॥३॥विराल्यावांचून देह अहंभाव । जनी म्हणे देव हातां नये ॥४॥२८. संसारीं निधान लाधलें जनां । सद्गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥कायावाचामनें तयास देवात्रीं । वस्तु माणून ध्यावी अगोचर ॥२॥तें गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण । एर्हवी तें आपणा माजी आहे ॥३॥असतां सम्यक परि जना चुकामुक । भुललीं निष्टंक मंत्रतंत्रें ॥४॥माळ वेष्टण करीं टापोर घेती शिरीं । नेम अष्टोत्तरीं करिताती ॥५॥जो माळ करविता वाचेसि वदविता । तया ह्रदयस्था नेणे कोणी ॥६॥सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट । सद्रुरु वरिष्ठ तोचि जाणा ॥७॥तया उत्तीर्णता व्हावया पदार्था । न देखों सर्वथा जनी म्हणे ॥८॥२९. कीर्तनासी जातां मार्गीं टाकी पाय । अमर देह होय कळे त्यासी ॥१॥आखेद तरी तेथें घडे हिंसा । जन्मवेद भाषा वेदापाशीं ॥२॥गंगा वाराणसी धरोनि पदरीं । चाललीसे नारी दोहींकडे ॥३॥आमच्या बापाची ऐकावया कीर्ति । जाऊं म्हणोन घेती ऐक्य कधीं ॥४॥कीर्तनासी जावें कैसें कोणेपरी । असूं द्या अंतरीं गोष्ट हित ॥५॥वर्हाडी धांवे जैसा प्रयोजनीं । तान्हेलें तें पाणी पुसावया ॥६॥व्याकुळ तें एक चुकलें बाळक । त्या धांवे शोकें हांका मारी ॥७॥अशी कथे जातां गंगा त्या चरणीं । म्हणे दासी जनी भाक मानी ॥८॥३०. कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्ही ॥१॥वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ॥२॥मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती । जनी म्हणे किती सांगूं फार ॥३॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP