मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| अभंग ६ ते १० उपदेश अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० उपदेश - अभंग ६ ते १० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग ६ ते १० Translation - भाषांतर ६. भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥काय तिनें तपमुद्रा धरियेली । म्हणोनियां झाली भृंगीं अंगें ॥२॥अरे बा शहाणिया तैसा करीं जप । संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥४॥७. जहज तारिलें तारिलें । शेवटीं उगमासी आलें ॥१॥भाव शिडासी लाविला । नाम फरारा सोडिला ॥२॥कथा भरियेलें कोणें । घ्यारे नका दैन्यवाणें ॥३॥एका मनाचा विसार । आधीं देउनी निर्धार ॥४॥कोण देतो फुकासाठीं । आर्तभूत व्हावें पोटीं ॥५॥आर्तभूत व्हारे । जनी म्हणे केणें घ्यारे ॥६॥८. हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान ॥१॥येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रम्हादिक ॥२॥वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती ॥३॥९. चोरा संगतीनें गेला । वाटे जातां नागवला ॥१॥तैसी सांडोनियां भक्ती । धरी विषयाची संगती ॥२॥अग्निसवें खेळे । न जळे तो परी पोळे ॥३॥विश्वासला चोरा । जनी म्हणे घाला बरा ॥४॥१०. जगीं विठ्ठल रुक्मिणी । तुम्ही अखंड स्मरा ध्यानी ॥१॥मग तुज काय उणें । झालें सोयरे त्रिभुवनें ॥२॥साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ॥३॥मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP