मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा| अभंग १ ते ५ संतांच्या स्मृतीत चोखामेळा संत नामदेवांच्या स्मृतीत चोखामेळा चोखोबांच्या स्त्रीचे बाळंतपण चोखामेळा यांच्या समाधीचे अभंग संत नरहरी सोनार यांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १३ संताजी जगनाडे यांच्या स्मृतीत चोखामेळा महिपतीबुवा यांच्या स्मृतीत चोखामेळा गुंडा महाराज यांच्या स्मृतीत चोखामेळा हरिहर महाराज यांच्या स्मृतीत चोखामेळा स्वामी स्वरूपानंद यांच्या स्मृतीत चोखामेळा संत दासगणू यांच्या स्मृतीत चोखामेळा अनामी यांच्या स्मृतीत चोखामेळा स्तुतिपर अभंग - अभंग १ ते ५ श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा अभंग १ ते ५ Translation - भाषांतर १) चांभार सब कुच जाणे । कटोर गंगा देख ॥२५॥सेना नानक पूजा करितां । देवनें धोकटी लिया देख ॥२६॥चोखोबानें देव वतलाया । शिवाय पकडी देख ॥२७॥ऐसें नानक बहुत हुवे । अंत न लगे देख ॥२८॥ऐसें नानक नाम जपके । वैकुंठ जावें देख ॥२९॥कासी गया प्रयाग गया । कर्वत लिया देख ॥३०॥मथुरा गया द्वारका गया । छापा लिया देख ॥३१॥उसका नाम लेवे नहीं तो । दोष लागे देख ॥३२॥उसका नाम जपके । वैकुंठ चढे देख ॥३३॥एकनाथ तो एकही जाने । एका जनार्दनीं देख ॥३४॥२) भोळा देव भोळा देव । उंच नीच नेणें भाव ॥१॥चोखियाच्या मागें धांवे । शेले कबिराचे विणावे ॥२॥ खुरपूं लागे सांवत्यासी । उणे येवो नेदी कोणीसी ॥३॥विष पिणें धाउनी जाणें । भाविकाची भाजी खाणें ॥४॥कण्याची तो आवडी मोठी । एकाजनार्दनी लाळ घोटी ॥५॥३) ज्ञानराजासाठी स्वयें भिंत वोढी । विसरूनी प्रौढी थोरपण ॥१॥तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । कट धरूनी करी तिष्ठतसें ॥२॥नामदेवासाठीं जेवी दहींभात । न पाहे उचित आन दुजें ॥३॥गोरियाचे घरी स्वयें मडकीं घडी । चोखियाची वोढी गुरेंढोरे ॥४॥सांवत्या माळ्यासी खुरपूं लागे अंगें । कबीराचे मागे शेले विणी ॥५॥रोहिदासासवें चर्म रंगूं लागे । सजन कसायाचे अंगें मांस विकी ॥६॥नरहरी सोनारा घडू फुंकूं लागे । दामाजीचा वेगें पाडीवार ॥७॥जनाबाई साठी वेचितसे शेणी । एका जनार्दनी धन्य महिमा ॥८॥४) खुर्पू लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥१॥घडी मडके कुंभाराचे । चोख्यामेळ्याचीं ढोरें वोढी ॥२॥सजन कसायाचे विकी मांस । दामाजीचा दास स्वये होय़ ॥३॥एका जनार्दनी जनीसंगे । दळूं कांडू लागे आपण ॥४॥५) नामपाठे तरला चोखा तो महार । भावें सर्वेश्वर स्थापी तया ॥१॥नामपाठ करूनि किर्ती केली जगीं । उपमा ते अंगी वाढविली ॥२॥जनार्दनाचा एक वर्णितो संतांसी । नित्य नामपाठासी अनुसरला ॥३॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP