मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| शुक्रवार निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - शुक्रवार समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ शुक्रवार Translation - भाषांतर ॥ अभंग ॥ कांहो राममाये दुरि धरियेलें । कठीण कैसें झालें चित्त तूझें ॥१॥देऊनि आलिंगन प्रीतिपडीभरें । मुख पीतांबरें पुसशील ॥२॥घेऊनि कडिये धरुनि हनुवटी । कईं गुजगोष्टी सांगसील ॥३॥रामदास म्हणे केव्हां संबोखिसी । प्रेमपान्हा देशी जननिये ॥४॥॥ भजन ॥ येईं धांवत रामाबाई । दासासी दर्शन देंई ॥॥ पद ॥ येंई हो रामाबाई । माझे येईं हो रामाबाई ॥धृ०॥ अनंतरूपें व्यापें दानव-दर्पे पूर्णप्रतापें । तव नामें कळिकाळ कांपे ॥१॥तुझा छंद लागलागे माये निशिदिनिं या जीवासी । तुजविण मी परदेशी ॥२॥रामीं रामदासीं आराम करणें हेंचि तुला उचित । झणीं उपेक्षिसी काय आतां उरला माझा अंत ॥३॥॥ पदो । लो लो लागला लो । आदिशक्तीचा लागला लो । अंतरिं लो बहिर लो । जिकडे तिकडे लागला लो ॥१॥अंडज लो जारज लो । स्वेदज लो उद्भिज लो । देवा लो दानवा लो । सिद्ध साधका लागला लो ॥२॥दास म्हणे तोचि जाणे । सद्रुरुवचनीं सुख बाणे ॥३॥॥ आरती व्यंकटेशाची ॥ अवहरणी पुष्करणी अगणित गुणखाणी । अगाध महिमा स्तवितां न बोलवे वाणी । अखंद तीर्थावळी अचपळ सुखदानी । अभिनव रचना पाहतां तन्मयता नयनीं ॥ जयदेव जयदेव जय व्यंकटेशा । आरती ओवांळू स्वामी जगदीशा ॥ जय० ॥१॥अति कुसुमालय देवालय आलय मोक्षाचें । नानानाटकरचना हाटकवर्णाचें । थक्कित मानस पहातां स्थळ भगवंताचें । तुळणा नाहीं तें हें भूवैकुंठ साचें ॥ जय० ॥२॥ दिव्यां-बरधर सुंदरतनु कोमल नीला । नाना रत्नें नाना सुमनांच्या माळा । नानाभूषणमंडित वामांगीं बाळा । नाना वाद्यें मिनला दासांचा मेळा ॥ जय० ॥३॥॥ आरती कृष्णेची ॥ सुखसरिते गुणभरिते दुरितें नीवारी । नि:संगा भवभंगा चिदू-गंगा तारी । श्रीकृष्णे अवतार जलवेषधारी । जलमय देहें निर्मल साक्षात हरी ॥ जयदेवी जयदेवी जय माये कृष्णे । आलों तुझिया उदरा निरसी मम तृष्णे ॥ जय० ॥१॥हरिहर सुंदर ओघ ऐक्याची आले । प्रेमानंदें बोधें मिळणी मीळाले । ऐशिया संगमीं मिसळोनि गेले । रामदास त्यांचीं वंदी पाऊलें ॥ जय० ॥२॥ ॥१५॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP