मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| गुरुवार निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - गुरुवार समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ गुरुवार Translation - भाषांतर ॥ अभंग ॥ आदिनारायण सद्नुरु आमुचा । शिष्य झाला त्याचा महाविष्णू ॥१॥तयाचा जो शिष्य तो जाणावा हंस । तेणें ब्रह्मयास उपदेशिलें ॥२॥ब्रह्मदेवें केला उपदेश वसिष्ठा । तेथें धरा निष्ठा शुद्ध भावो ॥३॥वसिष्ठ उपदेशी श्रीरामरायासी । रामें रामदासीं उपदेशिलें ॥४॥॥ अभंग ॥ उपदेश देवोनि दिधला मारुती । स्वयें रघुपती नीरवीता ॥१॥निरवितां तेणें झालों रामदास । संसारीं उदास म्हणोनियां ॥२॥म्हणोनी आमुचे कुळीं कुळदैवत । राम हनूमंत आत्मरूपीं ॥३॥आत्मरूपीं झाला रामीं रामदास । केला उपदेश दीनोद्धारा ॥४॥॥ अभंग ॥ भाविका भजना गुरुपरंपरा । सदा जप करा राममंत्र ॥१॥राममंत्र जाणा त्रयोदशाक्षरी । सर्व वेदशास्त्रीं प्रगटचि ॥२॥प्रगटचि राममंत्र हा प्रसिद्ध । तारीतसे बद्ध जडजीवां ॥३॥जडजीवा तारी सकळ चराचरीं । देह काशीपुरीं येणें मंत्रें ॥४॥येणें मंत्रें जाणा बद्ध तो मुमुक्षु । साधक प्रसिद्धु सिद्ध होय ॥५॥सिद्ध होय रामतारक जपतां । मुक्ति सायुज्यता रामदासीं ॥६॥॥ भजन ॥ नारायण विधि वसिष्ठ राम रामदासकल्याण धाम ॥॥ पद ॥ श्रीगुरुचें चरणपंकज हदयीं स्मरावें ॥ध्रु०॥ निगम निखिल साधारण सुलभा-हूनी सुलभ बहू । इतर योग याग विषम पंथिं कां शिरावें ॥१॥नरतनुदृढनावेसी बुडवूनि अति मूढपणें । दुष्ट नष्ट कुकर सूकर तनु कां फिरावें ॥२॥रामदास विनवी तुज अझुनि तरी समज उमज । विषवीष पेउनिनां फुकट कां मरावें । श्रीगुरु० ॥३॥ ॥१७॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP