मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| नवविधाभक्तीचे अभंग निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - नवविधाभक्तीचे अभंग समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ नवविधाभक्तीचे अभंग Translation - भाषांतर ॥ श्रवणपर अभंग ॥ ॥ रामनाम कथा गंगा । श्रवणें पावन करी जगा ॥१॥तिशीं प्रेमपूर आला । शंकरह्लदयीं समावला ॥२॥रामदासाची माउली । आळशावरीं गंगा आली ॥३॥॥ कीर्तनपर अभंग ॥ ॥ धन्य धन्य तें नगर । जेथें कथा निरंतर ॥१॥गुण गाती भगवंताचे । तेचि मानावे दैवाचे ॥२॥स्वयें बोले जगजीवन । थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥रामदास म्हणे भले । हरिभक्तीं उद्धरिले ॥४॥॥ स्मरणपर अभंग ॥ ॥ रात्रंदिवस मन राघवीं असावें । चिंतन नसावें कामचनाचें ॥१॥कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन । जन्मासी कारण हींचि दोन्ही ॥२॥दोन्ही नको धरूं नको निंदा करूं । तेणें हा संसारू तरसील ॥३॥तरसील भवसागरीं बुडतां । सत्य या अनंताचेची नामें ॥४॥नामरूपातीत जाणावा अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥५॥॥ अर्चनपर अभंग ॥ ॥ पूजा देवाची प्रतिमा । त्याची नकळे महिमा ॥१॥देव भक्तांचा विश्राम । त्यासि नेणे तो अधम ॥२॥नाना स्थानें भूमंडळीं । कोणिं सांगांवी आगळीं ॥३॥ज्याचे चरणींचे ऊदकें । धन्य होती विश्वलोकें ॥४॥याचीं चरितें ऐकतां । जनीं होय सार्थकता ॥५॥रामीं रामदास म्हणे । धन्य होईजे स्मरणें ॥६॥॥ वंदनपर अभंग ॥ ॥ प्रेमाचिया सन्निधानें । देव आले साभिमानें ॥१॥आतां आनंद आनंद । देवभक्तां नाही भेद ॥२॥मुख्य पूजापरंपरा । केला दासासि अधिकारा ॥३॥दास पाउल वंदितो । पदासन्निध रहातो ॥४॥॥ दास्यपर अभंग ॥ ॥ रामदास्य आणि हें वायां जाईल । ऐसें न घडेल कदाकाळीं ॥१॥कदाकाळीं रामदासा उपेक्षीना । रामउपासना ऐशी आहे ॥२॥ऐशी आहे सार राघोबाची भक्ति । विभक्तीची शक्ति जेथें नाहीं ॥३॥जेथें नाहीं कांहीं वाउगें मायिक । रामउपासक दास म्हणे ॥४॥॥ सख्यपर अभंग ॥ ॥ देव असतां पाठीराखा । त्रेलोक्याचा कोण सखा ॥१॥नाना उद्योग वाढती । नाना चिंता उद्भवती ॥२॥स्वस्थ वाटेना अंतरीं । नाना व्यवधान करी ॥३॥रामदास म्हणे भावें । भजन देवाचें करावें ॥४॥॥ आत्मनिवेदनपर अभंग ॥ ॥ आत्मनिवेदन नववें भजन । जेणें संतजन समा-धा धी ॥१॥समाधानी संत आत्मनिवेदन । ज्ञानें मीतूंपण सांडवलें ॥२॥ सांडवलें सर्व मायिका संगासी । रामीं रामदासीं नि:संगता ॥३॥नि:संगता झाली विवेकानें केली । मुक्तिहि लाधली सायुज्यता ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP