मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| कौल निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - कौल समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ कौल Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥ दिली भेटि भर्तासि उत्साह गाजे । रघूराज राज्याभिषेकीं विराजे । पहाया सुखें लोक भूपाळ आले । रघूराज आज्ञें महीपाळ गेले ॥१॥नमस्कार केला सुरेंद्रें महेन्द्रा । प्रभूनें अनुज्ञा दिली देव इंद्रा । पुजामान पावूनी संतुष्ट झाले । सवें देव तेतीस कोटी मिळाले ॥२॥तया रावणाचे भयें लोक गेले । सुवर्णाचळाचे दरीं वास केले । पथीं देखिलें दैन्यवाणें प्रजाशीं । उभा राहिला इंद्र सांगे तयांशीं ॥३॥प्रजाही पळाल्या जयाच्या भयानें । तया रावणा मारिलें राघवानें । सुरांच्या बळें फोडिल्या बंदिशाळा । गुढी रामराज्यीं जना सौखबेळां ॥४॥पटीं बैसला राम कल्याणराजा । दुराही फिरे रे गरीबा नवाजा । अरे लोकही जाहली एक छत्री । रघूराज राजा विराजे धरित्रीं ॥५॥जनाची पिडा पाप संता प गेला । प्रभूराम हा भाग्यसूर्यो उदेला । खडाणा* गऊ जाहल्या कामधेनू । वनीं वेलि कल्पतरू काय वानूं ॥६॥खडे सर्व चिंतामणी तेचि गोटे । मला देखतां थोर आश्चर्य वाटे । प्रजा हो तुम्हीं शीघ्र आतांचि जावें । समस्तांसि कल्याण राजा पहावें ॥७॥तुम्हीं भोगिले कष्ट आरण्यवासीं । तयासीं फळें प्राप्त झालीं त्वरेशीं । अपेक्षेहुनी आगळें सर्व जें जें । सुखें रामराजीं जना सामरा जें ॥८॥महोत्साह उत्साह पाहोनि आलों । अयोध्यापुराहूनि आतां निघालों । समस्तां जनां थोर आनंद झाला । सुरीं मानवीं जयजयोकार केला ॥९॥अरे लोक क्लेश सांडूनि द्यारे । रघूराजपादांबुजीं जा पहारे । स्थळा आपुल्या इंद्र सांगोनि गेला । गुरे वासुरें लोक सैरा निघाला ॥१०॥प्रजा कष्टल्या चालिल्या शीण सांगो । अयोध्याधिशा राघवा कौल मागों । गुरें वासरें लेंकरें गर्द झाला । अयोध्यासमीपे बहू लोक आला ॥११॥रघूनाथजी सांगती दूतवार्ता । प्रजालोक बाहेर आले समर्था । रघूनायकें सर्वही आणवीले । सभामंडपीं ते असंभाव्य नेले ॥१२॥प्रभू देखिल जय्जयोकार केला । नमस्कार साष्टांग घालूं निघाला । कृपासागरें पाहिलें त्या प्रजांशीं । उठारे उठा राम बोले तयांशीं ॥१३॥रघूराज सिंहासनीं सौख्यदाता । प्रजा कौल मागावया त्या उदीता । प्रभू बोलिला रे अपेक्षीत मागा । नका हेत ठेवूं समस्तांसि सांगा ॥१४॥बहू कष्टलों पावलों जी स्वदेशा । प्रजा बोलती कौल दे राघवेशा । भुमीनें कदा पीक सांडूं नयेरे । वदे राम लक्षूमणा हें लिहीं रें ॥१५॥मनासारिखी मेघवृष्टी न व्हावी । जया पाहिजे ते प्रसंगीं पडावी । समर्था प्रभू रोगराई नको रे । वदे राम लक्षूमणा हें लिहीं रें ॥१६॥पिके देखतां सर्व चिंता निवाली । असावीं गृहीं संग्रहीं पेंव पालीं । बिजें बीज कोणाशिं मागूं नये रे । वदे राम लक्ष्० ॥१७॥मनाची अपेक्षा गुरें बौल गाडे । घरीं दूभती कामधेनूच पाडे । रघूनाथजी भाग्य येथेष्ट देरे । वदे राम लक्ष० ॥१८॥मनासारिखीं पुत्रकन्याकलत्रें । अभीवृद्धि वाढो पवित्रें । सखीं पारखीं सोयरीं प्रीति देरे । वदे राम लक्ष्० ॥१९॥कुरूपी विरूपी कदांही नसावें । नको वृद्ध काया तरूणी असावें । दिनानाथजी सर्व सौख्यास देरे । वदे राम लक्ष्० ॥२०॥नको दु:ख आम्हां नको शोक आम्हां । तुझें राज्य तों मृत्यु नकोचि आम्हां । रघूनाथजी शक्ति ऊदंड देरे । वदे राम लक्ष्० ॥२१॥ग्रह सर्व रासीं शुभाईक व्हावे । सखे मित्र तैसेचि तेही असावे । दिनानाथजी विघ्रवार्ता नको रे । वदे राम लक्ष्० ॥२२॥सदा वासना धर्मपंथीं असावी । दयाशीळ चातुर्यता श्रेष्ठ द्यावी । समर्था प्रभू पापबुद्धी नको रे । वदे राम लक्ष्० ॥२३॥प्रितीनें प्रजा पाळि रे रामराया । नको दैन्यवाणें करीं दिव्य काया । शरीरीं कदा रोगराई नको रे । वदे राम लक्ष्० ॥२४॥कुडें खोडि कापटय कांहीं नसावेम । सबाह्य शुचिष्मंत तैसें असावें । तुझ्या दर्शना आडकाठी नको रे । वदे राम लक्ष्० ॥२५॥प्रभू क्लेश घेऊनि विश्रांति द्यावी । देहे तोंवरी भक्ति तूझी घडावी । विणी स्वामिणी कौल ऐसाचि देरे । वदे राम लक्ष्० ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP