मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|युद्धकान्ड| प्रसंग तेरावा युद्धकान्ड प्रसंग पहिला प्रसंग दुसरा प्रसंग तीसरा प्रसंग चवथा प्रसंग पांचवा प्रसंग सहावा प्रसंग सातवा प्रसंग आठवा प्रसंग नववा प्रसंग दहावा प्रसंग अकरावा प्रसंग बारावा प्रसंग तेरावा युद्धकान्ड - प्रसंग तेरावा समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramayanramdassamarthaरामदासरामायणसमर्थ प्रसंग तेरावा Translation - भाषांतर पुरी वर्णिली हो यथासांग येथें । परी पाहतां दीसतें अल्प तेथें । मनीं संशयो श्रोतयां प्राप्त जाला । प्रतीउत्तरें काय दील्हीं तयांला ॥१॥अयोध्यापुरी स्वर्गलोकासि गेली । पुढें ओस होतांचि ते मग्र जाली । असेना जना राहणें वस्ति जेथें । खडे माणिकें कोण ठेवील तेथें ॥२॥पुरें पटटणें ओस होती कितीकें । पुढें पाहतां दीसती सर्व टेकें । युगें लोटतांही वसे अल्प कांहीं । असंभाव्य हें तूं विचारूनि पाही ॥३॥असो तूटला संशयो श्रोतयांचा । पुढें राहिला ओघ जातां कथेचा । अयोध्यापुरा चालिले वीर जेठी । निघाले स्वयेंभार कोटयानुकोटी ॥४॥ऋषी राम ते चालिले नीज भारें । दळें चालिलीं पृष्ठभागीं अपारें । शिब्री का पुढें चालती दिव्य हारीं । सखे लोक बंधू मधें रावणारी ॥५॥पुढें दाटले भार माहारथांचे । दळीं घोष जाले गजां घोडियांचे । गिरीतुल्य सेना रिसांवानरांचीं । बहू दाटि राक्षेस लंकापतीची ॥६॥पुरीं पावतां रुंधल्या सर्व वाटा । असंभाव्य तो जाहला दाट खेटा । शतांचीं शतें धांवती वेत्रधारी । दळें माजलीं कोण कोणास वारी ॥७॥कितीएक ग्रामस्थ मध्येंचि गेले । कितीएक ते चूकले भ्रांत जाले । अयोध्यापुरीमाजिं ऊभीं अचाटें । गृहें गोपुरें पाहती दाट थाटें ॥८॥करीं रत्नताटें कितीएक हारीं । असंभाव्य त्या चालिल्या दिव्य नारी । बहूसाल नीरांजनें लक्ष कोटी । पुरींतूनि येतां पुढें थोर दाटी ॥९॥रुपें राजसा सुंदरा त्या प्रितीनें रघूनाथ ओंवाळिती आवडीनें । मनामाजिं ते लागलीसे अवस्था । सुखें पाहती एकपत्नीव्रतस्था ॥१०॥करीती बहू सुंदरा अक्षवाणें । कितीएक ओवाळिती लिंबलोणें । असंभाव्य थावे तया नायकांचे । मुखें गर्जती भाट वेताळ वाचें ॥११॥पताका निशाणें बहू रंग वर्णें । महा तेज पुंजाळ मोतडपर्णें । वरी दाटलीं तीं असंभाव्य छत्रें । भ्रमों लागलीं दिव्य छत्रें विचित्रें ॥१२॥पहा हो पहा पैल तो राम आला । असंभाव्य हा वीरमेळा मिळाला । दिसेना पुढें पाहतां गर्द जाला । समस्तीं करें ताळिकाघोष केला ॥१३॥पुढें सर्वही भूवनामाजिं गेले । महावीर ते बैसले स्वस्थ जाले । पुरीमाजिं आनंद सर्वांस जाला । उभें राहिलें भाग्य हें राम आला ॥१४॥ऋषी सांगती हे बरी शुद्ध वेळा । त्वरें बैस भद्रासनीं तूं नृपाळा । समस्तांसि आनंद राज्याभिषेकें । ऋषी अक्षता टाकिती मंत्रघोषें ॥१५॥विधीयुक्त भदासनीं रामराजा । यथायोग्य संपादिली सांग पूजा । कितीएक पुष्पांजळी वाहताती । सदानंद आनंद सूखें पहाती ॥१६॥असंभाव्य नानापरी दान केलें । बहूतांपरी याचकां तोषवीलें । गिरीचेपरी शर्कराढीग केले । कितेकीं समस्तांसि ते पाठवीले ॥१७॥नभीं दाटलीं मे बडंब्रें अपारें । कितीएक तीं चामरें थोरथोरें । असंभाव्य हेलावती रत्नपुच्छें । बहू डोलती जन्मतें शक्र तुच्छें ॥१८॥सुचित्रें विचित्रें रवीतेजपात्रें । असंभाव्य तीं दाटलीं भाव्य छत्रें । विशाळा पताका सतेजें निशाणें । वरी सर्व आच्छादिलें व्योम तेणें ॥१९॥असंभाव्य ते दाटली भीमसेना । प्रसंगें । प्रसंगें विरीं घाव केला निशाणा । महादिव्य सिंहासनीं रामराजा । पहाया भ्रमों लागल्या वीर फौजा ॥२०॥वरी रामराजा गुढी उभवीली । गजेबी सुखें लोकमांदी मिळाली । झडा घालिती राम पाहावयाला । समस्तां मनीं थोर आनंद जाला ॥२१॥पुरीमाजिं तीं वैभवाचीं अचाटें । दुताळीं तिताळीं उभीं लोकथाटें । खुणा दाविती सांगती एकमेकां । बहूवीध तो राम वेधी अनेकां ॥२२॥दमामे धमामे दडाडां धडाडां । बहू वाजवी चंड भेरी भडाडां । तुतारे नगोर बहू शंक शृंगें । किती चौघडे ढोल कर्णे बुरंगें ॥२३॥तुरें गंभिरें तीं बहू गर्जताती । कितीएक पांवे मुखीं घोष वाती । नफेर्या बहू दुंदुभी घोष जाला । असंभाव्य तो वाद्यमेळा मिळाला ॥२४॥कितीएक ते चौघडे वाजताती । कितीएक ते बागडे नाचताती । कितीएक ते मागुते मेळ आले । कितीएक ते वेषधारी मिळाले ॥२५॥कितीएक थोंबे कुळावंत गाती । हरीदास ते कीर्तनीं गर्जताती । कितेकी गुणीं नाचणी नृत्यरंगें । अलापें कळा रागरंगें तंरगें ॥२६॥कितीएक वाखाणिती भाट ब्रीदें । कितीएक ते छंद नाना विनोदें । दिंडीगान तें मांडिलें वासुदेवीं । बहू कनिर्या लाधले लोक जीवीं ॥२७॥कितीएक ते भैरवाचे मिळाले । कमाचे कितीएक घेऊनि आले । कितीएक ते नाचताती धबाबां । सुखें डोलती वाजवीती खबाबां ॥२८॥कितीएक ते गारुडी नाचताती । गळे फूगळे घागर्या लोळ घेती । कितीएक ते लोक नाना गुणाचें । ब्रिदे अंकुशें लविले भार कुंचे ॥२९॥कितीएक ते भोंवतीं भेद नाना । भ्रमों लागले पाय भूमीं स्थिरेना । कितीएक ते टीपर्या खेळताती । मिळाले समेळे बहू वाजताती ॥३०॥घनें सुस्वरें नाद कल्होळ जाला । बहूतांपरींचा बहू लोक आला । महद्भूत ते माजली रंगवेळा । दणाणी मही नाद गेला भुगोळा ॥३१॥निशी प्राप्त जाली असंभाव्य दाटी । बहू दीवटया लक्ष कोटयानुकोटी । कितीएक ते उंच नेले उमाळे । नळें जाळितां घोष तैसे उफाळे ॥३२॥सरारां फुलें धांवती अंतराळीं । कडाडीत घोषें निराळीं निराळीं । भुरारां हवाया कितीएक वेळां । बळें पाहती ऊर्ध्व नक्षत्रमाळा ॥३३॥बहू औषधें दिव्य नानापरींचीं । कितीएक तेजाळ तीं कूसरीचीं । घडीनें घडी तेजपुंजाळ होती । उजेडेंचि ते लोक लोकां पहाती ॥३४॥पुढें ऊठिला राम तो ते प्रसंगीं । प्रभू चालिला भूवनामाजिं वेगीं । रामस्तांसि आरोगणा सांग केली । विडे कर्पुरे घेतले तृप्ति झाली ॥३५॥गृहें दीधलीं रम्य दिव्यांबरांचीं । दळें स्वस्थ जालीं रिसांवानरांचीं । कपी वीर राक्षेस सूखें निघाले । सुषुप्तीचिया भूवनामाजिं गेले ॥३६॥सुवर्णाचिया मंचकीं मृदु शुय्या । वरी सूमनें सेज त्या देवराया । स भामंडपीं ते निशी अर्ध केली । प्रभूनें यथासांग विश्रांति केली ॥३७॥निजेले ऋषी राव तो बंधु माता । यथायोग्य विश्रांति जाली समस्तां । कितीएक त्या वीरफौंजा समस्ती । असंभाव्य तो वाद्यकल्लोळ वस्ती ॥३८॥प्रभातींचि ऊठोनियां नित्य नेमें । किजे स्नानसंध्यादिकें सांग कर्में । कितीएक दानें कितीकां परींचीं । धनें कांचनें भव्य नानापरींचीं ॥३९॥अळंकार मुक्ताफळें मुक्तमाळा । कितीएक दिव्यांबरें रत्नमाळा । कितीएक धोत्रें कितीएक पात्रें । दिलीं ब्राह्मणां दान राजीवनेत्रें ॥४०॥कितीएक कोटयावधी गोधनांचीं । कितीएक लक्षावधी कुंजरांचीं । बळाचें बहू अश्व ते पारखीले । धनेंशीं द्विजां ब्राह्मणां दान केले ॥४१॥ऋषीं बांधवीं सारिलीं स्नानदानें । यथायोग्य उंचासनें स्थानमानें । सभेमाजिं तो बैसला रामराजा । निघाल्या कपी रीस राक्षेस फौजा ॥४२॥कपीनाथ तो अंगदू जांबुवंतु । कुमूदू गजू वीनतू वीर्यवंतू । महावीर लंकापती मारुती तो । सुमूखू द्विवीदू कपी केसरी तो ॥४३॥प्रमाथी गवायू निळू हेमकूटू । सुषेणू नळू मैंद मोठा अचाटू । कपी क्रोधन ऋषभू आणि शर्मू । गवाक्षू दधीमूख स्वेदू शराभू ॥४४॥कपी रीस राक्षेस कोटयानुकोटी । असंभाव्य ते चालिले रामभेटी । समस्तीं प्रभूला नमस्कार केले । पुढें सर्वही हात जोडूनि ठेले ॥४५॥समस्तीं विरीं रामगूणागराला । बहू प्रार्थिलें त्या दयासागराला । समस्तांसि देवें निरोपासि द्यावें । म्हणे राम तो शीघ्र जेऊनि जावें ॥४६॥नमस्कार केले तया विश्ववंद्या । पुढें शीघ्र संपादिली स्नानसंध्या । असंभाव्य तीं दिव्य अन्नें सुवासें । बहू पंगती घातल्या सावकाशें ॥४७॥ऋषी राम ते सर्वही बंधुवर्गीं । कितीएक ते बैसले आप्तवर्गीं । ऋषी राम ते सर्वही बंधुवर्गीं । कितीएक ते बेसले आप्तर्गीं । प्रभा फांकली दिव्य रत्नीं अनर्घी । कपी रीस ते बैसले जेविं स्वर्गीं ॥४८॥हरी ऋक्ष राक्षेस सर्वे मिळाले । असंभाव्य ते भोजनालगिं आले । बहू पाकनिष्पत्ति नानापरींची । पक्कानें रसाळें कळाकूसरीचीं ॥४९॥जगज्जननी जानकी वाढिताहे । सुवासें महा सौख्य तें होत आहे । यथासांग संपूर्ण तें अन्न जालें । पुढें शींघ्र तें शर्करा आज्य आलें ॥५०॥पयादीक नाना रसें पूर्ण पात्रें । त्वरें घेतले ग्रास राजीवनेत्रें । समस्तांसि आज्ञापिलें देवधीशें । कपी सर्वही गर्जती नामघोषें ॥५१॥तयां जेवितां भक्ष्य जालें । पुन्हां मागुती खाद्य ऊदंड आलें । घृतें वाढितां वाढितां ओघ गेले । असंभाव्य नानापरी तृप्त केले ॥५२॥अपेक्षी तया मागती सर्व शाका । किती एक ते आणवीती कथीका । क्षिरी लोणचीं रायतीं भात भक्षें । खुणा दाविती मागती एक लक्षें ॥५३॥जळें शीतळें सर्वही सेविताती । पुन्हां मागुते वीर ते जेविताती । समस्तांसि तीं सांग संपूर्ण जालीं । पुढें शीघ्र दध्योदनें आणवीलीं ॥५४॥बहू जेवितां जेविताम एक मध्यें । प्रतापें मुखें बोलती श्र्लोक गद्यें । मनीं भासती अर्थ नानापरींचे । मुखें रामनामें महात्दोष वांचे ॥५५॥समस्तांसि तें सर्व संपूर्ण जालें । महा तृप्तिनें लोक सूखें निवाले । वरी आच्मनें शुद्ध केलीं खळाळां । कितीएक ते तोय घेती घळाळां ॥५६॥सभामंडपीं सर्वही स्वस्थ झाले । सुगंधी विडे शीघ्र ते आणवीले । समस्तांसि संपूर्ण गंधें सुवासें । कपी पूजिले सर्व नाना विलासें ॥५७॥समस्तीं विडे घेतले पीतवर्णें । सुतारी बरी कर्पुरू मुक्तचूर्णें । बहू वेळ लौंगा सुवासें खदीरें । किती जाति कंकोळ नाना प्रकारें ॥५८॥अळंकार चीरें बहू सिद्ध केलीं । असंभाव्य दिव्यांबरें आणवीलीं । बहू भूषणांचे बहू ढीग केले । जगज्जन्नकें ते कपी गौरवीले ॥५९॥तुरे लविले घातल्या पुषमाळा । कितीएक त्या रत्नमाळा सुढाळा । करीं कंकणें मुद्रिका लेववील्या । यथासांग संर्वाग संपूर्ण केल्या ॥६०॥सभामंडपीं फांकल्या रत्नमाळा । समस्तांसि ते जाहली सौखवेळा । कितीएक सांगीतल्या गुप्तगोष्टी । महावीर आनंदले सर्व पोटीं ॥६१॥स्तुती उत्तरीं सर्व लावण्यखाणी । मुखें बोलिला राम कारुण्यवाणी । तुम्हीं कष्ट केले जिवीं सर्व भावें । तुम्हांलगिं म्यां काय उत्तीर्ण व्हावें ॥६२॥कपी सुग्रिवा अंगदा जांबुवंता। गुजां मारुता आणि नैरृत्यनाथा । समस्तांसि सन्मानिलें रामचंद्रें । सुधाउत्तरीं तोषवीलें नरेंद्रें ॥६३॥मुखें बोलिजे वैद्यराजासि देवें । कवी तूज ऊचीत म्यां काय द्यावें । वरू दीधला रामचंद्रें उचीती । तुझ्या दर्शनें लोक आरोग्य होती ॥६४॥समस्तांकडे पाहिलें राघवानें । तयां सर्व रोमांच आले फुराणें । नमस्कारिलें स्वामि देवाधिदेवा । म्हणे राम तो लोभ आतां असावा ॥६५॥असंभाव्य केली स्तुती राघवाची । वदों लागली मंडळी राघवाची । कपी बोलती सर्व कारुण्यवाचा । स्तुती ऐकतों राम सिंधु सुखाचा ॥६६॥गिरीकंदरामाजिं आम्हीं असावें । नरां देखतां वानरीं शीघ्र जावें । समर्थें सवें लविसी मर्कटाला । महा सूकृतें पार नाहीं सुखाला ॥६७॥प्रभू बोलणें चालणें काय जाणें । बरें वोखटें सर्व कांहींच नेणे । बहुतांपरी चालवीलें दयाळें । तुम्हां योग्य हें आमुचें तोंड काळें ॥६८॥कृपाळूपणें राघवें थोर केलें । बरें वोखटें सर्व साहून नेलें । बहू देखिलें सौख्य नानापरींचें । प्रभूच्या पदालगिं हें प्राप्त कैंचें ॥६९॥सभाग्याचिया संगतीनें असावेम । बहूतांपरींचें बहू सौख्य घ्यावें । तयासारिखें सर्व आम्हांसि जालें । महा वैभवें चित्त सूखें निवालें ॥७०॥नव्हे भेटि नानापरी योगयोगें । नव्हे भेटि नानापरी भोगत्यागें । नव्हे भेटि ब्रह्मांदिकां शीघ्रकाळें । त्रिकूटाचळी दाखवीलें भुपाळें ॥७१॥कपी रीस ते बोलती दैन्यवाणें । कृपासागरू जीविंचा भाव जाणे । तयांच्या शिणें देव तो शीणताहे । बहूतांपरी राम संबोखिताहे ॥७२॥सवें लागली राघवाची सुटेना । प्रिती गुंतली तोडितांही सुटेना । बहू दीस गेले सुखाचेनि योगें । अकस्मात तें दु:ख जालें वियोगें प्रभूसंगतीची सवे दृढ केली । अकस्मात कां सर्व छेदूनि नेली । तयां बोलता जाहला रावणारी । तुम्हां भेटि देईन कृष्णावतारीं ॥७४॥दयाळासि तींहीं नमस्कार केले । प्रभू सव्य घालूनि तैसे निघाले । समस्तीं समस्तांसि वंदूनि वेगीं । पुढें नीघते जाहले ते प्रसंगीं ॥७५॥मनें वीकले भक्तपाळें भुपाळें । मनामाजिं ते खंति केली दयाळें । जनीं सेवकांलगि देखोनि ऊणें । बहू कष्ट घेऊनियां सौख्य देणें ॥७६॥मनीं भावना भक्तलोकांसि जैशी । तयासारिखी देवरायासि तैशी । जनीं सेवकांकारणें जन्म घेणें । महाद्भाग्य सांडोनियां नीच होणें ॥७७॥पडे सांकडेम सर्वदां सेवकांचें । दिनानाथ हें ब्रीद विख्यात साचें । मनामाजिं ते जैशि जैशि अपेक्षा । करीना कदा राम त्याची उपेक्षा ॥७८॥असंभाव्य अन्याय तो आठवीना । बहू चूकतां देव कांहीं शिणेना । तया मानसीं लागली प्रेममाया । करी सेवकालगिं नाना उपायां ॥७९॥सदा सर्वदा देव हा साभिमानी । कृपा भाकितां शीघ्र पावे निदानीं । तया अंतरीं थोर लहान नाहीं । परी पाविजे दृढ भावार्थ कांहीं ॥८०॥तया अंतरीं भाव होईल जैसा । तयालगिं तो देव पावेल तैसा । यदर्थीं कदा संशयोही असेना । अभावेम तरी देव तो पालटेना ॥८१॥कितीएक अन्याय कोटयानुकोटी । भ्रमें होय नानापरी बुद्धि खोटी । परी पाहतां लोभ त्याचा असेना । कृपासागरू तो कदा वोसरेना ॥८२॥कृपाळूपणें देव राजाधिराजें । शिरीं वाहिजे सर्वही भक्त ओझें । जनीं दास देखोनियां दैन्यबाणा । मनामाजिं वोसावतो देवराणा ॥८३॥बहूसाल हें बोलणें काय कीती । स्वयें जाणिजे ज्या असे स्वप्रचीती अयोध्यापुरीमाजिं तो रामराजा । कृपाळू सुखें राहिला भक्तकाजा ॥८४॥कपी रीस गेले स्थळ जेथजेथें । प्रितीं मारुती राहिला राम तेथें । रघूनाथ सीता तया बंधुवर्गीं । उभें राहिजे सेवकें पूर्वभागीं ॥८५॥समस्तांसि पूजूनि नाना विलासें । नमस्कारिलें सर्व दासानुदासें । उदासीन श्रोतीं कदाही न कीजे । बहू भेद भाषा क्षमा सर्व कीजे ॥८६॥मनामाजिं ऊपासना रामध्यानीं । जनीं दास तो नीववी ब्रह्मज्ञानी । अखंडीत त्या राघवाच्या प्रतापें । विवेकें विचारें समाधान सोपें ॥८७॥पदीं लागतां निर्गुणी भक्त जाले । बहू संग नीसंग होऊनि गेले । विवेकें बरें पाहतां ध्येय ध्याता । विचारें बरें शोधितां ज्ञेय ज्ञाता ॥८८॥विवंचूनि तो साधकू साध्य जाला । असंभाव्य तो ब्रह्मबोधें बुडाला । पुसावें कळेना तरी सज्जनाला । धरूनी त्यजावें विदेहीपणाला ॥८९॥असे हेम जनीं प्राप्त तेणें धरावें । अनिर्वाच्य तें वाच्य कैसें वदावें । सदा नित्य नीरूपणीं वीवरावें । नुरावें परी कीर्तिरूपें पुरावें ॥९०॥असो जाणत्याला कळे सर्व कांहीं । जनी नेणता त्यासि कांहींच नाहीं । नसे ज्ञान त्यां सर्वही व्यर्थ गेलें । जळो पांचभौतीक हे काय जालें ॥९१॥असो ही कथा बोलिली राघवाची । जनी सर्वदा ऐकती धन्य त्यांची । सुखें ऐकतां ते महा दोष जाती । दुखें नाससी लोक ते धन्य होती ॥९२॥चरित्रें बरीं उत्तमें राघवाचीं । असंभाव्य विस्तारलीं पावनाचीं । कितीएक ते पाहती कोटि होती । जनीं एक एकाक्षरें दोष जाती ॥९३॥शतांची शतें पूर्ण आरंभ संधीं । कळाया कथा हेतु संकेतसिद्धी । पुढें बोलिलें तें बरें वीवरावें । बुजायास हें गद्य पोटीं धरावें ॥९४॥मुळारंभ ते स्तूति नाना परींची । गिरी वर्णिता जाहली सागराची । पहीले शतीं भेटि बीभीषणाची । पुढें शेवटीं शेज दर्भासनाची ॥९५॥द्बितीयीं शतीं राम क्रोधासि आला । कथेलगिं तेथूनि आरंभ झाला । बळें सिंधु पालणिला शूक गेला । अपेक्षा मनीं शृंग पाहावयाला ॥९६॥तृतीयीं शतीं शृंग पाहो निघाले । रिपूलगिं तो शिष्ट जावूनि बोले । बहू वीर राक्षेस युद्धीं निमाले । कपी सर्वही नागपाशीं निजेले ॥९७॥रणें दाखवीलीं तये जानकीला । तये वीरशीं तो प्रहस्तू निमाला । प्रसंगेंचि मंदोदरी नीति सांगे । निघाला दशग्रीव तो लागवेगें ॥९८॥चतुर्थीं शतीं युद्ध त्या रावणानें । रघूनायकें सोडिला जीवदानें । पुढें कुंभकर्णासि संहार केला । समूदाय तो कूमरांचा निमाला ॥९९॥कितीएक ते वीर माहोदरेशीं । प्रतापें रणामाजिं ते प्रेतराशी । पुढें इंद्रजीतें कपी भग्र केले । महावीर ते बाणजाळीं निमाले ॥१००॥शता पंचमालगिं आरंभ जाला । कपी वीर द्रोणाचळालगिं गेला । महावीर ते ऊठले स्वस्थ जाले । त्रिकूटाचळू सर्व जाळूं निघाले ॥१०१॥कपी क्षोमले काळ युद्धा निघाले । कितीएक राक्षेस युद्धीं निमाले । नभींहूनि तो रावणी वीर आला । समस्तांसि भेदूनियां शीघ्र गेला ॥१०२॥सहावें शतीं रावणू दु:ख सांगे । त्रिकूटाचळीं रावणी लागवेगें । पुन्हां इंद्रजीतू रणामाजिं आला । विरीं वानरीं होम तो भग्र केला ॥१०३॥शतीं सातवें त्या विरें इंद्रजीतें । असंभाव्य केलीं रणामाजिं प्रेतें । सुमित्रासुतें मारिलें बाणघातें । यथासांग तो वन्हि सूलोचनेतें ॥१०४॥शतीं आठवे वीर घायाळ जाळे । कितीएक राक्षेस युद्धीं निमाले । सुमित्रासुता रावणें घात केला । गिरी द्रोण आणूनियां स्वस्थ जाला ॥१०५॥नवामाजिं रामासि सौमित्र सांगे । बळें भंगिला होम तो लागवेगें । रघूनायकें थोर संग्राम केला । रणामाजिं तो मुख्य शत्रू निमाला ॥१०६॥दहावेम शतीं शोक अंत:पुराचा । प्रसंगें महोत्साव बीभीषणाचा । रघूनायकें जानकी आणवीली । समस्तां सुरां राघवा भेटि जाली ॥१०७॥शंती ऐक एकादशी राघवाची । असंभाव्य ते स्तूति ब्रह्मादिकांची । महापुष्पकारूढ होऊनि गेले । पुढें भ्रातया भेटले स्वस्थ जाले ॥१०८॥पुढें द्वादशीं मंदिरें त्या विरांचीं । यथायोग्य मानें समस्तां जणांचीं । पुजा भोजनें सांग सर्वांसि जालीं । पुरी वर्णितां मानसें तीं निवालीं ॥१०९॥शतीं अष्टपंचीं पुरीमाजिं गेले । रघूराज भद्रासनीं बैसवीले । महोत्साव उत्साव नानापरीचा । समूदाय तो बोळवीला कपींचा ॥११०॥करी राज्य तो राम नाना विलासी । जनांमाजिं ऊपासना रामदासी । यथासांग तेरा शतें श्लोक झाले । गुणी ऐकतां सर्व सूखें निवाले ॥१११॥॥ युद्धकांड एकूण श्लोकसंख्या ॥१३६२॥ रामायण एकूण श्लोकसंख्या ॥१४६३॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP