मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
गगनगिरी महाराज

दत्तभक्त - गगनगिरी महाराज

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात माटदुरे नावाचे खेडे आहे. येथील गणपतराव व विठाबाई या वारकरी दांपत्याच्या पोटी एक पुत्र झाला. त्याचे नाव ‘श्रीपाद’ होते. लहानपणापासून श्रीपादाला साधुसंतांच्या संगतीची ओढ लागली. वयाच्या आठव्या वर्षी श्रीपादने घराचा त्याग करून हिमालयाची वाट धरली. तेथे तपस्या केली. चित्रकूट पर्वतावरील चित्रानंद स्वामींचे त्याने दर्शन घेतले. त्यांच्याच आश्रमात श्रीपाद राहू लागला.

नंतर हिमालयातील क्षेत्रे, अरवली पर्वत, सातपुडा, निलगिरी, द्वारका, जगन्नाथपुरी, कन्याकुमारी इत्यादी स्थानांना भेट देऊन श्रीपादने कोल्हापूर जवळच्या राधानगरीजवळ एका जंगलात तपश्चर्या केली. आणि शेवटी जवळच्याच गगनगडावर ते स्थिर झाले. अंगावर वस्त्र नाही. वाढलेल्या दाढी-जटा यामुळे प्रथम लोकांचा त्यांना उपद्रव झाला. पण थोडयाच दिवसांत त्यांची तपस्या व ध्यानधारणा लोकांना समजली. पुढे ते गडावरील स्वामी गगनगिरी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी शरीराला कष्ट देऊन उग्र तपस्या केली. जे मिळेल ते खाल्ले. नित्य पाण्यात बसून त्यांनी तपस्या केली. आपल्या सामर्थ्याने त्यांनी हजारो लोकांना सन्मार्गास लाविले. आईवडील, कुलदैवत, इष्टदेवता यांच्यावर श्रद्धा ठेवून चिंतनात मग्न असावे, अशी त्यांची शिकवण आहे. अनेक भाविक त्यांचे दर्शन घेऊन तृप्त झाले आहेत. गगनगिरी महाराज यांचे आश्रम गगनगड, खोपोली, मनोरीबेट, आंबोळगड, दाजीपूर, नागार्जुन सागर इत्यादी ठिकाणी आहेत. येथे दत्तमूर्ती स्थापन करून त्यांनी लाखो लोकांना भक्तिमार्गाकडे वळविले आहे, गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्र इत्यादी प्रसंगी या आश्रमांत भजनपूजन थाटाने होत असते. अन्नदानही मोठया प्रमाणावर होते.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP