TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

आरती - आरती तिसरी

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


आरती तिसरी
( चाल : आरती भुवन )
ही आदिमाया जगदंबा । रेणुका, कुलस्वामिनी, अंबा ॥धृ०॥
जागृत करुनि निरंकारा । निर्गुण आणिलें आकारा ॥
त्रिविध गुण लावुनि संसारा । रचिला जगडंबर सारा ॥
भू, जल, तेज, गगन, वारा । बहु तत्त्वांचा परिवारा ॥
( चाल ) उत्पत्ति स्थिति संहारा । लाविले इनें विधिहरिहरा ॥
करुनि परिमाण, केलें निर्माण, जगाचे प्राण
सकळहि सृष्टि मुळारंभा ॥ रेणुका० ॥१॥
दुर्लभ जय देवासि दिला । दुर्जय महिषासुर वधिला ।
रक्तें क्षितिपट रंगविला । सहस्त्रार्जुन घट भंगियला ॥
कटकट लावुनि लंकेला । कुळासह राक्षसक्षय केला ॥
( चाल ) द्रुपदपुरि जाहली याज्ञसेनी । करुनी विरविरहित अवनी ।
उतरला भार, शौर्य आपार, लागेना पार
सुरवर मानिती आचंबा ॥ रेणुका ॥२॥
रेणु राजाची दुहिता । अति सुंदर रुप कनकलता ॥
श्रीजमदग्निची वनिता । त्रिभुवन - जन - पावन सरिता ॥
भार्गवरामाचि माता । जिचे गुण वदुं न शके धाता ॥
( चाल ) सगुणरुप सौख्याची खाणी । सकळ मुळ दुःखांची खाणी
प्रकटली धरणी, भवार्णव - तरणी, कलिमल - हरणी ।
दुर्घट संकट विटंबा ॥ रेणुका० ॥३॥
उत्तम मुळपिठ रम्यस्थळ । वसती देवऋषि सकळ ॥
वाहे अमृततुल्य जळ । प्राशितां होती श्रम सफळ ॥
बैसली सिंहासनिं अढळ । सदा सुप्रसन्न मुखकमळ ॥
( चाल ) - जोडुनि विष्णुदास पाणी, प्रार्थुनी म्हणे दीनवाणी,
दाखवी पाय, पाहसी काय, कोटि अन्याय
क्षमा करि, न करी विलंबा ॥ रेणुका० ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:50.4830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

hilum cell

  • नाभि पेशी 
RANDOM WORD

Did you know?

परदेशात १३ हा आंकडा अशुभ कां मानतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.