आरती - श्रीविष्णुदास कवींची

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


जय जय श्रीगुरु पुरुषोत्तमानंद सरस्वति स्वामी हो ।
तद्दर्शनिं सुखि झालों सहकुळ आलों निजसुखधामीं हो
जयजय ब्रह्मानंदा, चित्सुखकंदा, विधिहरिहरा हो ।
अनंत जन्मोजन्मींचें मम पातक तें परिहरा हो ।
अशी न विनंति करितां जैसें उरिं धरि आइ लेंकरा हो ।
तैसें भवपुरीं बुडतां ताराया मज धरिलें करा हो ।
श्रीगुरुदास म्हणे आज अक्षय झाली मजसी अरामी हो ॥१॥
अंत न लागे कवणा तुझिया स्वरुपाचा सर्वथा हो ।
सहस्त्राननादि थकले, धरुनि बैसले मौनावस्था हो ।
चारी वाणी मेल्या गेल्या, वेदा न कळे व्यवस्था हो ।
अज्ञानी म्हणुनि मुक्यानें चरणांवरती ठेवुनि माथा हो ।
श्रीगुरुदास म्हणे आज अक्षय झाली मजसी अरामी हो ॥२॥
जय त्रिगुणातीता त्रैमूर्तीं तूं तरि निर्गुणा हो ।
अनंत ब्रह्मांडांच्या आंत बाहेर तव व्यापकपणा हो ।
अनंतरुपिं नारायण अससि परंतु न दिससी कुणा हो ।
कृपा तुझी होइल तेव्हां तरीच कळतिल तुझिया खुणा हो ।
श्रीगुरुदास म्हणे आज अक्षय झाली मजसी अरामी हो ॥३॥
कोटी कोटी फेरे लक्ष चौर्‍यांशीं फिरुनि श्रमलों हो ।
तुझिया कृप्राप्रसादें अवचित तरि जन्मा आलों हो ।
पतित मी पापी असतां बिनसेवेनें पावन झालों हो ।
करुणामृत घनधारा प्राशुनि चातक अखंड धालों हो ।
श्रीगुरुदास म्हणे आज अक्षय झाली मजसी अरामी हो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP