मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|आरती| आरती पांचवी आरती आरती पहिली आरती दुसरी आरती तिसरी आरती चवथी आरती पांचवी आरती सहावी आरती सातवी आरती आठवी आरती नववी आरती दहावी आरती अकरावी आरती महालक्ष्मीची आरती शारदेची श्रीचिन्मयानंद गुरुमालिकेची श्रीविष्णुदासाची श्रीविष्णुदास कवींची श्री गुरुदासाची सदगुरुनाथाची आरती - आरती पांचवी श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : aratipoemvishnudasआरतीकवितापदमराठीविष्णुदास आरती पांचवी Translation - भाषांतर जय जय जगदंबे । श्रीअंबे । रेणुके, कल्पकदंबे ॥धृ०॥अनुपम स्वरुपाची । तुझि धाटी । अन्य नसे या सृष्टींतुजसम रुप दुसरें । परमेष्ठी । करितां झाला कष्टीशशिरस रसरसला । वदनपुटीं । दिव्यसुलोचन दृष्टींसुवर्ण रत्नांच्या । शिरिं मुकुटीं । लोपति रविशशि कोटीगजमुखि तुज स्तविलें । हेरंबें । मंगल सकळारंभे ॥१॥कुंकुम - चिरि शोभे । मळवटीं । कस्तुरीटिळक लल्लाटींनासिक अति सरळ । हनुवटी । रुचिरामृत रस ओठीं समान जणुं लवल्या । धनुकोटी । आकर्ण लोचनभ्रुकुटीशिरिं निट भांगवळी । उफराटी । कर्णाटकची धाटीभुजंग निळ रंगा - । परि शोभे । वेणि पाठिवर लोंबे ॥२॥कंकणें कनकाचीं । मनगटीं । दिव्य मुद्या दश बोटींबाजूबंद नगे । बाहुवटीं । चर्चुनी केशर उटीसुगंध पुष्पांचे । हार कंठीं । बहु मोत्यांची दाटीआंगीं नवि चोळी । जरिकांठीं । पीत पितांबर तगटीपैंजण पदकमळीं । अति शोभे । भ्रमर धांवती लोभें ॥३॥साक्षप तूं क्षितिच्या । तळवटीं । तूंच स्वयें जगजेठींओवाळित आरती । दीपताटीं । घेउनि करसंपुष्टींकरुणामृत ह्रदयें । संकटीं । धावसि भक्तांसाठींविष्णुदास सदा । बहु कष्टी । देसिल जरि निज भेटीतरि मग काय उणे । या लाभें । धाव पाव अविलंबे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP