मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|आरती| श्री गुरुदासाची आरती आरती पहिली आरती दुसरी आरती तिसरी आरती चवथी आरती पांचवी आरती सहावी आरती सातवी आरती आठवी आरती नववी आरती दहावी आरती अकरावी आरती महालक्ष्मीची आरती शारदेची श्रीचिन्मयानंद गुरुमालिकेची श्रीविष्णुदासाची श्रीविष्णुदास कवींची श्री गुरुदासाची सदगुरुनाथाची आरती - श्री गुरुदासाची श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : aratipoemvishnudasआरतीकवितापदमराठीविष्णुदास श्री गुरुदासाची Translation - भाषांतर ( श्री विष्णुकवि महाराज यांचे बंधु संतवर्य श्रीगुरुदास महाराज यांची आरती )आरती श्री गुरुदासाची । परात्पर गुरुवर चरणाची ॥धृ०॥महिमा सदगुरुरायाचा । वदाया दुर्बळ ही वाचा ।परंतु प्रेमोदधिवरती । सुखोर्मी सहजचि सरसरती ।चाल - दयाब्धे श्रीसदगुरुनाथा । चरणरज शिरीं,धरुनि बहूपरी । स्तवूं अंतरीं ।चरण महिमान, सदा ज्याची । उन्मनी वृत्ति प्रेमळाची ॥ आरती० ॥१॥शुकासारखें ब्रह्मचर्य । निरंतर घडे धर्मकार्य ।सोवळी परी कर्मवार्ता । पतित पातक्यांस उद्धरता ।चाल - अहर्निशि अनाथांस दाता । ज्ञानदानास ।निपुटुनि आस । वासनावास, नुरे तिळमात्र कृपाज्याची । परम कोमल अंतराची ॥ आरती० ॥२॥दृष्टि कोवळी कशी वाणूं । कल्पना काय व्यर्थ ताणूं ।सुधाघन जणु करुणामूर्ति । वरुषला करुणामृत वरती ।चाल - सुखानें तनुमनांतरंग । सुटे भवसंग ।भक्तिचा रंग । चढे मग दंग ।नावरे वृत्ति अंतराची । पदीं पांगळी होय साची ॥ आरती० ॥३॥जणूं शोभला शंभुमूर्ति । शांति वैराग्य अंगकांति ।लाभली जया पादगंगा । मुक्ति झोंबली तया अंगा ।चाल - शिष्य परिवार वसिष्ठाचा । जणूं सेवेस ।अहर्निशि वास । शिरीं चरणांस ।धरुनि पदकमलिं वृत्ति ज्यांची । सदोदित लीन तन्मयाची ॥ आरती० ॥४॥घडो सर्वदा पादसेवा । हीच मागणी देवदेवा ।पामरा पादयुग्म दावा । निरंतर तिथें वास द्यावा ।चाल - वास दूसरी अंतरंगीं । नसे माउले,काय पाउले । नेणती भले ।ऐक सोज्वळे हाक याची । रुक्मिणी - तनय अंतराची ॥ आरती० ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP