मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|आरती| श्रीचिन्मयानंद गुरुमालिकेची आरती आरती पहिली आरती दुसरी आरती तिसरी आरती चवथी आरती पांचवी आरती सहावी आरती सातवी आरती आठवी आरती नववी आरती दहावी आरती अकरावी आरती महालक्ष्मीची आरती शारदेची श्रीचिन्मयानंद गुरुमालिकेची श्रीविष्णुदासाची श्रीविष्णुदास कवींची श्री गुरुदासाची सदगुरुनाथाची आरती - श्रीचिन्मयानंद गुरुमालिकेची श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : aratipoemvishnudasआरतीकवितापदमराठीविष्णुदास श्रीचिन्मयानंद गुरुमालिकेची Translation - भाषांतर जयजय चिन्मय आदिनाथ गुरु, परब्रह्म लिंगा ।प्रणवरुपिणी शिष्य शिरोमणी, त्रिवेणि भवभंगा ।त्रिगुणात्मक त्रयमूर्ति प्रगटल्या, तापत्रय भंगा ।ओवाळूं धुप दीप निरांजन, आरती निजरंगा ॥ जय०१॥सहज समाधी ब्रह्मानंदीं, दृढ उन्मनी मुद्रा ।घट मठ पट चट व्यापुनि होशि न, दर्शित रविचंद्रा ।ढळसि न चळसि न अढळ अढळसि, कळसि न योगेंद्रा ।अगमा निगमा अणिमा महिमा, मनश्रुतिपारंगा ॥ जय०२॥प्रसिद्ध सहजानंदस्वामि श्रीगोचर भागिरथी ।ब्रह्मानंद सरस्वति यमुना, पूर्णानंद यती ।नामश्रवणें पतित पातकीं, जडमुढ उद्धरती ।प्रणवरुपिणी शिष्य शिरोमणी, त्रिवेणि त्रयगंगा ॥ जय०३॥तूं कुंडलिनी आदिमाया मूळ, सकळ कलाधारा ।तुजपासुनिया वाहती बहात्तर, सहस्त्रामृतधारा ।लाउनि ज्ञानांजन दाविसि रुप, हा गुरु - गृह - धारा ।सहस्त्रकमळदळीं ओपिसी परमा - मृत जिव - शिव - भृंगा ॥ जय०४॥जय औदुंबर क्षेत्रनिवासा, श्रीसदगुरुराया ।युगायुगीं तूं जगिं अवतरसी, जगदोद्धारा या ।तूं गुरु धरणीवर तरणी भव - सागर उतराया ।तूं आदि नारायण गुरुनाथा, तापत्रय भंगा ॥ जय०५॥श्रीगुरु सहजानंद सच्चिदानंदाचे स्वामी ।स्वामी सच्चिदानंदापासुनि, दीक्षा शिवरामीं ।शिवरामाई पासुनि नित्यानंदीं विश्रामी ।नित्यानंद प्रसादें ‘ पुरुषोत्तम ’ निजपदिं जागा ॥ जय०६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP