अभंग - अंबे, तुझ्या भेटीसाठीं

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


अंबे, तुझ्या भेटीसाठीं । धीर धरवे ना पोटीं ॥धृ०॥
तुझ्या पहातां रुपाला । जिव माझा वारा प्याला ॥१॥
उभा राहिलों अंगणीं । तुझी लागली जोगणी ॥२॥
अंबे, सोडियेलें घरदार । झालों जिवावर उदार ॥३॥
प्रावर्णाच्या केल्या चिंध्या । सोडिली म्यां स्नानसंध्या ॥४॥
यज्ञ - यागादि तर्पण । पायीं तुझ्या समर्पण ॥५॥
विष्णुदास हेंचि म्हणे । पाय पाहूं दे चिमणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP