अभंग - अज्ञान अंधार पडलासे दाट

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


अज्ञान अंधार पडलासे दाट । आतां मज वाट दाखवावी ॥१॥
कडाडतीं झाडें मोडताती काटे । आदळती गोटे वेळोवेळां ॥२॥
कल्पनेच्या संगें वाढल्या आगळ्या । वासनेच्या जाळ्या चहूंकडे ॥३॥
कामक्रोध व्याघ्र लांडगे अजगर । दुःखाचे डोंगर मोठमोठे ॥४॥
आतां लवकरी येई माझे आई । उचलोनि घेई कडेवरी ॥५॥
विष्णुदास म्हणे येउं देई कीव । घाबरला जीव तुजसाठीं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP