एकादश स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नृपासीव्याससांगती । तैसासूतऋषीप्रती । तेंचिऐकिजेश्रोतीं । वदलाजेनारायण ॥१॥

संध्याकरावीकैसी । ऐकनारदालक्षणासी । उत्तममध्यमकनिष्ठेसी । प्रायश्चित्तनंतर ॥२॥

नक्षत्रेंदिसतींसकाळीं । उत्तमसंध्यातेकाळीं । तयारहिततेवेळीं । प्रातःसंध्यामध्या ॥३॥

सूर्यासमक्षजीकेली । कनिष्ठातीचम्हणवली । घटीतीनवेळगेली । प्रायश्चितकरावें ॥४॥

शतगायत्रीजपिजे । अथवाचौथाअर्घ्यदीजे । निरुपायास्तवबोलिज । प्रायश्चित्तनसेंयेरा ॥५॥

मध्यान्हसंध्याएककाळ । येतांसूर्यमध्यस्थळ । पूर्वीह्याच्यागौणकाळ । प्रायश्चित उलटता ॥६॥

सूर्यसहित उत्तम । अस्तसमईंमध्यम । नक्षत्रयुक्त अधम । सायंसंध्याएवंविधी ॥७॥

संध्याविप्राचेंमुळ । शाखायाच्यावेदसबळ । धर्मकर्मेंपत्रेंसकळ । मूळनसतांसर्वनासें ॥८॥

संध्याजेणेंनजाणिली । नाहींजेणेंउपासिली । व्यर्थमायश्रमविली । दुष्टेतेणेंजन्मूनिया ॥९॥

तोविप्रनव्हेचांडाळ । त्याचानसावाविटाळ । सर्वदातोंअमंगळ । चांडाळहोयपूनर्भवीं ॥१०॥

जेंकर्मज्याकाली । तीसंध्यान उपासिली । तेंकर्मव्यथतेकाळीं । सर्ववेळींजातसे ॥११॥

घरीसंध्यासाधारण । गोठ्यांततीचिमध्यमजाण । उत्तमदेवीसंनिधान । औपासनसंध्येचे ॥१२॥

आधींकीजेंआचमन । भेदतयाचेंअसतीतीन । श्रौतस्मार्तपुराण । श्रोत्राचमनचौथेंअसें ॥१३॥

समंत्रतेंश्रौताचमन । व्याह्रतियुक्तस्मार्ताचमन । चोवीसनामेंकरुन । पुराणोक्तहोतसें ॥१४॥

हस्तेंस्पर्शितांकर्ण । होयतेंचीश्रोत्रचमन । कर्णहेंतीर्थस्नान । पावनम्हणूनीविधीहा ॥१५॥

अग्निहोत्रांदियागकरित । श्रौत्राचमनतेव्हांशस्त । संध्याअसेश्रौतस्मार्त । आचमनयुक्तस्मृतीचे ॥१६॥

व्रतपूजनादिसमईं । चोवीसनामेंचीघेईं । जळनसतांकोणेसमईं । श्रोत्राचमनकराये ॥१७॥

स्त्रीआणिशूद्रादिक । यांचेअचमनपौराणक । ब्राम्हणासिश्रुतीएक । सर्वत्रसदाअसावी ॥१८॥

प्रातःसध्येचेआवाहन । कीजेंएकचित्तेंध्यान । जपापुष्पसमान । कांतीवयकुमारिका ॥१९॥

रक्तकमलाचेआसन । रक्तवस्त्रपरिधान । रक्तचर्चिलाचंदन । रक्तमाळाफुलांच्या ॥२०॥

चारमुखेंचारहात । नेत्र आठ शोभत । स्रुवास्रुचीमाळाधरित । चौथेंहातींकुंडिका ॥२१॥

सर्वलेइलीआभरण । ऋग्वेदाचेकरीपठण । हंसजीचेंवाहन । देवताजाणविधीची ॥२२॥

एवंकरुनीध्यान । सूर्याकीजेअर्ध्यदान । मंदेहानामेंदैत्यदारुण । येतोतयाभक्षाया ॥२३॥

अर्ध्यरुपवज्रवारी । दैत्यापाडीद्वीपांतरी । अर्ध्य अवश्यविप्रवरीं । द्यावेंनित्यरवीला ॥२४॥

जप आणिउपस्थान । संध्याकीजेसमापन । षोडशोपचारेंकरावें ॥२५॥

शिवाशिवनारायण । गणपतीरवीपांचजण । बाणशालिग्रामादिस्थापून । पूजनकीजेंभक्तीनें ॥२६॥

करुनियानमस्कार । प्रार्थनाकीजस्रुंदर । भक्तवत्सलेकृपाकर । क्षमाकीजेअपराधां ॥२७॥

एवंप्रार्थितांअंबेशी । कृपाकरीभुवनेशी । इतिहासएकयेंविशी । ऐकनारदाविचित्र ॥२८॥

कोणीचक्रवाकगगनीं । उडत आलाकाशीभुवनी । उतरलाकणलोभानीं । अन्नपूर्णामंदिरांत ॥२९॥

एककरुनीप्रदक्षिण । कांहीभक्षुनकण । दैवयोगेंगेलानिघून । काळेंमरणपावला ॥३०॥

स्वर्गलोकींगमनकरी । सुखभोगींकल्पवरी । नृपझालापृथ्वीवरी । बुहद्रथयानामें ॥३१॥

यज्वाशुरमहाज्ञानी । जातिस्मरमहादानीं । पुसिलेंएकदांविप्रानी । जातिस्मरकारण ॥३२॥

वृत्ततेणेंनिवेदिलें । कारुण्यदेवीचेंवर्णिलें । तिचीपुजाकरितांलाभलें । कायमगविचारावें ॥३३॥

चोवीस आणिदोनशत । प्रातःसंध्यापूजावर्णित । तेंचियेथेंकिंचित । भाषांतरेंनिरुपिलें ॥३४॥

श्रीदेवीविजयेएकादशेचतुथः ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP