एकादश स्कंध - अध्याय दुसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । रुद्राक्षाचेंधारण । सांगसांगेनारायण । स्कंदासांगेउमारमण । महात्म्यथोररुद्राक्षाचे ॥१॥

त्रिपुरासुरवधकाळीं । अघोरास्त्रेंचंद्रमौळी । बाण आकर्षूनीकर्णमूळी । लक्ष्यकेलेंएकाग्र ॥२॥

देवाचेसहस्रवत्सर । नहलंवीनेत्रशंकर । भेदिलेजेव्हांत्रिपुर । नेत्रतेव्हांझांकिले ॥३॥

पुन्हाउघडितांसत्वर । जलबिंदूपडलेफार । शिवाज्ञेंनेंतरुवर । झालेतेव्हांरुद्राक्षाचे ॥४॥

अडतीसभेदत्याचेझाले । सूर्यनेत्रांपासावप्रसवले । अनेकवर्णतेशोभले । भेदत्याचेतेबारा ॥५॥

चंद्रनेत्रोदकेंउदेले । श्वेतवर्णसोळाझाले । अग्नीपासावप्रगटले । कृष्णवर्णदशभेद ॥६॥

श्वेतरुद्राक्षब्राम्हण । रक्ततोक्षत्रियजाण । मिश्रवैश्यशुद्रकृष्ण । धारणार्थजातिभेद ॥७॥

एकमुखीसाक्षातहर । ब्रम्हहत्याकरीदूर । द्विमुखतोगौरीहर । तनमनाचेंपापहरी ॥८॥

तीनमुखाचावैश्वानर । स्त्रीहंत्येचाभस्मकर । नरहत्यापापहर । चतुराननचौमुखी ॥९॥

कालाग्निरुद्रपांचवा । अगम्याभक्षादिपापोदभवा । नाशकरीसहावा । षडाननदक्षणकरी ॥१०॥

धारणेंसर्वपापदहन । करीप्रत्यक्षषडानन । सत्पमुखाचाअक्षमदन । चौर्यपापविनाशतो ॥११॥

अष्टमुखतोगणपती । पापेंविघ्नेंसर्वहरती । नवमुखीभैरवनिश्चिती । वामकरीअसावा ॥१२॥

भोगमोक्षआणिबळ । होयनासेंपापसमूळ । दशमुखविष्णुकेवळ । सर्वोपद्रवनासती ॥१३॥

एकादशरुद्रतोमणी । शिखेंमाजीधरितींब्राम्हणीं । अश्वमेधादिक अनंतगुणी । पुण्यहोयधारणें ॥१४॥

द्वादशमुखाचाआदित्य । कर्णधारणेंपुण्यहोत । अपारभयनासत । व्याधिनाशधनलाभे ॥१५॥

त्रयोदशमुखेंज्यांअसती । लाभेजरीभाग्यवती । रसायनादिपद्धती । साधतीत्याचीसर्वकार्ये ॥१६॥

चौदामुखशिरींधरिला । तोसाक्षातशिवझाला । सर्वदेववंदितीत्याला । पुनर्जन्मकैचामग ॥१७॥

कसोटीवरीघासितां । सुवर्णतेथेंझळकता । उत्तमजाणोनिधरितां । पुण्यदहोयसर्वांशी ॥१८॥

चारीआश्रमचारीवर्ण । कीजेरुद्राक्षधारण । समंत्रकेंएकब्राम्हण । अमंत्रकतिघांनीं ॥१९॥

बत्तीसकंठीबांधावे । सव्वीसशिरींवेष्टावें । सहासहाकर्णील्यावे । बारासोळादंडीकरी ॥२०॥

अष्टोत्तरशतमाळा । सदाअसावीगळां । शिखेंमाजीआगळा । एक असावारुद्राक्ष ॥२१॥

करितांरुद्राक्षधारण । पापनस्पर्शेंतयालागुन । एकवीसकुळेंउद्धरुन । नेतरुद्राक्षधारणें ॥२२॥

रुद्राक्षाचेमुखीविधी । रुद्राराहेबिंदुमधी । पुंच्छिंविष्णुत्रिशुद्धी । प्रणवरुपरुद्राक्ष ॥२३॥

पुच्छिंपुच्छमुखींमुख । मेरुदीजेउर्ध्वमुख । वरीकीजेनागपाशक । सर्वसिद्धहीमाळा ॥२४॥

रुद्राक्षाचेंमहिमान । कीतीकरावेंवर्णन । सर्वसिद्धीचेंसाधन । क्षालनसर्वपापांचे ॥२५॥

कीकटदेशींएकखर । वरीठेऊन अक्षभार । पथेंजायवाहकनर । विंध्यपर्वतांमाझारी ॥२६॥

भारनजाहलासहन । खरपडेपावेंमरण । शिवदूतींतयाआणून । शिवसांनिध्यकरविले ॥२७॥

शिवरुपझालाखर । अक्षमुखमानवत्सर । शिवलोकींराहिलानिर्धार । महात्म्यकितीवर्णावे ॥२८॥

आवळयायेवढेंउत्तम । बोरासारिखेंमध्यम । चण्यासारिखेंजाण अधम । रुद्राक्ष आणिभद्राक्ष ॥२९॥

भद्राक्षकरितांधारण । पुण्यविशिष्ठतयाहून । अघोरादिमंत्रेंकरुन । धारणयांचेंकरावे ॥३०॥

अष्टोत्तरदोनशत । रुद्राक्षमहिमाश्लोकहोत । अंबाबोलिलीप्राकृत । सारभूतदयेनें ॥३१॥

श्रीदेवीविजयेएकादशेरुद्राक्षप्रशंसननामद्वितीयोध्यायः ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP