एकादश स्कंध - अध्याय सहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । प्राणाग्निहोत्रयज्ञ । सांगतसेंनारायण । जयाचेहोतांचिज्ञान । मोक्षसुखबाणतसे ॥१॥

ह्रदयकमलहींच अरणी । मनमंथावरीठेउनी । पंचप्राणदोरीलाउनी । विचारयोगेमंथावें ॥२॥

प्रगटेतेथेंदिव्यज्ञान । तोचितेथेंहुताशन । ह्रत्कुंडींकीजेस्थापन । सुखसमिधाहोमाव्या ॥३॥

मगऋत्विजवर्णन । अध्वर्यूयेथेंनयन । वाणीहोताउदगाताप्राण । ब्रम्हामनजाणिजे ॥४॥

अग्नीध्रयेथेंकर्ण । अहंकारपशूजाण । आत्मायेथेंयजमान । बुद्धीपत्नीवरावी ॥५॥

ह्रदयवेदीसाधित । रोमतेदर्भदिस्तृत । स्रुवास्रुचीदोनीहस्त । काम आज्यजाणिजें ॥६॥

यावद ऐसीधारणा । तीचदीक्षाजाणा । सत्यवाणीहेदक्षिणा । भोजनतेंचीपुरोडाश ॥७॥

जेंयाचेंजलपान । तेंचिहोयसोमपान । जेंव्हांकरीरमण । सदस्यतेंचयज्ञाच ॥८॥

आत्मानात्मविचार । तोचियेथेंप्रस्तोतार । सुखसमाधीनिर्विकार । अवभृथजाणनारदा ॥९॥

एवंप्रकारेंहायज्ञ । करुंशकेकेवींअज्ञ । तदर्थमोठाजपयज्ञ । निर्मिलाजाणईश्वरें ॥१०॥

गायत्रीचाकीजेजप । यांहूननसेंदुजेंतप । सर्वसिद्धीआपोआप । प्राप्तहोतीब्राम्हणा ॥११॥

गायत्रीविप्रदैवत । गायत्रीमोठीदयावंत । गायनेंब्राम्हणांतारित । तेणेंनामगायत्री ॥१२॥

गायत्रीविप्राचेंइष्ट । गायत्रीदेत अभिष्ट । गायत्रीनाशीअनिष्ट । जपकर्त्याब्राम्हणाचे ॥१३॥

विप्रनाहींशैवसौर । गाणपत्यनाद्विजवर । वष्णवनसेनिर्धार । शाक्तजाणविप्रहे ॥१४॥

गायत्रीहीमहाशक्ती । विप्रांगायत्रीमंत्रदेती । तेणेंचविप्रत्वयाप्रती । गायत्रीचेपुत्रहें ॥१५॥

गायत्रीवेदाचीमाता । तोविप्राचेदिलाहातां । मातृधनाचाभोक्ता । पुत्र असेंस्पष्टत्वें ॥१६॥

ब्रम्हपुत्रहेब्राम्हण । ब्रम्हपत्नीगायत्रीजाण । सर्वांचापिताब्राम्हण । सर्वशाक्तयाकरितां ॥१७॥

लोकींवाढलीभ्रांती । शाक्तम्हणतादोषदेती । बुडालीकींशक्तिभक्ती । कलीतेणेंमाजला ॥१८॥

मनुष्यमात्रांचेंघरीं । कुलदेवीचानिर्धारी । तीविसरुनपरोपरी । पूजितीअन्यदेवतां ॥१९॥

सहजबोलतीवृद्धाचार । कुलदेवतेसींनमस्कार । कराम्हणतींअगोदर । कुलदेवासनम्हणती ॥२०॥

जीसर्वांतर्यांमिनीं । त्राणशक्तिस्वरुपिणी । तिजलागीविसरुनी । सुखवांछितींमूढहें ॥२१॥

नारायणम्हणेनारदा । सर्वव्यापिनीशारदा । तिच्याध्याउनिपादारविंदा । सदाचारेंवर्तांवें ॥२२॥

आचारहाप्रथमधर्म । धर्मरुपकरावेंकर्म । कायावाचामनेंअधर्म । सुखीव्हावेंटाकुनी ॥२३॥

धर्माचीप्रभूईश्वरी । तीत्यावरीकृपाकरी । धर्मादिपुरुषार्थचारी । कृपायुक्तादतसे ॥२४॥

हेंआचाराचेंआख्यान । जोकरीभक्तीनेंश्रवण । तोहोय आचारसंपन्न । देवींकृपेंनारदा ॥२५॥

तुझेंप्रश्नाचेउत्तर । वर्णिलाविप्र आचार । आणीककायमनोहर । ऐकूंइच्छिसीसांगपा ॥२६॥

हेंएकादशस्कंदचरित । व्यासवदेनृपाप्रत । सूतसांगेशौनकाप्रत । दिव्यचरित्र अंबेचें ॥२७॥

अष्टोत्तरदोनशत । दिव्यश्लोकभागवत । एकादशस्कंदसमाप्त । झालायेथेंअंबकृपें ॥२८॥

श्रीदेवीविजये एकादशेषष्ठः ॥६॥

इति श्रीदेवीविजये एकादश स्कंदः समाप्तः ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP