एकादश स्कंध - अध्याय पांचवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । मध्यांन्हसंध्येचध्यान । सावित्रीयुवागौरवर्ण । चतुर्भुजात्रिलोचन । वराक्षमालाशूल अभये ॥१॥

रुद्राचिहीदेवता । यजुर्वेदसंहिता ।  वृषवाहनतमयुता । भुवर्लोकचारिणी ॥२॥

ऐसेंकीजेंध्यान । पुष्पबिल्वंजलदान । एक अर्ध्य उभ्यान । सूर्यालागींदेइजे ॥३॥

जपादिसर्वकरुन । मगकीजेब्रम्हयज्ञ । देवऋषीपितृतर्पण । वैश्वदेवमगकीजे ॥४॥

पेषणकंडनपाखडणें । जल अग्नीपेटविणें । पांचहत्यानिवारणें । वैश्वदेवेंनासती ॥५॥

अतिथीसद्यावेंअन्न । सर्वांसहकीजेंभोजन । गोग्रासकाढिल्यावाचून । भोजनकदांनकीजें ॥६॥

गुरु अग्निप्रजामाता । अभ्यागत अतिथीपिता । दास आश्रित आणिभ्राता । पोंष्यवर्गहासर्व ॥७॥

ब्रम्हचारीआणियती । हेतोंपक्वांनाचेपती । यांशीनदेतांभक्षिती । नर्कतयाअवश्य ॥८॥

आहारार्थजेंकल्पिलें । वैश्वदेवतेणेंचिबोलें । गृहस्थानीअवश्यकेले । पाहिजेनित्यवैश्वदेवा ॥९॥

भिक्षेसीयेतांयतीश्वर । वैश्वदेवाअसतांउशीर । अन्नकाढूनसत्वर । भिक्षादेणेंभिक्षूसी ॥१०॥

वैश्वदेवकृतदोषाशी । यतीसमर्थतोनाशी । यतीचेकृतापराधासी । वैश्वदेवनासूंनशके ॥११॥

जोकरीपंचमहायज्ञ । तोचिविप्रसदाधन्य । पूज्य आणिसर्वमान्य । गृहस्थतोचिजाणिजे ॥१२॥

आठभागएकदिन । पांचवेंभागींभोजन । सहासात ऐकेंपुराण । व्यवहार आठवा ॥१३॥

नदीतीरींसरोवरी । पुण्यस्थानींमंदिरी । सायंसंध्याबाहेरी । करावीजाणनारदा ॥१४॥

वृद्धरुपासरस्वती । कृष्णवस्त्राकृष्णकांती । शंखचक्रगदाशोभती । पद्मासहचतुर्भुजा ॥१५॥

अनेकरत्नेंभूषणें । मुकुटादीआभरणे । पीतांबरकेलाधारणें । सच्चिदानंदरुपिणी ॥१६॥

सत्वगुणानेंसंपन्न । सामवेदकरीगायन । गरुडजिचेंवाहन । ध्यान एवंकरावें ॥१७॥

एवंसंध्योपासन । कालींकालींकरुन । ऋतुकालींभार्यागमन । रात्रींकीजेसुखानें ॥१८॥

गायत्रीचेपुरश्चरण । अवश्यकरावेंजाण । तपहेंचीविप्रधन । आळसयेथेंनकीजे ॥१९॥

चौतीस आणिएकशत । श्लोकेंसंध्यादिसांगत । येथेंसंग्रहकिंचित । सूचनार्थहोतसे ॥२०॥

श्रीदेवीविजयेएकादशेपंचमः ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP