हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
त्रिपुष्करयोग

त्रिपुष्करयोग

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


त्रिपादर्क्ष तिथिर्भद्रा भामार्कशनिवासरे ।

तदा त्रिपुष्करो योगो द्वयोर्योगे द्विपुष्करः ॥१३८॥

पुनर्वसूत्ताराषाढा कृत्तिकोत्तरफाल्गुनी ।

पूर्वाभाद्रविशाखा च ज्ञेयमेतात्रिपादभम् ।

मृगचित्राधनिष्ठा च ज्ञेयमेतद् द्विपादभम् ।

दद्यात्तद्दोषनाशाय गोत्रयं मूल्यमेव वा ।

द्विपुष्करे द्वयं दद्यान्न दोषस्त्वृक्षमात्रतः ॥१४०॥

भौमवार , रविवार आणि शनिवार ह्या वारांपैकीं कोणत्याही वारीं भद्रातिथि म्हणजे द्वितीया , सप्तमी किंवा द्वादशी असेल ; आणि त्रिपाद नक्षत्रांपैकीं म्हणजे कृत्तिका , पुनर्वसु , उत्तरा , विशाखा , उत्तराषाढा , आणि पूर्वाभाद्रपदा ह्या नक्षत्रांतून एकादें नक्षत्र असेल तर त्या तिहींच्या संयोगाला त्रिपुष्करयोग म्हणावें . तसेंच , त्याच वारीं त्याच तिथि , म्हणजे भद्रातिथि असून द्विपाद नक्षत्रांतून म्हणजे मृग , चित्रा आणि धनिष्ठा ह्यांतून एकादें नक्षत्र असतां द्विपुष्करयोग होतो . त्रिपुष्करयोगावर जन्म , मृत्यु किंवा लाभ झाला असतां तीन वेळ पुनः त्याप्रमाणें होतें आणि द्विपुकर योगावर दोन वेळ होतें , असें मानिलेलें आहे . परंतु शांतीनें तो दोष दूर होतो असेंही सांगितलें आहे . त्रिपुष्करयोगावर मृत्यु घडला किंवा वस्तु नष्ट झाली तर तद्दोषपरिहारार्ध हिरण्यद्वारा तीन गोप्रदानें करावीं . द्विपुष्करयोगावर झाल्यास दोन करावीं . पण केवळ त्रिपाद नक्षत्र किंवा द्विपाद नक्षत्र असेल तर पूर्वोक्त तिथिवारांवांचून नुसत्या नक्षत्राचा दोष मानूं नये .

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP