हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
करणविचार

करणविचार

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


तिथिं च द्विगुणीकृत्य एकहीनं च कारयेत् ।

सप्तभिश्च हरेद्भागं शेषं करणमुच्यते ॥१०५॥

बवश्च बालवश्चैव कौलवस्तैतिलस्तथा ।

गरश्च वणिजो विष्टिः करणानि जगुर्बुंधाः ॥१०६॥

अंते कृष्णचतुर्दश्यां शकुनी दर्शभागयोः ।

ज्ञेयं चतुष्पदं नागं किंस्तुघ्नं प्रतिपद्दले ॥१०७॥

करण म्हणजे तिथीचा अर्ध भाग ; अर्थात् एका तिथीस दोन करणें भोगतात . शुक्लप्रतिपदेपासून तिथी पूर्ण झाल्या असतील त्यांची दुप्पट करुन त्यांत एक कमी करावा . बाकी अंक राहतील त्यांस सातांनीं भागावें . जो अंक बाकी उरेल तें कारण शेवटच्या पूर्ण तिथीच्या उत्तरार्धाचें समजावें . करणें एकंदर अकरा आहेत . १ बव २ बालव ३ कौलव ४ तैतिल ५ गर ६ वणिज ७ विष्टि ८ शकुनी ९ चतुष्पाद १० नाग आणि ११ किंस्तुघ्न . यांपैकीं पहिलीं सात करणें चल करणें आहेत व तीं अनुक्रमानें शुक्लप्रतिपदेच्या उत्तरार्धापासून कृष्णचतुर्दशीच्या पूर्वार्धाच्या समाप्तीपर्यंत असतात . हीं सात करणेंच महिन्यांतून पुनः पुनः आठ वेळां येतात . शकुनी , चतुष्पाद , नाग आणि किंस्तुघ्न ह्या चार करणांस स्थिर करणें म्हणतात , त्याची व्यवस्था अशी - शकुनी करण हें नेहमीं कृष्णचतुर्दशीच्या उत्तरभागांत मात्र येतें ; इतर दिवशीं असत नाहीं . अमावास्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे चतुष्पादकरण , अमावास्येचा उत्तरार्ध म्हणजे नाग करण आणि शुक्ल प्रतिपदेचा पूर्वार्ध म्हणजे किंस्तुन्घ करण असें समजावें . शुक्लप्रतिपदेच्या उत्तरभागांत बव , पुढें द्वितीयेस बालव आणि कौलव , तृतीयेस तैतिल आणि गर इत्यादि . याप्रमाणें करणांची नित्य स्थिति असते .

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP