हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
शुभाशुभ कल्याणी

शुभाशुभ कल्याणी

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


चंद्रपरत्वें शुभाशुभ कल्याणी .

मेषत्रये वृश्चिकेंदौ स्वर्गे भद्रा प्रकीर्तिता ।

कन्याद्वये धनुर्युग्मे चंद्रे भद्रा रसातले ॥१३२॥

कुंभे मीने तथा कर्के सिंहे चंद्रे भुवि स्थिता ।

भूर्लोकस्था सदा त्याज्या स्वर्गपातालगा शुभा ॥१३३॥

मेष , वृषभ , मिथुन आणि वृश्चिक या चार राशींस चंद्र असतां कल्याणी असेल तर ती स्वर्गलोकीं आहे असें जाणावें . तसेंच कन्या , तूळ , धनु , आणि मकर या राशींचा चंद्र असतां कल्याणी पाताळीं आहे असें समजावें . आणि कुंभ मीन , कर्क व सिंह या राशींस चंद्र असतां भूलोकीं आहे असें जाणवें . भूलोकीं कल्याणी असतां तिचें फल अशुभ कल्पिलेलें आहे , म्हणून ती सर्व कार्यांना वर्ज्य करावी . कल्याणी स्वर्ग व पातळ या लोकीं असतां तिचें फळ शुभ . म्हणून ती शुभ कृत्यास ग्राह्य होय असें जाणावें . पंचांगांत भद्राप्रवृत्ति ( भ ० प्र ० ) म्हणजे कल्याणीचा आरंभ काळ व भद्रानिवृत्ति ( भ ० नि ० ) म्हणजे कल्याणीचा समाप्तिकाळ हे दाखविलेले असतात .

कल्याणीच्या दोषांचा अपवाद .

तिथेः पूर्वार्धजा रात्रौ दिने भद्रा परार्धजा ।

भद्रा दोषो न तत्र स्यात्कार्येऽत्यावश्यके सति ॥१३४॥

ज्या तिथींच्या पूर्वाधीं भद्रा असते असें वर लिहिलें आहे , तो पूर्वार्ध रात्रीमध्यें असेल तर , किंवा ज्या तिथींच्या उत्तरार्धी भद्रा असते असें वर सांगितलें आहे तो उत्तरार्ध दिवसाचे ठायीं असेल तर , त्या कल्याणीचा दोष शुभ कार्याला मानूं नये .

विष्टींत कोणतीं कर्में करावी .

वधबंधविषाग्न्यस्त्रच्छेदनोच्चाटनादि यत् ।

तुरंगमहिषोष्ट्रादि कर्म विष्टयां ति सिध्यति ॥१३५॥

प्राण्यांचा वध , बंधन , विषप्रयोग , अग्निप्रयोग , शस्त्रकर्म , तोडणें , उच्चाटन , घोडे , रेडे , उंटें इत्यादिकांसंबंधी कर्में विष्टीमध्यें म्हणजे कल्याणीमध्यें करावीं .

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP