हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
नक्षत्रावरुन चंद्र किंवा राशि पहाण्याची रीति

नक्षत्रावरुन चंद्र किंवा राशि पहाण्याची रीति

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


सपादर्क्षे द्वयं भोगो मेषादीनामनुक्रमात् ॥

मागें सांगितलेंच आहे कीं , नक्षत्रें सत्तावीस आहेत व राशि बारा आहेत . अर्थात् सवादोन नक्षत्रें मिळून एक राशि होते . म्हणजे सवादोन नक्षत्रें संपत तोंपर्यंत चंद्र एकाच राशींत असतो . एकाद्या मनुष्याच्या जन्मकाळीं ज्या राशीस चंद्र असतो , तीच त्या मनुष्याची राशि ( रास ) होय असें समजावें . रोज कोणत्या राशीस चंद्र असतो , हें पंचांगांत शेवटच्या कोष्कांत दाखविलेलें असतें . प्रत्येक नक्षत्राचे चार भाग म्हणजे चार चरण कल्पिलेले आहेत . चरणाला पाद अशीही संज्ञा आहे . उदाहरणार्थ , एक पाद म्हणजे पाव नक्षत्र , द्विपाद म्हणजे अर्धनक्षत्र , त्रिपाद म्हणजे तीन चतुर्थाश नक्षत्र , याप्रमाणें समजावें .

मेषोऽश्विनी च भरणी कृत्तिकाप्रथमं दलम् ।

त्रिः कृत्तिका रोहिणी च मृगार्ध वृषभस्तथा ॥१०८॥

मृगार्धार्द्रा पुनर्वस्वस्त्रिपादमिथुनाभिधः ।

वस्वंत्यचरणं पुष्यो ह्याश्लेषा कर्कटाभिधः ॥१०९॥

मघा पूर्वोत्तरापादं सिंहराशिः प्रकीर्तितः ।

उत्तरात्रितयं हस्तश्चित्रार्ध कन्यका स्मृता ॥११०॥

चित्रार्धे स्वातिनक्षत्रं विशाखात्रितयं तुला ।

विशाखांत्यानुराधा च ज्येष्ठांतं वृश्चिकाभिधः ॥१११॥

मूलपूर्वोत्तराषाढा पादमेकं धनुः स्मृतम्। ।

नक्रस्ञ्युषाढा श्रवणं धनिष्ठार्धे तथैव च ॥११२॥

कुभ्भो धनिष्ठा तारा च पूभापादत्रयं तथा ।

पादं पूभा उभा रेवत्यंतं मीनः प्रकीर्तितः ॥११३॥

 

कोणत्या राशीस कोणती नक्षत्रे भुक्त किती होतात याचे कोष्टक

चंद्र राशी - मेष

अश्विनी - पूर्ण

भरणी - पूर्ण

कृत्तिका - १ / ४

चंद्र राशी - वृषभ

कृत्तिका - ३ / ४

रोहिणी - पूर्ण

मृग - १ / २

चंद्र राशी - मिथुन

मृग - १ / २

आर्द्रा - पूर्ण

पुनर्वसु - ३ / ४

चंद्र राशी - कर्क

पुनर्वसु - १ / ४

पुष्य - पूर्ण

आश्लेषा - पूर्ण

चंद्र राशी - सिंह

मघा - पूर्ण

पूर्वा - पूर्ण

उत्तरा - १ / ४

चंद्र राशी - कन्या

उत्तरा - ३ / ४

हस्त - पूर्ण

चित्रा - १ / २

चंद्र राशी - तूळ

चित्रा - १ / २

स्वाती - पूर्ण

विशाखा - ३ / ४

चंद्र राशी - वृश्चिक

विशाखा - १ / ४

अनुराधा - पूर्ण

ज्येष्ठा - पूर्ण

चंद्र राशी - धनु

मूळ - पूर्ण

पूर्वाषाढा - पूर्ण

उत्तराषाढा - १ / ४

चंद्र राशी - मकर

उत्तराषाढा - ३ / ४

श्रवण - पूर्ण

घनिष्ठा - १ / २

चंद्र राशी - कुंभ

घनिष्ठा - १ / २

शततारका - पूर्ण

पूर्वाभाद्रपदा - ३ / ४

चंद्र राशी - मीन

पूर्वाभाद्रपदा - १ / ४

उत्तराभाद्रपदा - पूर्ण

रेवती - पूर्ण

कोणत्या राशीस कोणतीं नक्षत्रें किती भुक्त होतात , हें वरील कोष्टकावरुन ध्यानांत येईल . उदा ० अश्विनी नक्षत्र पूर्ण , भरणी पूर्ण , आणि कृत्तिकांचा एक चरण अशीं सव्वादोन नक्षत्रें संपलीं , म्हणजे चंद्राचें मेष राशींतील भ्रमण पूर्ण झालें . त्याचप्रमाणें इतर राशींचें समजावें . तसेंच , एकाद्याचें जन्मनक्षत्र समजलें म्हणजे त्यावरुन त्याची कोणती राशि असावी हेंही वरील कोष्टकावरुन सहज समजेल .

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP