मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|डिसेंबर मास| डिसेंबर ३० डिसेंबर मास डिसेंबर १ डिसेंबर २ डिसेंबर ३ डिसेंबर ४ डिसेंबर ५ डिसेंबर ६ डिसेंबर ७ डिसेंबर ८ डिसेंबर ९ डिसेंबर १० डिसेंबर ११ डिसेंबर १२ डिसेंबर १३ डिसेंबर १४ डिसेंबर १५ डिसेंबर १६ डिसेंबर १७ डिसेंबर १८ डिसेंबर १९ डिसेंबर २० डिसेंबर २० डिसेंबर २२ डिसेंबर २३ डिसेंबर २४ डिसेंबर २५ डिसेंबर २६ डिसेंबर २७ डिसेंबर २८ डिसेंबर २९ डिसेंबर ३० डिसेंबर ३१ भगवंत - डिसेंबर ३० ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल. Tags : bhagawantbrahmachaitnya maharajgondavaleगोंदवलेब्रह्मचैतन्य महाराजभगवंत शेवटी करावी प्रार्थना एक । Translation - भाषांतर सकाळीं लवकर उठावें । भगवंताचें स्मरण करावें । हातपाय स्वच्छ धुवावे । मानसपूजा करावी ॥ ह्रदयांत ठेवावें रामाचें ठाण । षोडशोपचारें करावें पूजन ॥ गंध, फूल करावें अर्पण । नैवेद्य करावा अर्पण । मनानें प्रसाद घ्यावा जाण ॥ शेवटीं करावी प्रार्थना एक । ‘ रामा, तुला मी शरण देख ॥ जें जें म्हटलें मी माझें । तें तें रामा तुझें ॥ आतां न गुंतवा माझें मन । रामा, मी आलों तुला शरण । वासना न उठो दुजी कांहीं । नामामध्यें प्रेम भरपूर देईं ॥ सदा राखावें समाधान । जें तुझें कृपेवांचून नाहीं जाण ॥ नीतिधर्माचें आचरण । तुझे कृपेनें व्हावें जतन ॥ न मागणें आतां कांहीं । मी तुझ्यासाठीं जिवंत पाहीं । आतां द्या नामाचें अखंड स्मरण । देह केला तुला अर्पण ॥ रामा, जें जें कांहीं तूं करी । त्यांत समाधानाला द्यावें पुरी । आतां, रामा, एकच करीं । तुझा विसर न पडो अंतरीं ॥ तुझे नामाची आवडी । याहून दुजें मागणें नसावें उरी ॥ हेंचि द्यावें मला दान । दीन आलों तुज शरण ॥ रामा, मला एकच द्यावें । तुझें अनुसंधान टिकावें ॥ नको नको ब्रह्मज्ञान । काव्य-शास्त्र-व्युत्पत्तीचें ज्ञान ॥ कामक्रोधाचे विकार । जाळताती वारंवार ॥ आतां तारीं अथवा मारीं । तुझी कास कधीं न सोडीं ॥ आतां, रामा, तुझा झालों । कर्तेपणांतून मुक्त झालों ॥ माझें सर्व तें तुझें पाहीं । माझें मीपण हिरोनि जाई ॥ रामा, आतां एकचि करीं । वृत्ति सदा राहो तुझेवरी ॥ रामा, मीं कोठें जावें? । तुजवांचून कोठें राहावें? ॥ देहबुद्धीची नड फार । ती करावी रामा तुम्ही दूर ॥ आजवर विषय केला आपलासा । न ओळखतां पडलों त्याच्या फांसा ॥ रामा, सर्व सत्ता तुझ्या हातीं । समाधान राहील अशी करावी वृत्ति ॥ तुझेजवळ मागणें दुजें नाहीं । ह्रदयांत तुझा वास अखंड राही । आतां तुझ्यासाठीं माझें जीवन । तुला तनमन केलें अर्पण ॥ तुमचे चिंतनीं लागावें मन । कृपा करा रघुनंदन ॥ ’ ऐसें करावें रामाचें स्तवन । रक्षणकर्ता एक भगवंत मनीं आणून ॥ ऐसें व्हावें अनन्य दीन । तात्काळ भेटेल रघुनंदन ॥नामापरतें न माना दुजें साधन । जैसें पतिव्रतेस पति प्रमाण ॥ नामापरतें न मानावें सत्य । ज्यानें राम होईल अंकित ॥ हेच सर्व साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥ नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण । मनीं असो, नसो, करावें नामस्मरण ॥ नामाविण दुजें काहीं । सत्य सत्य त्रिवाचा नाहीं ॥ N/A References : N/A Last Updated : February 15, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP