मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|डिसेंबर मास| डिसेंबर १० डिसेंबर मास डिसेंबर १ डिसेंबर २ डिसेंबर ३ डिसेंबर ४ डिसेंबर ५ डिसेंबर ६ डिसेंबर ७ डिसेंबर ८ डिसेंबर ९ डिसेंबर १० डिसेंबर ११ डिसेंबर १२ डिसेंबर १३ डिसेंबर १४ डिसेंबर १५ डिसेंबर १६ डिसेंबर १७ डिसेंबर १८ डिसेंबर १९ डिसेंबर २० डिसेंबर २० डिसेंबर २२ डिसेंबर २३ डिसेंबर २४ डिसेंबर २५ डिसेंबर २६ डिसेंबर २७ डिसेंबर २८ डिसेंबर २९ डिसेंबर ३० डिसेंबर ३१ भगवंत - डिसेंबर १० ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल. Tags : brahmachaitnya maharajgondavaleगोंदवलेनामब्रह्मचैतन्य महाराज राम ठेवील त्यांत समाधान राखावें । Translation - भाषांतर प्रपंचीं राहून समाधान । हेंच मोठें ज्ञानाचें ज्ञान ॥ भगवंताचा हात जेथें । समाधान सुख राहातें तेथें ॥ राम ठेवील त्यांत समाधान राखावें । हाच सुखी होण्याचा मार्ग जाण ॥ रामापायीं अनन्य झाला । समाधान चालत येई घराला ॥ ज्याचे अंतःकरणांत समाधान । तेथें भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ति जाण ॥ आपलें असमाधान होण्याचें कारण । रामाहून दुसर्याचें झालों आपण ॥ उपाधिरहित रामास पाहावें । मध्यंतरीं चित्त कोठें न गुंतवावें ॥ चित्त गुंततां मध्यस्थळीं । परमात्म्याची प्राप्ति दुरावली ॥ भगवंताचें स्मरण । तसेंच भगवंताचें आगमन । पुण्याईशिवाय घडत नाहीं जाण । श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास । समाधान राखावें खास ॥ दाता एक रघुनंदन । हा भाव ठेवावा मनांत । त्यास दैन्यपण न येईल जगांत ॥ धर्माचें रक्षण । ठेवतां परमात्म्याचें स्मरण ॥राम आपल्या दासावरी । नित्य कृपा करी ॥ राम परमात्मा कृपा करतो । सर्व चुकीची क्षमा करतो ॥ पुन्हा वाईट न वागावें । याबद्दल जबाबदारीनें वर्तावें ॥ ‘ अंतीं घेतां माझें स्मरण । मी उद्धरीन त्यास आपण ’ । हें खुद्द भगवंताचें वचन । तेथें नसावें शंकेचें कारण ॥ रघुनाथावांचून सुखी झाला । असा नाहीं कोणीं पाहिला, ऐकिला ॥ मीपणाचा सोडावा अभिमान । तोच एक भगवंताचा झाला जाण ॥ राजाची झाली भेट । खालच्यांचें नाहीं महत्त्व तेथें । तैसें जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें ॥ आजवर रामानें सांभाळ केला । तो आजहि नाहीं निजलेला ॥ पण त्याची जागृति । असे आमचें हातीं ॥ काळावर ज्याची सत्ता । त्याचे चरणीं ठेवावा माथा । मग धोका नाहीं ही मानावी सत्यता ॥ राम ज्याच्या ह्रदयीं करी वास । तेथें ऋद्धिसिद्धी पडल्या ओस ॥ निःस्वार्थापाशीं भगवंत । हा जाणावा सिद्धांत ॥ राम कर्ता हा ठेवावा भाव । कमीपणाला नाहीं ठाव ॥ कर्तव्य करावें निःस्वार्थबुद्धीनें । राम खूष होईल त्यानें ॥ ज्याला नाहीं दुसरा उपाय । तेथें मागावें भगवंताचें साहाय्य ॥ परमात्मा ज्याचा साह्यकारी । त्यास धोका नाहीं तिळभरीं ॥ देह आहे परतंत्र । मन राखावें भगवंताशीं स्वतंत्र ॥ विषयरहित मारावी हांक । तुमचे समोर माझा दाशरथि राम ॥ रामानें करावें सर्वांचे कल्याण । दुष्टास सुबुद्धि देऊन जाण ॥ दीनदयाळु परमात्मा राम खास । न ठाव द्यावा विकल्पास ॥ त्याच्याशीं वागावें सत्य । कृपा करील भगवंत ॥ अखंड करा नामस्मरण । जेणें कृपा करील रघुनंदन ॥ N/A References : N/A Last Updated : November 07, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP