मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|डिसेंबर मास| डिसेंबर २० डिसेंबर मास डिसेंबर १ डिसेंबर २ डिसेंबर ३ डिसेंबर ४ डिसेंबर ५ डिसेंबर ६ डिसेंबर ७ डिसेंबर ८ डिसेंबर ९ डिसेंबर १० डिसेंबर ११ डिसेंबर १२ डिसेंबर १३ डिसेंबर १४ डिसेंबर १५ डिसेंबर १६ डिसेंबर १७ डिसेंबर १८ डिसेंबर १९ डिसेंबर २० डिसेंबर २० डिसेंबर २२ डिसेंबर २३ डिसेंबर २४ डिसेंबर २५ डिसेंबर २६ डिसेंबर २७ डिसेंबर २८ डिसेंबर २९ डिसेंबर ३० डिसेंबर ३१ भगवंत - डिसेंबर २० ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल. Tags : bhagawantbrahmachaitnya maharajgondavaleगोंदवलेब्रह्मचैतन्य महाराजभगवंत नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावें सत्य ॥ Translation - भाषांतर प्रारब्धानुसार देहाची गति । तेथें न गुंतवावी आपली वृत्ति ॥ प्रारब्धाने देहाची स्थिति । आपण न पालटूं द्यावी वृत्ति ॥ देह प्रारब्धानें जातो । सुखदुःख भोगवितो ॥ जें जें काहीं केलें । तें तें फळाला आलें । म्हणून देहाची गति । ते पालटणें नाहीं कोणाचे हातीं ॥ पांडव परमात्म्याचे सखे झाले । तरी वनवासांतून मुक्त नाहीं झाले ॥ सुदामा भगवंताचा भक्त झाला । पण दारिद्र्यांतच राहिला ॥ म्हणून देह प्रारब्धावर टाकावा । जें होईल तो आनंद मानावा ॥ जैसें दुःख येते प्रारब्धयोगें । सुख आहे त्याचे मागें ॥ दोहोंची न धरावी चाड । नामाची ठेवावी आवड ॥ चित्त ठेवावें भगवंतापायीं । प्रारब्ध आड येऊं शकत नाहीं ॥ देहाचे भोग देहाचे माथां । कष्ट न होती रघुनाथ स्मरतां ॥ प्रारब्धानें आलेलें कर्म करीत जावें । त्याचें फळ भगवंताकडे सोपवावें ॥ साधुसंत देवादिक । हे प्रारब्धांतून नाहीं सुटले देख ॥ जीवनांतील आघात प्रारब्धाचे अधीन । समाधान नसावें त्याचेवर अवलंबून । त्यांत रामाचें स्मरण देईल समाधान ॥ दुष्टाची संगति प्रारब्धानें जरी आली । तरी रामकृपेखालीं दूर गेली ॥मुखीं असावें एक नाम । याहून दुजें पुण्य नसे जाण ॥ नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावें सत्य । हा निश्चय ठेवावा मनांत । मन होईल निभ्रांत ॥ कर्तव्यीं असावें तत्पर । मुखीं नाम निरंतर ॥ नामाचें प्रेम करावें जतन । जैसा कृपण राखी धन । कारण नामच आपल्याला तारण ॥ मुखीं रामाचें नाम । बाह्य प्रपंचाचें काम । ऐसा राम जोडा मनीं । दुःखाचा लेश न आणावा मनीं ॥ आजवर राहिला वासनेचा आधार । आतां नामावर प्रेम ठेवा पुरेपूर ॥ असती पुण्याच्या गांठी । तरच नाम येईल कंठीं ॥ रामाचें नांव ज्याला न होईल सहन । त्याची गति नाहीं उत्तम जाण ॥ निर्हेतुक घ्यावें नाम । जेणें जोडेल आत्माराम ॥ नामाविण जें जें साधन । तें तें कष्टास मात्र कारण ॥ देह जरी नाशिवंत । सांगितलेंलें नाम आहे सत्य । बुद्धि करावीं स्थिर । नामीं असावें प्रेम अनिवार ॥ नामांत कसलेही विचार आले । तरी ते नामानें दूर सारावे भले ॥ नामस्मरणीं निदिध्यास । स्थूलाची न करावी आस ॥ अखंड राखावें समाधान । हीच परमार्थाची खरी खूण जाण ॥ जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें । बाकी कितीजण आले गेले । मनावर त्याचा होऊं न द्यावा परिणाम ॥ परमार्थाला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥ N/A References : N/A Last Updated : February 15, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP