Dictionaries | References आ आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा Script: Devanagari Meaning आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एखाद्या मनुष्याला काम करावयास सांगावे तर तो उलट म्हणतो, आधी प्रथम माझी तरतूद करा, मग पुढें तुमच्या कामाचे पाहूं. म्हणजे प्रथम आपले काम बाजूला ठेवून त्याची तजवीज आधी केली पाहिजेनंतर आपल्या कामाची गोष्ट. तेव्हां आपले काम बाजूस राहून प्रथम आधी त्याचीच व्यवस्था करावयाची पाळी येते. २. एखाद्याला काम सांगावयाचे तर प्रथम त्यास कार्यक्षम केले पाहिजे, तरच मग त्याचेकडून वाटेल तेवढे काम करून घेतां येईल. एकदां पोट भरल्यावर गाडाभर कामहि रेटल पण उपाशी पोटी कोणी काही करू शकत नाही. तेव्हां प्रथम जरूर ती त्याची तरतूद केली पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP