Dictionaries | References

राजा

ना.  छत्रपती , नरेंद्र , नरेश , नृप , नृपती , प्रजापती , भूपती , भूपाल , महिपाल .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
, वृक्षराज. Of the compounds bearing the first sense, kingi. e. regal or royal, the most approved have occurred above; some others, not demanding interpretation, are राजकांति, राजशोभा, राजकृपा, राजचित्त, राजमित्र, राजप्रिय, राजाश्रय, राजाश्रित, राजबुद्धि, राजसखा, राजरंग, राजमहाल, राजवाटी. 4 A term for an idiot or a silly fellow. 5 Applied to the

 पु. १ नृप ; नृपति ; भूपाल ; नरेंद्र ; छत्रपति ; लहान राज्यें व थोडक्या प्रजा असलेले संस्थानिक व सरदार यांसहि हा शब्द लागतो . २ ( मंडळीचा , टोळीचा ) नायक ; मुख्य . ३ सजातीय पदार्थसमुच्चयांत श्रेष्ठ मानलेला तो . ४ अन्न , वस्त्र इ० पदार्थ यथास्थित असल्यामुळें ते मिळविण्याचे कष्ट किंवा काळजी ज्यास करावी लागत नाहीं असा मनुष्य . ५ गंजिफांच्या बाजूंतील मुख्य . पत्त्यांतील एक चित्राचें पान . ६ बुध्दिबळाच्या खेळांत डावांतील मुख्य मोहरा . ७ वर्षाचा शास्ता म्हणून मानलेला ग्रह ; वर्षेशग्रह . ८ ( ल . ) वेडा ; मूर्ख ; स्वेच्छ वर्तन करणारा मनुष्य . ९ कसरीच्या राणीस म्हणतात . ( समासांत ) राजपत्नी ; राजपुत्र ; राजकन्या ; राजगुरु ; राजपुरोहित ; राहोपाध्याय ; राजसभा इ० ह्याचे मराठी शब्दाशींहि समास झाले आहेत . जसें . राजपसंत ; राजदरबार इ० . राजपद उत्तरपदीं येणारे नायक या अर्थाचे कांहीं सामासिक शब्द - मृगराज = मृगश्रेष्ठ ; तीर्थराज = तीर्थापैकीं मुख्य , सागर किंवा प्रयाग ; तसेंच गजराज ; सर्पराज ; अश्वराज ; द्विजराज ; देवराज ; कविराज ; वैद्यराज ; पंडितराज ; स्वामिराज ; गणराज ; भूतराज ; यक्षराज ; वनराज ( आपटा किंवा शमी ), वृक्षराज . राजपद पूर्वपदीं असलेले कांहीं सामासिकशब्द - राजक्रांति ; राजशोभा ; राजकृपा ; राजचित्त ; राजमित्र ; राजप्रिय ; राजाश्रय ; राजाश्रित ; राजबुध्दि ; राजसखा ; राजरंग ; राजमहाल ; राजवटी इ० [ सं . राज् ‍ = प्रकाशणें ] ( वाप्र . ) राजापासून रंकापर्यंत - श्रीमंतापासून तों गरीबापर्यंत ; सर्व दर्जाच्या लोकांत . ब्राह्मणाला राजापासून रंकापर्यंत मान मिळत असे . राजा याचें राज असें रूप होऊन झालेले कांहीं सामाशब्द -
०अंबीर  पु. १ ( शृंगारिक काव्य ) गंभीर स्वभावाचा , सभ्य नायक . - वि . बादशाही ; भव्य ; नामी ; उत्कृष्ट ( मनुष्य , देश , पोषाख , बोलण्याची ढब , कोणतीहि गोष्ट ). [ सं . राजा + अर . अमीर ]
०आवळी  स्त्री. आवळीचा एक प्रकार . या झाडास फळें लहान येतात . हीसच हरपररेवडी , रानाअवळी असेंहि म्हणतात .
०कडी  स्त्री. विशिष्ट प्रकारची कानांतील कडी ; एक कर्णभूषण .
०कवि  पु. दरबारी कवि . [ सं . ]
०काज   कारभार - नपु . राज्यकारभार ; राज्यासंबंधीं सर्व प्रकारचें काम .
०कारण   १ राज्यासंबंधीं मसलत ; खोल व गूढ मसलत , कल्पना . राजकारण बहुत करावें । - दा ११ . ५ . १९ . २ गुप्त निमित्त , गूढ ( एखाद्या गोष्टीचें ). भिंतीस किती सारवलें , लिंपलें तरी चीर पडते याचे राजकारण कांहीं समजत नाहीं . ३ शासनसंस्थेसंबंधीं गोष्टी ; राजनीति ; ( इं . ) पॉलिटिक्स . बिझांटबाई तरुण मुलांनीं राजकारणांत पडूं नये असें सांगतात . - केले १ . १९ .
०कारणी वि.  खोल मसलत करणारा ; मुत्सद्दी .
०कारभार  पु. राज्यव्यवस्था .
०कारस्थान  न. राजकीय मसलत , कल्पना , बेत , चतुराई ; राज्याची मसलत .
०कार्य  न. १ राजकीय कर्तव्यें , काम ; राज्याचीं कामें . २ राजाचें काम . ३ राजाचें शासन , कायदा , कृत्य . [ सं . ]
०किंकर  पु. राजाचा चाकर ; सरकारी नोकर , शिपाई , जासूद इ० [ सं . ]
०किशोर  पु. राजाचा मुलगा . [ सं . ] राजकी - पु . राजाचा नोकर . राजकी म्हणती आमुचें घर । - दा १ . १० . ४६ . - वि . राजापासून उत्पन्न होणारी ; राजाच्या संबंधाची ( सत्ता , जुलूम , कृत्यें ). याच्या उलट देवकी . दुसर्‍या राज्यांत गेल्यानें राजकी उपद्रव टाळायास येईल पण देवकी उपद्रवापुढें उपाय चालत नाहीं . [ राजीक ] राजकीय - वि . राजासंबंधीं ; राजाचा ; राजविषयक ( व्यवहार , कारभार , मनुष्य इ० ) [ सं . ]
०कीय  पु. राजद्रोहामुळें तुरुंगांत कैद केलेला राजकारणी पुरुष ; सरकारविरुध्द अराजकता माजविणारा म्हणून कैद केलेला मनुष्य .
कैदी  पु. राजद्रोहामुळें तुरुंगांत कैद केलेला राजकारणी पुरुष ; सरकारविरुध्द अराजकता माजविणारा म्हणून कैद केलेला मनुष्य .
०कीय  पु. सरकारी कैदेंत अडकलेला कैदी ; राजद्रोही बंदिवान .
बंदी  पु. सरकारी कैदेंत अडकलेला कैदी ; राजद्रोही बंदिवान .
०कीय  पु. १ राज्याचें काम . २ राजनीति . [ सं . ]
व्यवहार  पु. १ राज्याचें काम . २ राजनीति . [ सं . ]
०कीय  स्त्री. राजकारणासंबंधीं सभा ; ( इं . ) पोलिटिकल मीटिंग . क्वचित एखादा सरकारी नोकर आपल्या मुलांना राजकीय सभांना जाण्यास प्रतिबंध करतो . - केले १ . २३३ . [ सं . ]
सभा  स्त्री. राजकारणासंबंधीं सभा ; ( इं . ) पोलिटिकल मीटिंग . क्वचित एखादा सरकारी नोकर आपल्या मुलांना राजकीय सभांना जाण्यास प्रतिबंध करतो . - केले १ . २३३ . [ सं . ]
०कुमर   कुंवर कुमरी कुंवरी कुमारी - स्त्री . राजाची कन्या . [ प्रा . ]
०कुमार   कुंवर - पु . १ राजाचा मुलगा ; राजपुत्र . २ पुनर्वसु नक्षत्र . [ सं . ]
०कुल  न. राजघराणें ; राजवंश . [ सं . ]
०केळ   केळी केळें - स्त्रीन . केळीची एक जात व तिचें फळ .
०क्रांत   क्रांती - स्त्रीन . १ राज्याची उलथापालथ ; राज्यव्यवस्थेंत मोठी उलाढाल , खळबळ , बदल . २ युध्द , शत्रूचें आक्रमण इत्यादीमुळें माजलेली गडबड , गोंधळ , वगैरे नासधूस . ३ राजाचा जुलूम , अन्याय . [ सं . ]
०गादी  स्त्री. राजाची गादी ; सिंहासन .
०गुह्य  न. राजाचें किंवा राज्यासंबंधीं गुपित , गुढ ; गुप्त गोष्ट .
०गोंड  स्त्री. ( शहराचा , गांवचा ) मोठा रस्ता .
०गोंड  पु. गोंडांतील एक श्रेष्ठ जात .
०गोंडा  पु. पालखीच्या दांडीला मध्यभागीं लोंबता बांधलेला , हातांत धरावयाचा गोंडा .
०घोस  स्त्री. एक वेल . हिच्या पानांच्या काढयाचा देवी इ० आजारांत उपयोग करितात .
०घोळ  स्त्री. घोळ नामक भाजीची एक जात .
०चिन्ह  न. राजेपणाचें चिन्ह ; राजाचें छत्र , चामर इ० वैभव . २ ( सामुद्रिक ) नशीबीं सिंहासनावर बसण्याचा योग आहे असें दाखविणारी खूण , लक्षणविशेष किंवा विशेष गोष्ट . ( आजानुबाहुत्व इ० ) ३ राजाची मोहोर , शिक्का , किंवा सही ( नाणें , पत्र इ० कांवरील ). ४ ( राजाच्या सह्या अस्पष्ट , वाचण्यास कठिण असतात यावरून ल . ) फरपटयांचें , बिरखुडी , वाईट लपेटीचें , दुर्बोध अक्षर . [ सं . ]
०टिटवी  स्त्री. पिवळसर रंगाची टिटवी .
०तिलक  पु. १ राजांमध्यें श्रेष्ठ ; सार्वभौम राजा . २ राजटिळा . ३ राज्याभिषेक . [ सं . राजा + तिलक ] - तुरा - पु . एक फुलझाड व त्याचें फूल .
०तेज  न. राजाचें सिंहासन . २ राजधानी . किल्ला रायगड राजतख्त . - चित्रगुप्त १६७ .
०त्व  न. राजेपणा ; राजाधिकार ; राजपद . [ सं . ]
०दंड  पु. १ राजानें केलेली शिक्षा . २ राजानें बसविएला दंड . ३ जातिबहिष्कृत केलेल्या मनुष्यास जातींत परत घेतांना त्यानें राजास द्यावयाच्या दंड . ४ राजाच्या हातांतील अधिकारदर्शक काठी .
०दंत  पु. चौकडीचे दांत ; पदार्थ तोडावयाचे दांत ; पुढील दांत . [ सं . ]
०दरबार   १ राजाची कचेरी ; न्यायसभा . २ प्रजेचीं गार्‍हाणी ऐकण्याकरितां बसावयाची राजाची जागा .
०दरबारी वि.  राज्यासंबंधी .
०दर्शन  न. राजाचें दर्शन ; राजाची भेट . राजदर्शन म्हणजे मोठा लाभ . [ सं . ]
०दुहिता  स्त्री. राजाची मुलगी . वर शिशुपाळ ऐकतां । दचकली ते राजदुहिता । - एरुस्व २ . ४१ . [ सं . ]
०दूत  पु. राजाचा नोकर , हुजर्‍या , सेवक ; जासूद . [ सं . ]
०द्रोह  पु. १ सरकाराबद्दल अप्रीति ; राजाविरुध्द कट , बंड ; फितुरी . २ राज्य व राजसत्ता याविरुध्द गुन्हा . ३ ( कायदा ) बादशाहाविरुध्द किंवा ब्रिटिश अमलाविरुध्द द्वेष , तिरस्कार किंवा बेदिली बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांनीं किंवा खुणानीं किंवा इतर रीतीनीं उत्पन्न करणें ; ( इं . ) सिडिशन
०द्वार  न. १ न्यायाच्या कचेरीचा राजवाडा ; राजदरबार . २ राजवाडयाचा दरवाजा . [ सं . ]
०धन   न राजाचा महसूल , उत्पन्न . [ सं . ]
०धर्म  पु. १ राज्यकारभार चालविण्याकरितां मार्गदर्शक असा शास्त्रांत सांगितलेला कायदा , अनुशासन . २ राजास योग्य किंवा शोभणारा गुण , राजगुण . कार्योपदेशकौशल्य , प्रागल्भ्य इ० ). जे राजधर्म सुरतरू सख मखसे सुखद उत्सवद नाकीं । - मोसभा १ . १५ . ३ राजाचें कर्तव्य विशेष काम . [ सं . ]
०धातु  पु. कित्येक कवींनीं लोखंडास हें नांव दिलें आहे .
०धानी   नगरी - स्त्री . राजाचें राहण्याचें मुख्य शहर . [ सं . ]
०धान्य  न. एक धान्य ; सांवा . [ सं . ]
०धारी  पु. एक प्रकारचा तमाशा . - कलावंतखातें ( बडोडें ) १३८ .
०निष्ठ  स्त्री. राजाविषयीं , सरकारविषयीं आदर दाखविणारा .
०निष्ठा  स्त्री. राजासंबंधीं , सरकारसंबंधीं आदर , पूज्यबुध्दि . राज्यपध्दतींतील दोष अधिकार्‍यांच्या नजरेस आणणें हीच खरी राजनिष्ठा . - टिसू २१५ . [ सं . ]
०नीति  स्त्री. १ राजव्यवहारशास्त्र . आन्वीक्षिकी किंवा तर्कविद्या , त्रयी किंवा धर्म विद्या , वार्ता किंवा अर्थविद्या व दंडनीति असे चार राजनीतीचे भेद आहेत . २ नीति ; नीतिशास्त्र . [ सं . ]
०नील   नीळ - न . नीलमणी . [ सं . ] पंचक - न ज्यांत राजापासून जुलूम किंवा नासधूस होते असा ज्योतिषीय गणितानें येणारा काल . अग्निपंचक , चौरपंचक , मृत्युपंचक , हानिपंचक इ० पहा . [ सं . ]
०पट्ट  पु. राजाचा शिरताज ; राजाचें ललाटपट्ट . [ सं . ]
०पत्नी  स्त्री. राजाची स्त्री ; राणी . [ सं . ]
०पत्र   न राजाचें पत्र ; देणगीपत्र , सनद . ब्राह्मण स्थापिले वृत्तिक्षेत्रीं । ते ते अक्षयीं राजपत्रीं । - मुसभा ६ . ५६ . [ सं . ]
०पद  न. राजाचा अधिकार , दर्जा ; राजत्व .
०पध्दति   पध्दत - स्त्री . राजास योग्य अशी रीति , चाल , वहिवाट . [ सं . ]
०पसंत   पसंद - वि . राजे व अमीर उमराव यांस मान्य असणारा ; सर्वोत्कृष्ट ; उंची ; खासा ; नामी . [ सं . राजा + फा . पसन्द ]
०पिंडा  पु. देखणा व छबीदार मनुष्य ; राजबिंडा . [ सं . राजा + पिंड ]
०पीठ  न. १ राजाचें आसन ; राजाचें सिंहासन . २ राजधानीचें शहर . [ सं . ]
०पीढी  पु. ( महानु . ) राजपुरुष . रवमदें पातले राजपीढी । - गस्तो ४३ . [ राजा + पिढी ]
०पुत्र  पु. १ राजाचा मुलगा . २ क्षत्रिय . [ सं . ]
०पुरी  स्त्री. बादशाही शहर ; राजधानी . [ सं . ]
०पुरुष  पु. १ सरकारी अधिकारी , नोकर . २ राजाच्या चाकरींतील कोणीहि लहानमोठा मनुष्य . [ सं . ]
०बंदी  पु. राजकैदी ; राजकीय गुन्हेगार , बंदिवान .
०बनसी वि.  राजवंशाचा . हा हिंदुस्थानी शब्द मराठी लावण्यांतून नेहमीं येतो . [ राजवंशी ; हिं . राजबनसी ]
०बाबती  स्त्री. राजास द्यावयाचा वसुलाचा चौथा भाग . चौथा पहा .
०बिंडा वि.  अतिशय अत्यंत देखणा , सुंदर आणि तेजस्वी ( मनुष्य ). [ राज + पिंड ]
०बिदी  स्त्री. राजमार्ग . इंद्रियग्रामींचा राजबिदीं । - ज्ञा ७ . १०६ .
०बीज वि.  १ राजाच्या बीजाचा , वंशाचा . २ ( ल . ) सुस्वभावी व सुंदर मुलास म्हणतात .
०बीध  स्त्री. ( शहराचा ) मुख्य ; मोठा रस्ता ; राजबिदी .
०बेत   ( को . ) राजदंड . [ राजवेत्र ]
०भाग  पु. राजाचा भाग ; सरकारास द्यावयाचा कोणत्याहि उत्पन्नाचा भाग . [ सं . ]
०भार्या   भाजा - स्त्री . राजाची पत्नी ; पट्टाभिषिक्त राणी . येरु बोले पाहीन पिता माझा । नको जाऊं मारील राजभाजा । - ध्रुवाख्यान ४ ( नवनीत पृ . ४११ ). [ सं . ]
०भोग  पु. सरकाराचा हक्क . [ सं . ]
०भ्रष्ट वि.  राज्यावरून निघालेला .
०मंडल   मंडळ - न . १ राजांचा समुदाय . २ राजकीय मंडल ; राजभृत्य ; राजपुरुष ; बादशाहा भोंवतालचे अमीरउमराव इ० [ सं . ]
०मंत्र  पु. राजाचा बेत , उद्देश . [ सं . ]
०मद  पु. राज्याचा गर्व , दर्प . [ सं . ]
०मंदिर  न. १ सौध ; राजवाडा . २ ( लावणी , शृंगारविषयक काव्य इ० कांत ) विलासमंदिर ; रंगमहाल ; अंतःपुर इ० [ सं . ]
०महाल  पु. राजवाडा .
०मान्य वि.  १ राजानें मान देण्यास योग्य ; पूज्य ; श्रेष्ठ ; वरिष्ठ ; २ ज्याला पत्र पाटवावयाचें असतें किंवा ज्याचा उल्लेख करावयाचा असतो त्याला सन्मानार्थ कागदोपत्रीं हें विशेषण लावतात . ३ सर्वोस पसंत पडेल असें . हा एक राजमान्य उपाय आहे . [ सं . ]
०मार्ग  पु. १ राजाचा हमरस्ता ; सार्वजनिक रस्ता . २ ( ल . ) सर्व लोकांनीं मान्य व पसंत केलेली चाल , वहिवाट , रहाटी . [ सं . ]
०माष  पु. एक कडधान्य . [ सं . ]
०मुद्रा  स्त्री. १ राजाची मोहोर ; तिचा शिक्का ; ठसा . २ राजाच्या छापाचें नाणें . [ सं . ]
०मोहरा   मोहोरा - वि . १ शहाणा ; शूर किंवा विद्वान ( मनुष्य ); विद्या , शौर्य इ० गुणांनीं प्रसिध्द असलेला , तेजस्वी ( पुरुष ). या राज्यांत नानाफडनवीस एक राजमोहरा होता . २ देखणा व छबीदार ( मनुष्य ); राजबिंडा .
०यश  न. राजाचें , राज्याचें यश ; कीर्ति . राजयश वर्णितां वर्णितां भाट शिणले । [ सं . ]
०यक्ष्मा  पु. क्षयरोगाचा एक भेद ; कफक्षय . [ सं . ]
०योग  पु. १ हठयोगाहून भिन्न असा योगाचा साधा व सोपा प्रकार ; प्राणनिरोध इ० न करितां अंतःकरण एकाग्र करून भगवत्स्वरूपीं लावण्याचा उपाय . राजयोगतुरंगीं । आरूढला । - ज्ञा १८ . १०४७ . २ राज्य मिळवून देणारा पत्रिकेंतला ग्रहयोग . ३ श्रेष्ठ , सर्वोत्कृष्ट योग ; प्रापंचिक वैभव व संपत्ति हीं उपभोगीत असतांहि त्यांहून आत्म्याची भिन्नता ओळखून आत्मचिंतनाचा अभ्यास चालू ठेवणें . [ सं . ]
०योगी  पु. राजयोग करणारा मनुष्य ; हठयोगीच्या उलट . [ सं . ]
०रा  स्त्री. ( नेहमीं अनेकवचनी उपयोग ) कुलाचाराच्या प्रसंगीं तबकांत ठेविलेल्या देवीच्या सात मूर्ती . [ सं . राजेश्वरी = एक देवी ]
०राज  पु. राजधिराज ; राजांचा राजा ; बादशहा . [ सं . ]
०राजेश्वर  पु. सम्राट ; बादशहा ; सार्वभौमराजा . [ सं . ]
०राणी  स्त्री. राजाची मुख्य पत्नी ; पट्टराणी . [ सं . ]
०रीति  स्त्री. १ राजांस योग्य अशा रीति , पध्दति , सरणी , मार्ग . २ सर्वमान्य पध्दति . [ सं . ]
०रुशी   रोशी - स्त्री . सार्वजनिक आणि स्वतंत्र परवानगी ; उघड व पूर्ण स्वतंत्रता ; मुभा . पोरांस सुटीच्या दिवसीं खेळायास राजरूशी असती . [ सं . राजा + फा . रूशन ]
०रूस   रोस रूश रूष - क्रिवि . उघडपणें ; प्रसिध्दपणें ; स्वतंत्रपणें ; अनियंत्रितपणें ; बेधडक . तो राजरोस इराणीच्या दुकानांत जाऊन चहा पितो २ दिवसाढवळया . [ सं . राजा + फा . रूशन ; रोश - इ - रौशन ] राजर्षि - पु . तपश्चर्येनें ज्यानें ऋषि ही उच्च पदवी मिळविली आहे असा क्षत्रिय ; तपस्वी क्षत्रिय ; राजांमधील ऋषि . राजर्षि महर्षि सकळ येथें न्यूनाचि भूमिपाळ सभा । - मोसभा १ . १० . [ सं . राजा + ऋषि ]
०लव्हा  न. १ पक्षिविशेष . याचे मोठा व लहान असे दोन भेद आहेत .
०लक्षण  न. १ राजत्वाचें सूचक एखादें स्वाभाविक चिन्ह . २ ( छत्र , चामर इ० ) राजचिन्हांपैकीं कोणतेंहि चिन्ह . [ सं . ]
०लेख  पु. राजाचें पत्र ; सनद . [ सं . ]
०वट   वटा वटी - पुस्त्री . १ एखाद्या राजाचा , राज्याचा , अंमलाचा , कारकीर्दीचा काल ; कारकीर्द . विक्रमाचे राजवटयांत सर्व लोक सुखी होते . २ अंमलाचा , वजनाचा काल ; ( सामा . ) चलतीचा काल . ३ सामान्य चाल , रीत , संप्रदाय , वहिवाट . आमचा सकाळीं जेवण्याचा राजवटा नाहीं . - क्रिवि . राज्यांत ; अमलांत ; कारकीर्दीत . वडिलांचे राजवटा ही गोष्ट घडली नाहीं . [ राज्य + वर्ति ]
०वटा  पु. हमरस्ता ; राजमार्ग . [ राजा + वाट ] राजवर्खी बांगडी - स्त्री . एक प्रकारची बांगडी .
०वंश  पु. राजाचें कुल . [ सं . ]
०वंश्य वि.  राजाच्या कुळांतील , वंशांतील . [ सं . ]
०वनसी वि.  राजघराण्यांतील . [ सं . राजवंशी ]
०वळ   राजावळी - स्त्री . राजाचीं अक्षरें ( सही ); राजाचा शिक्का ; राजमुद्रा . तर्‍ही राजावळीचीं अक्षरें । - ज्ञा १७ . ३२२ .
०वांटा  पु. १ मुख्य वांटा , मोठा हिस्सा . तो सुखदु : खाचा राजवांटा । - ज्ञा ८ . १८४ . २ राजाचा भाग .
०वाडा  पु. राजाचा वाडा ; राजमंदिर ; प्रासाद .
०विद्या  स्त्री. सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ विद्या . या दोन्ही कारणांमुळें राजविद्या शब्दानें भक्तिमार्गच या ठिकाणीं विवक्षित आहे असें सिध्द होतें . - गीर ४१५ . [ सं . ]
०विलास  पु. राजाचीं सुखें व करमणुकी ; उच्च प्रकारचीं सुखें व क्रीडा . [ सं . ]
०वैद्य  पु. १ वैद्यशास्त्रपारंगत असा उत्तम वैद्य . २ राजाचा वैद्य . [ सं . ]
०व्रत  स्त्री. बांगडीची एक जात .
बांगडी  स्त्री. बांगडीची एक जात .
०शक  पु. ज्येष्ठ शुध्द १३ , आनंदनाम संवत्सर , शके १५९६ . या वर्षी शिवाजी महाराजांनीं आपल्या राज्यारोहणानिमित्त सुरू केलेला शक . कोल्हापूर व इतर कांहीं संस्थानांत हा चालतो . [ सं . ]
०शय्या  स्त्री. सिंहासन ; राजाची शेज . [ सं . ]
०शासन  न. १ राजाची आज्ञा . २ राजा अपराध्यांना जें शासन करतो तें . [ सं . ]
०शोभा  स्त्री. राजाची शोभा ; राजाचें तेज , कांति इ० . [ सं . ]
०श्रियाविराजित वि.  १ राजाच्या तेजानें व शोभेनें विभूषित ; लक्ष्मीनें राजासारखा सुशोभित असा . २ बरोबरीच्या गृहस्थास पत्र लिहावयाचें असतां त्याच्या सन्मानार्थ हा शब्द त्याच्या नांवापूर्वी विशेषणाप्रमाणें योजतात ; पत्राचा मायना . [ सं . ]
०श्री  पु. १ राजाची पदवी ; राजाचें वैभव ; राजासंबंधीं बोलतांना सन्मानार्थ योजावयाचा शब्द . एव्हां राजश्रीची स्वारी कचेरीस आहे . २ सामान्य माणसास पत्र लिहितांना त्याच्या नांवापूर्वी हा शब्द आदरार्थ योजतात . ३ ( विनोदार्थी ) विचित्र , तर्‍हेंवाईक माणूस . ४ ( सामा . ) गृहस्थ . आतां हे राजश्री माज्या भीमास पाणि लावून । - मोस्त्री २ . २९ .
०सत्ता  स्त्री. १ राजाची सत्ता , कायदेशीर अधिकार . २ राजाची थोरवी , कदर , भारदस्ती . [ सं . ]
०सदन  न. राजवाडा . [ सं . ]
०सभा  स्त्री. राजाची सभा , कचेरी ; राजाचा दिवाणखाना ; दरबार . [ सं . ]
०स्थान  न. राजाची राहण्याची जागा .
०सूय   पुन . सार्वभौम राजानें करावयाचा यज्ञ ( हा यज्ञ सार्वभौमत्वाच्या द्योतनार्थ राज्याभिषेक समयीं मांडलिक राजांसह करावयाचा असतो ). अथवा राजा ( सोमलता ) याचें सवन , ( कंडन ) ज्यांत करतात तो यज्ञ . देवर्षि म्हणे नृप तो सम्राट प्रभु राजसूयमखकर्ता । - मोसभा १ . ४६ . [ सं . ]
०हत्या  स्त्री. राजाची हत्त्या ; खून . [ सं . ]
०हत्यारा वि.  राजहत्त्या करणारा .
०हंबीर  पु. राजअंबीर पहा .
०हंस  पु. १ चोंच आणि पाय तांबडे व वर्ण पांढरा असा पक्षी . दूध व पाणी एकत्र केलीं असतां त्यांतून दूध तेवढें वेगळें करण्याची शक्ति याला आहे असें मानितात . राजहंसाचा कळप पोहताहे । - र ९ . २ ( लावण्या , शृंगारिक काव्य ) प्रियकर ; नायक . ३ एक झाड . हीं झाडें लहान भुइसरपट असतात ; पानें बारीक व जोडलेलीं ; यास तांबूस रगाचीं बारीक फुलें व बारीक शेंगा येतात . [ सं . ] राजांगण , राजांगणें - न . १ राजाच्या , श्रीमंत लोकांच्या वाडयापुढें रिकामी राखलेली मोकळी जागा . २ राजवाडयाच्या समोरचा चौक . ३ चौसोपी घरास मध्यें असलेलें चतुष्कोणी अंगण . पैस नाहीं राजांगणीं । - दावि ५०४ . [ सं . ] राजागर - न . १ राजाचा बाग . सुटली तरी राजागरीं मरें । - एभा ११ . ५५८ . २ रायभोग तांदुळाचें शेत . तेणें पिकती केवळ राजागर । - एभा २७ . २०२ .
०धिकार  पु. राजाचा अधिकार . [ सं . ] राजाधिपति , राजाधीश - पु . राजाधिराज . [ सं . ] राजाधिराज - पु . राजांचा राजा ; सार्वभौम ; अनेक मांडलिकांवरचा मुख्य राजा . [ सं . ] राजानुकंपा - स्त्री . राजाची कृपा , दया . [ सं . ] राजानुग्रह - पु . राजाची प्रसन्नता . [ सं . ]
०पुरी वि.  राजापूर गांवासंबधीं ( गूळ , हळद , भाषा इ० ). राजाप्रधान सोडणें - ( बायकी ) चातुर्मासांत भात व वरण हे मुख्य पदार्थ वर्ज्य करणें . राजाभिषेक - पु . राज्यारोहणप्रसंगीं महानद्या , समुद्र इ० कांचें पाणी आणून त्यानें अमात्य , पुरोहितादिकांनीं मिळून राजावर विधिपूर्वक अभिषेक करावयाचा , राजाला गादीवर बसविण्याचा समारंभ . [ सं . ] राजाम्लक , राजाम्लकी - पुस्त्री . रायाअवळा - ळी पहा . [ सं . ] राजावर्त , लाजवर्द - पु . हलका , कमी प्रतीचा हिरा ( इं . ) लापिसलॅझूली . याचा मुख्य रंग निळा ; कधीं तांबूस पिवळाहि सांपडतो . [ सं . ] राजावली - स्त्री . राजांची परंपरा ; राजाचें घराणें ; राजवंश . [ सं . ] राजावळ - स्त्री . १ तांदुळाची एक जात . २ तांबडया रंगाच्या लुगडयाचा एक प्रकार . ३ वर्षाचा अधिपति ; मंत्री इ० ग्रह दाखविणारा पचांगाच्या आरंभीचा भाग ; संवत्सर फल . राजावळी - वि . राजानें काढलेली ( ओळ ). तर्‍ही राजावळीचीं अक्षरें । - ज्ञा १७ . ३२२ . राजासन - न . राजाचें सिंहासन ; तख्त . [ सं . ] राजाळूं - न . पांढर्‍या अळवाची जात . ह्याच्या पानाचा देठ लांब व जाड आणि कांदा मोठा असतो . राजाळें - न . केळयाची एक जात . राजाज्ञा - पु . राजाच्या प्रधानांपैकीं ( अष्टप्रधानांपैकीं नव्हे ) एक . - स्त्री . १ राजाची आज्ञा , शासन . २ निखालस व खसखशीत हुकूम ; आदेश ; आज्ञा . राजिक - वि . राजकीय . राजिक देविक उद्वेग चिन्ता । - दा ११ . ३ . ५ . राजी - स्त्री . गंजिफांतील शब्द ; राजेरी देणी . [ राजा ] राजीक - न . १ राजाचा जुलूम ; अन्याय ; राजापासून उत्पन्न होणारीं सकटें व दु : खें ; याच्या उलट दैविक . २ सैन्याच्या स्वार्‍यांमुळें होणारी अव्यवस्था . ४ क्रांति ; बंड . [ राजा ] राजी बेराजी , राजीक बेराजिक - स्त्रीन . निर्नायकी ; बेबंदशाही ; एक राजा गादीवरून दूर झाल्यापासून दुसरा येईपर्यंतचा मधील काळ . [ राजीक ] राजेंद्र - पु . १ राजांचा राजा ; बलाढय राजा . २ राजअंबीर . [ सं . ] राजेरजवाडे - पुअव . राजे ; संस्थानिक ; सरदार इ० . राजेश्री - वि . १ राजश्री याचें अशुध्द रूप . २ ( ल . ) मूर्ख माणूस . हे राजेश्री दुसर्‍याला तोंडघशी पाडण्याऐवजीं आपणच पडले . - के २४ . ६ . ३० . राजेश्वरी - स्त्री . शिवाची अथवा ईश्वराची पत्नी ; देवी . [ सं . ] राजेळ , राजेळी , राजकेळ - स्त्री . न . केळीची एक जात व फळ . हे केळें ६ ते १२ इंच लांब व तिधारी असतें . ह्याचीं सुकेळीं करतात . राजैश्वर्य - न . राजाचें ऐश्वर्य , वैभव , थाटमाट . [ राजा + ऐश्वर्य ] राजोट , राजोटी , राजोटा - स्त्रीपु . राजवट ; राजवटा पहा . राजोटया - पु . १ कुटुंबांतील कर्ता पुरुष ; घरांतील मुख्य कारभारी . २ ( ना . ) लुडबुड करणारा , चोंबडा मनुष्य . राजोपचार - पु . १ राजत्वास योग्य असे आदर , उपचार ; राजास उचित असे उपचार ( छत्र धरणें , चवरी - मोरचेल वारणें इ० ). २ सात्विक , सौम्य औषधयोजना , शस्त्रक्रिया इ० नाजूक प्रकृतीच्या माणसास सोसण्याजोगा औषधादि उपचार . [ सं . राजा + उपचार ] राज्य - न . १ प्रजेपासून कर घेऊन तिचें पालन करणें असा राजाचा अधिकार किंवा काम . २ राजाचा अंमल ; हुकमत . ३ राजाच्या सत्तेखालचा प्रदेश . ४ राष्ट्र ; कायद्यानें राहण्यासाठीं संघटित झालेले व एका विशिष्ट देशांत राहणारे लोक ( ही व्याख्या वुड्रो विल्सन याम्ची आहे ); किंवा एका ठराविक प्रदेशांत दंडशक्तीच्या सहाय्यानें न्याय व शांतता प्रस्थापित करण्यासाठीं स्थापित केलेला मनुष्यांचा समाज . ५ कोणत्याहि व्यवहारांत दुसर्‍यास न जुमानतां स्वतंत्रपणें वागण्याजोगें एखाद्याचें आधिपत्य असतें तें . त्याचे घरांत सारें बायकांचें राज्य झालें आहे . ६ खेळांतील डाव , हार . [ सं . राजन् ‍ ]
०क्रांत   क्रांति - स्त्री . राज्याधिकार्‍यांत आणि राज्यपध्दतींत जबरदस्तीनें घडवून आणलेली उलथापालथ . [ सं . ]
०घटना  स्त्री. राज्यव्यवस्थेसंबंधीं ; मूलभूत कायदे वगैरे .
०घटना   राज्यघटनेच्या कायद्यांत ज्या पध्दतीनें राज्यकारभार चालावा असें नमूद केलें आहे त्याप्रमाणें कारभार चालेनासा होणें . - के ५ . १ . ३७ .
मोडणें   राज्यघटनेच्या कायद्यांत ज्या पध्दतीनें राज्यकारभार चालावा असें नमूद केलें आहे त्याप्रमाणें कारभार चालेनासा होणें . - के ५ . १ . ३७ .
०घटना   मंत्रिमंडळास जे अधिकार दिले आहेत त्यांचा उपयोग लोकहितवर्धनार्थ करावयाचाच . पण प्रत्यक्ष कायद्याच्या कलमांतील शब्दानें जो अधिकार दिला गेला आहे असें म्हणून त्यांचाहि पायंडा पाडणें . - के ५ . १ . ३७ .
राबविणें   मंत्रिमंडळास जे अधिकार दिले आहेत त्यांचा उपयोग लोकहितवर्धनार्थ करावयाचाच . पण प्रत्यक्ष कायद्याच्या कलमांतील शब्दानें जो अधिकार दिला गेला आहे असें म्हणून त्यांचाहि पायंडा पाडणें . - के ५ . १ . ३७ .
०पध्दति  स्त्री. राज्यकारभाराचा प्रकार . हिचे राजसत्ताक , प्रजासत्ताक व राजप्रजासत्ताक असे तीन प्रकार आहेत . [ सं . ]
०भार  पु. राज्याचा कारभार करण्याची जबाबदारी , भार , ओझें . [ सं . ]
०रीति  स्त्री. शासनपध्दति . ज्या राष्ट्राची राज्यरीति उत्कृष्ट आहे त्यास धनसमृधि अपायकारक होत नाहीं . - नि ५३ .
०लोट  स्त्री. राज्यक्रांति ; राज्य बुडणें . झालिया राज्यलोट । - एभा ३० . ३५९ .
०व्यवहार  पु. राज्याचें काम . [ सं . ] राज्यांग - न . राज्याचीं मुख्य अंगें . हीं स्वामी , अमात्य , सुहृत् ‍ , कोश , दुर्ग , राष्ट्र व बल अशीं सात आहेत . यांतच कोणी पौरश्रेणी व पुरोहित यांचा समावेश करतात . [ सं . ] राज्याभिलाष - पु . राज्याचा अभिलाष ; दुसरे देश जिंकण्याची किंवा त्यांवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा . [ सं . ] राज्याभिलाषी - वि . राज्याचा अभिलाष करणारा . [ सं . ] राज्याभिषिक्त - वि . सिंहासनावर बसविलेला ; ज्यास राज्याभिषेक झाला आहे असा ; राजश्रीनें युक्त केलेला . [ सं . ] राज्याभिषेक - पु . राजाला गादीवर बसविण्याच्या वेळीं विधिपूर्वक करावयाचा अभिषेक ; राज्याधिकाराचीं वस्त्रें देणें . [ सं . ] राज्यासन - न . सिंहासन ; राजासन पहा . [ सं . ] राज्योपचार - पु . सरकारी अधिकार्‍याचें कृत्य . [ सं . ]

Puranic Encyclopaedia  | en  en |   | 
RĀJĀ   One of the two gate-keepers of Sūryadeva. [Bhaviṣya Purāṇa, Brāhmakāṇḍa].

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A king; the leader.

Related Words

राजा   यथा राजा तथा प्रजा   निर्बळाचें बळ राजा   अनागोंदीचा राजा   राजा जेवते, कावळा टुकनीं लागते   मनुष्याची धांव राजा पावेतों   अंधोके गांवमे काना राजा   राजा निघाला बाहेरीं, वैभव त्याच्या बरोबरी   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   राजा कधीं चुकत नाहीं   राजा करी तैसे दाम। चाम तेही चालती॥   राजा राज कमावी, दुबळा झोंप कमावी   राजा भिकारी माझी टोपी घेतली-नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली   नाका म्हणयार राजा जांवय करतात   राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी   भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा   राजा अज्ञ आणि प्रधान समयज्ञ   राजा कालस्य कारणं   मन राजा, मन प्रजा   राजा बोलेल तो न्याय   काळजाच्या पाठीं राजा, सुखदुःखें भोगी प्रजा   राजा करील ती पूर्व (दिशा)   सुखाचा राजा, रोडगा ताजा   फासा पडेल तो डाव आणि राजा बोलेल तो न्याव   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   जसा राजा, तशी प्रजा   गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   राजा बोले दळ हाले, काजी बोले दाढी हाले   अंधेर नगरी बेबंद राजा, अंधेर नगरी बेबंद (बेबूझ) राजा टक्काशेर भाजी और टक्का शेर खाजा   अंधळ्यांत काणा राजा   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   राजा आल्यावर प्रजेक धोको, केदोय घोव बायलेक सोपो   आळशांचा मायबाप-राजा   आपल्या गांवचा राजा बळी   नवरा राजा, बायको राणी   जो तो आपापले घरचा राजा   राजा बोले दळ हाले, गरीब बोले दाढी हाले   राजा लुटी जरी प्रजाजनाला   रानचा राजा   राजा मेहेरबान, गद्धा पेहेलवान   राजा खीं रांडे म्हण्टात्   राजा असो, मी तसो, माकांगे रांडे पेजेचो निसो   करी भूमी उत्‍पन्न, तेणें राजा रंकाचे पोषण   भिल्ल-भिल्ल राजा वनाचा, तीर मारी नेमाचा   राजा-राजाप्रधान सोडणें   कोठें राजा, कोठें पोतराजा   राजा एकीकडे आणि आपण भलतीकडे   राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला   राजा मरो कीं राणी सती जावो ! आपणास त्याचें काय?   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

 • अनामी राजा
  भक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है ।
 • ओवी गीते : बाळराजा
  मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.
 • बाळराजा - संग्रह १
  मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.
 • बाळराजा - संग्रह २
  मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.
 • बाळराजा - संग्रह ३
  मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.
 • बाळराजा - संग्रह ४
  मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.
 • बाळराजा - संग्रह ५
  मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.
 • बाळराजा - संग्रह ६
  मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP