TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
तुकोबाची भाज सांगतसे लोका...

संत तुकाराम - तुकोबाची भाज सांगतसे लोका...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३५८.

तुकोबाची भाज सांगतसे लोकां । जाला हरीदास स्वामी माझा ॥१॥

फुटकासा वीणा तुटक्याशा तारा । करी येरझारा पंढरीच्या ॥२॥

त्याचे वेळे सटवी कोठें गेली होती । ऐसा कां संचितीं नेमियेला ॥३॥

ऐसियाचा राग येतो माझ्या पोटीं । बाळें तीन घोटीं निंब जैसा ॥४॥

विठोबाच्या नामाचा काला भंडवडा । रचिला पवाडा तुका म्हणे ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-05T20:50:36.4970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चंग

  • पु. ढंग ; फाजिलपणा ; थोतांड . ' ह्या गोष्टींना म्हातार्‍या बाया बापड्यांनी सांगितलेल्या दंतकथा धर्मोपदेशकांची थोतांडे भूतादिकांचें ऐद्रजाल आणि ख्रिस्ताविपक्षीयांचे चंग म्हणुन लोक लेखूं लागले .' - विद्याभिवृद्धि १०० . (?) 
  • पु. १ अलगुजासारखें एक वाद्य . हातांत घेऊन चंगरंग जमवीला । - होपो १५ . २ मोठा डफ . ३ ( ल . ) घुंगरासारखे वाजणारें कडें . हरिनामें वाजवि चंग , अहों चंग । - देप ६६ . ३ ( ना . ) वावडी उडतांना फडफड वाजावयासाठीं तिला कागद कातरून त्याचा जो फरारा लावतात तो ; पतंगाची शेंपटी . ४ चंगकांचनी गंजिफांच्या आठ रंगांतील पहिला रंग . ५ घुंगुरमाळ ; चंगाळ ; बैलाचा एक दागिना . ( गु . ) घंटा . - खाला ५१ . ६ ( चुकीनें ? ) पैज ; प्रतिज्ञा ( चंग बांधणे या प्रयोगावरून अर्थ बनला असावा ). [ फा ] ( वाप्र . ) 
  • वि. १ चपळ ; चलाख ; चुणचुणीत ; हुशार ; तैलबुध्दीचा ( मुलगा ). २ चांगलें ; सुरेख . [ सं . चंग ; प्रा . दे . चंग ; तुल० का . चन्नु - चन्नगे ] 
  • ०बांधणें १ ( पचंग बांधणें असा मूळ प्रयोग असेल ) उद्युक्त होणें ; कंबर बांधणें . तें काम करण्यास त्यानें चंग बांधला . २ पैज ; फुशारकी मारणे ; खात्रीपूर्वक सांगणे ; ठासून प्रतिज्ञा करणें . एखाद्या मर्त्यानें मी अमुक वर्षें जगेन असा चंग बांधणें हा केवळ मूर्खपणा होईल . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय? हे व्रत किती पुरातन आहे?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.