TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
देऊ न शकलो तुम्हां संपदा ...

जय मृत्युंजय - देऊ न शकलो तुम्हां संपदा ...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


जन हो मागुति माझ्या आलां
देऊ न शकलो तुम्हां संपदा मान, कीर्तिची माला ।
तितस्कार अपमान यातना ये तुमच्या वाटयाला ।
जनहो, मागुति माझ्या आलां ॥धृ०॥
शाप नियतीचा या सरणीला
पंथ कंटकांनी भरलेला
रक्त आंसवे पदा पदाला
स्वत्वाच्या यज्ञी तरुणांच्या त्यागा देव भुकेला ।
जनहो मागुति माझ्या आलां ॥१॥
अन्य पथाने गेला असतां
कोठे मंत्री झाला असतां
ल्यालें असतें वसन पांढरे, ’देशभक्त’ बिरुदाला ।
जनहो मागुति माझ्या आलां ॥२॥
सप्तपदी विरहाग्नीभोवती
मुंडावळ अश्रूचे मोती
मंगळसूत्रावर ओघळती
वरला छळ साक्षात् युवतीनो ! संगे पतिच्या गेलां ।
जनहो मागुति माझ्या आलां ॥३॥
जनहित वाटे श्रेष्ठ, ना स्तुती-
ज्यांना, ते या पंथा मिळती
अंबर फाटो, दुभंगो क्षिती
वा गेहाचा बनो उन्हाळा, भिडो शूळ ह्रदयाला ।
जनहो मागुति माझ्या आलां ॥४॥
चार मावळ्यांसह शिवराया
धजला दिल्लीशा हलवाया
स्वतंत्र म्हणुनी अभिषेकाया
जीवमान चैतन्य अल्पही पुरते उत्थानाला ।
जनहो मागुति माझ्या आलां ॥५॥
निष्ठेच्या या अनुयायांना
वस्तु काय देऊ उपायना
हिंदुंची घडवा संघटना
राष्ट्राला मात्रा गुणकारी एकचि या काळाला ।
जनहो मागुति माझ्या आलां ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:02:05.8270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दणदणाट

 • m  A quick succession of loud sounds. 
RANDOM WORD

Did you know?

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.