TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
हिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ...

जय मृत्युंजय - हिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


गाणे माझे गाऊ द्या
हिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ध्वज
करो नियंत्रित हिंदुस्थानला ।
गाणे माझे गाऊ द्या मला ॥धृ०॥
बीज वडाचे राईएवढे ।
सुप्तस्फूर्ती येई जो पुढे
झाड भूवरी वाढे केवढे ।
पुनरुत्थापन-शक्तिसवे त्या
भारतांतला हिंदु जन्मला ।
गाणे माझे गाऊ द्या मला ॥१॥
इतिहासांतुनि वाटे जे मना ।
त्याच्या करतो मी रेखाटना ।
ठरो सत्य वा केवळ वल्गना ।
स्वतंत्र उन्नत उदात्त भारत
जगांत मिरवत पाहू द्या मला ।
गाणे माझे गाऊ द्या मला ॥२॥
म्हणोत मजला वेड, मूढ वा ।
माते विजयाअंती आठवा ।
ठरेन तेव्हा द्रष्टा मी नवा ।
तुम्हां वारसा या स्वप्नाचा
या कार्याचा देतो आजला ।
गाणे माझे गाऊ द्या मला ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:02:01.1230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कर्तृप

 • स्त्री. ( व .) कर्तबगारी . 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.