TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
जनहो-पाकिस्तान भारती जर न...

जय मृत्युंजय - जनहो-पाकिस्तान भारती जर न...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


पाकिस्तान निर्माण कराल तर.....e
जनहो-पाकिस्तान भारती जर निर्माण कराल् ।
स्वरुप घेइल छलकाचे ते राष्ट्र नवे विकराल्  ॥धृ०॥
म्हणतां अमुची असे चाल ती
तडजोड असे ती तात्पुरती ।
इंग्रज इथुनी गेल्यावरती
हिंदु होतिल समर्थ जगती ।
वेडयांनो, उलटेल तुम्हांवर पोकळ मायाजाल् ।
स्वरुप घेइल छलकाचे ते राष्ट्र नवे विकराल् ॥१॥
बघाल त्या देशात कुणीही
भ्रान्तिभक्त राहणार नाही ।
आज मानतां ज्याला भाई
हिंदुहिताला तुडविल पायी ।
सोडा ढोंगी देशभक्तिला ना तरि गोता खाल् ।
स्वरुप घेइल छलकाचे ते राष्ट्र नवे विकराल् ॥२॥
मात्र तुम्ही ठेवाल भारती
अत्पसंख्यता प्रांतोप्रांती ।
दडपण त्यांचे आल्यावरती
फिराल मागे ठेवूनि भीती ।
आंतुन बाहेरुन चेपता जनहो, कोठे जाल् ?
स्वरुप घेइल छलकांचे ते राष्ट्र नवे विकराल् ॥३॥
व्हा हिंदुनो, समर्थ, जागृत,
स्वतंत्र, बोला अखंड भारत ।
ह्रदयी ठेवा असिधाराव्रत
पौरुषांत हो राष्ट्राचे हित ।
वेळीं या शुद्वीत, अन्यथा बसाल चोळत गाल् ।
स्वरुप घेइल छलकांचे ते राष्ट्र नवे विकराल् ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:02:02.2800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

cytogenous

  • पेशीजनक 
RANDOM WORD

Did you know?

नमस्कार कोणी कोणास कसा करावा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.