TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
बहिष्कारिण्या परदेशी वसन ...

जय मृत्युंजय - बहिष्कारिण्या परदेशी वसन ...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


विलायती जाळा वस्त्रे
बहिष्कारिण्या परदेशी वसन भारतात ।
योजना विनायक योजी छात्रमंडळात ।
विलायती जाळा वस्त्रे, छात्र गर्जतात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥१॥
सजविती फुलांनी गाडा मार्ग आक्रमाया ।
वाजतात वाद्ये नाना देश जागवाया ।
प्रेम जागता देशाचे लोकमानसात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥२॥
देशमुक्ति साधाया हे यागकार्य आहे ।
त्याग याच यागासाठी देश मागताहे ।
भक्तिने विनायक सांगे राहुनी पुढयात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनांत ॥३॥
हळू हळू स्वातंत्र्याची होत वाटचाल ।
भरे मार्ग, भरला गाडा वाहिला गुलाल ।
’त्याग भारतायस्वाहा’ मंत्र गात गात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनांत ॥४॥
स्मशानात गेली यात्रा, वन्हि चेतवीला ।
घाबरे धुराने केले आंग्लशासनाला ।
भूमि तप्त झाली, ज्वाला पोचती नभात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥५॥
देशभक्ति लोकांमध्ये चेतवीत होते ।
परांजपे, भालाकर्ते, टिळक आदि नेते ।
सांगती, रिपूला फेका सप्तसागरात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥६॥
चिता होत इतिहासाचे पान एक साचे ।
येथुनी विनायक साही घाव पावकाचे ।
जन्म जाळण्याच्या बांधी तोरणा चितेत ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:01:39.8270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नारी

 • स्त्री. ललना ; दारा ; बायको . पराविया नारी रखुमाई समान । हे गेले नेमून ठायीचेचि । - तुगा ६५१ . [ सं . ] 
 • ०कुंजर पु. नवनारी ( कुंजर ) पहा . नारी कुंजराची दुकुले । राजवल्लभे । - ऋ ६९ . 
 • n. मेरु के कन्या, तथा अगीध्रपुत्र करु की स्त्री [भा.५.२.२३] 
 • ०दूषण न. स्त्रियांचे दुर्गुण ; हे सहा प्रकारचे मानतात . अमृत , साहस , माया , मूर्खत्व , अविवेकिता , अतिलोभता , अपवित्रत्व किंवा अशौच ; शिवाय सातवे निर्दयत्व . अमृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभता । अशौचं निर्दयत्वंच स्त्रीणां दोषा ; स्वभावजाः । या दुर्गुणांचा दुसरा प्रकार म्हणजे पान , दुर्जनसंग , पतिविरह , अटन , अन्यगृहवास व स्वप्न ( स्वप्नांत परक्या पुरुषाचा ध्यास घेणे , त्यासह रमणे ). 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

चांदणी चोळी म्हणजे काय
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.