TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
कैक अयने लोटती अन् रत्न क...

जय मृत्युंजय - कैक अयने लोटती अन् रत्न क...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


दैव देतें कर्म नेतें
कैक अयने लोटती अन् रत्न कोणी जन्म घेते ।
लोपता आभा जनांना कौस्तुभाची जाण येते ।
दैव देते कर्म नेते ॥धृ०॥
पाहती ना जोंवरी तो
लोकचिंता वागवीतो ।
संकटांना तोंड देतो ।
मात्र होतां राख त्याच्या गीत गाती गौरवाते
दैव देते कर्म नेते ॥१॥
राष्ट्र तारी सिद्व सेना ।
शत्रु खाई दुर्बलांना ।
हिंदु-नेता सांगतांना-
कान केले बंद आम्ही । भाळलो संमोहनाते ।
दैव देते कर्म नेते ॥२॥
व्हावयाची शक्तिशाली ।
बुद्वि ना आम्हास झाली ।
फाळणी हातांत आली ।
अन्यथा "आदर्श" होती प्राप्त पदवी भारताते ।
दैव देतें कर्म नेतें ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:02:07.5600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शेर

 • पु. १ वाघ . - राव्य ३ . २२ . २ सिंह . ३ - वि . जबरदस्त ; धृष्ट ; धीट ; शूर ; पराक्रमी ; धाडशी ; अंमल , सत्ता गाजविणारा . परंतु ऐशा बखेडियांनी दुश्मन शेर होतात . - रा १२ . ८३ . मागती गिलचे शेर झाले . - भाब १०८ . - राव्य ८ . ६० . [ फा . हिं . शेर = सिंह ] 
 • पु. चिकाडा ; काडेहुरा ; निवली ; एक कुंपणास लावावयाचें काडयाकाडया असलेले चिकाळु झाड . [ फा . शीर = दुध ] शेरताटी , शेरताट , शेरताड - स्त्री . शेराच्या झाडांची रांग , ओळ , कुंपण . 
 • स्त्री. ( कों . ) पक्ष्याची विष्टा ; शीट ; छीट . शेरणें - अक्रि . पक्ष्याने विष्टा टाकणे ; शीट टाकणे . 
 • पु. १ पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण , माप . याचे माप पूर्वी निरनिराळ्या भागांत निरनिराळे असे . पुढे दिलेले आंकडे रुपये भाराचे आहेत . बेळगांव - २३ . ०९ , मद्रास - २४ . ३ , मदुरा - २४ . ९१ , मंगळूर - २३ . ८५ , म्हैसूर - २३ . ८५ , पांदिचरी - २३ . ६२ , त्रिचनापल्ली - २३ . १७ , नगर - ७६ . ५६ , सिंध - ७२ . ४६ , माळवा - ७३ . ८९ , अजमेर - ७४ . ९७ , पुणे - ७६ , रत्नागिरी - २९ , चिपळूण - ३० , वेंगुर्ले - २७॥ , मालवण , दापोली , मुंबई - २८ , राजापूर - २९ , बंगाली - ८० , फर्काबाद - ११० , लखनौ - ९५ . ८२ , मालघा - ९५ . ६६ , काशी - १०५ ,. सध्या ८० भाराचा शेर सर्वत्र करण्यांत आला आहे . २ जासूद , शिपाई , बेगारी वगैरेस पोटाकरितां जे धान्य , शिधा देतात तो . ३ रोजचे अन्न ; नित्यवृत्ति ; उदरनिर्वाहाचे साधन . ( क्रि० उठणे ; उडणे ; काढणे ; चालणे ; तुटणे ; मिळाणे ; लागणे ). ४ आलुतेबलुते . - गांव १०३ . म्ह ० शेर शिजविला आणि विस्तव विझविला = स्वतःचे थोडेसेच काम चटकन आटोपून दुसर्‍यास दिरंगाई बद्दल दोष देणार्‍यास म्हणतात . २ थोडक्यांत कारभार आटोपणाच्या घरधनिणीस म्हणतात शेरास सव्वाशेर = प्रतिपक्षापेक्षा वरचढ ; चोरावर मोर . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.