TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
जिंकुनी मृत्यु आम्हांत आल...

जय मृत्युंजय - जिंकुनी मृत्यु आम्हांत आल...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


अभियोगांतून सुटका
जिंकुनी मृत्यु आम्हांत आला हो
आरती प्रीतिची आपणांला ॥धृ०॥
व्यग्र कांता पुन्हा एकदा
ये अशी का अहेवी गदा
भेडसावीत वारा सदा-
तेवत्या शान्त नीरांजनाला
आरती प्रीतिची आपणांला ॥१॥
पुत्र विश्वास कन्या प्रभात्
काढती जागुनी रात रात्
वेढले मृत्युने पुण्य तात्
मुक्ततेने तयां मोद झाला
आरती प्रीतिची आपणांला ॥२॥
जागल्या सुप्त संवेदना
कंठ दाटे फुटे शब्द ना
अश्रु ओलांडती लोचना
आणि येती पुढे स्वागताला
आरती प्रीतिची आपणांला ॥३॥
धीर नेता स्थितप्रज्ञ तो
आसवे दोन कां ढाळतो
शोक आनंद वा क्रोध तो
अर्थ राही जले झाकलेला
आरती प्रीतिची आपणांला ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:02:04.1070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कोलती

  • स्त्री. १ मशाल ; जळतें , पेटलेलें लहान लांकुड . ' पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचें हिरवे पण असें । - ज्ञा . १८ . ७९० . २ ( ल .) द्वेष - मत्सर - दृष्ट बुद्धिनें रचलेंलें कुभांड ; खोटा आरोप . ( क्रि० वर ठेवणें ) म्ह० पिशाचाचें हातीं कोलीत . ०लावणें -( ल .) कलागत लावणें . ' लावूनि कोलित । माझा करितील घात । ' - तुगा १००७ . ०कांकण - न . आलातचक्र . पेंटतेंक लांकुड गरगर फोरविलें असतां जो कंकणाकृति आकार दिसतो तो . 
  • ना. जळते लाकूड , निखारा , मशाल . 
  • f  कोलीत 
  • n  A firebrand. 
RANDOM WORD

Did you know?

What is the Sati Practice?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.