मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|स्वामी समर्थ सारामृत| अध्याय १८ स्वामी समर्थ सारामृत तारक मंत्र अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १८ स्वामी समर्थांचा आशीर्वाद "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." Tags : pothisamarthaswamiपोथीसमर्थस्वामी अध्याय १८ Translation - भाषांतर श्री गणेशाय नमः ॥ स्वामीसुताच्या गादीवरी । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न सेवेकरी । करिताती समर्थांते ॥१॥ तेव्हा बोलले समर्थ । सेवेकरी असती सांप्रत । परी एकही मजला त्यात । योग्य कोणी दिसेना ॥२॥ जेव्हा येईल आमुच्या मानसी । त्या समयी मोर पांखरासी । अधिकारी नेमू गादीसी । चिंता तुम्ही न करावी ॥३॥ मोर पांखरा मोर पांखरा । समर्थ म्हणती वेळोवेळा । रात्रंदिन तोची चाळा । मोठमोठ्याने ओरडती ॥४॥ आमुची पायाची वीट । जतन करावी नीट । वारंवार म्हणती समर्थ । काकूबाईलागोनी ॥५॥ लपवूनी ठेविले विटेसी । ती दिली पाहिजे आम्हांसी । याचा अर्थ करणासी । स्पष्ट काही कळेना ॥६॥ असो स्वामीसुताचा भ्राता । कोकणांत राहात होता । स्वामीसुत मृत्यु पावता । वर्तमान कळले त्या ॥७॥ तो केवळ अज्ञान । दादा तयांचे अभिधान । त्याचे शरीरी असमाधान । कृश होत चालला ॥८॥ काकूबाईने तयासी । आणविले आपणापासी । एके दिवशी समर्थांसी । दादाप्रती दाखविले ॥९॥ बाळ चालले वाळोनी । यासी अमृतदृष्टीने पाहोनी । निरोगी करावे जी स्वामी । बाई विनवी समर्थांते ॥१०॥ समर्थ बोलले बाईसी । चार वेळा जेवू घाला यासी । आरोग्य होईल बाळासी । चिंता मानसी करु नको ॥११॥ त्याप्रमाणे बाई करिता । दादासी झाली आरोग्यता । समर्थांची कृपा होता । रोग कोठे राहील ॥१२॥ केजगांव मोगलाईत । तेथे नानासाहेब भक्त । त्यांनी बांधिला श्रींचा मठ । द्रव्य बहुत खर्चिले ॥१३॥ श्रींची आज्ञा घेऊनी सत्य । पादुका स्थापाव्या मठात । याकारणे अक्कलकोटी येत । दर्शन घेत समर्थांचे ॥१४॥ ते म्हणती काकूबाईसी । पादुका स्थापन करायासी । तुम्ही पाठवा दादासी । समागमे आमुच्या ॥१५॥ बाई म्हणे तो अज्ञान । तशात शरीरी असमाधान । त्याची काळजी घेईल कोण । सत्य सांगा मजलागी ॥१६॥ परी आज्ञा देतील समर्थ । तरी पाठवीन मी सत्य । मग समर्थांजवळी येत । घेवोनिया दादासी ॥१७॥ समर्थे वृत्त एकोन । म्हणती द्यावे पाठवून । बाळ जरी आहे अज्ञ । तरी सांभाळू तयासी ॥१८॥ काकूबाई बहुत प्रकारे । समर्था सांगे मधुरोत्तरे । दादासी पाठविणे नाही बरे । वर्जावे आपण सर्वाते ॥१९॥ समर्थ तियेसी बोलले । त्यात तुमचे काय गेले । आम्हांसी दिसेल जे भले । तेच आम्ही करु की ॥२०॥ शेवटी मंडळी सांगाती । दादासी पाठविले केजेप्रती । पादुका स्थापन झाल्यावरती । दादा आला परतोनी ॥२१॥ पुढे सेवेकर्यां सांगाती । त्यासी मुंबईस पाठविती । ब्रह्मचार्यांसी आज्ञा करिती । यासी स्थापा गादीवरी ॥२२॥ ब्रह्मचारीबुवांजवळी । दादासी नेत मंडळीं । जी समर्थे आज्ञा केली । ती सांगितली तत्काळ ॥२३॥ दादासी करुनी गोसावी । मुंबईची गादी चालवावी । स्वामीसुताची यासी द्यावी । कफनी झोळी निशाण ॥२४॥ ब्रह्मचारी दादासी । उपदेशिती दिवस निशी । गोसावी होऊनी गादीसी । चालवावे आपण ॥२५॥ दादा जरी अज्ञान होता । तरी ऐशा गोष्टीकरीता । नकार म्हणेची सर्वथा । न रुचे चित्ता त्याचिया ॥२६॥ यापरी ब्रह्मचार्यांनी । पाहिली खटपट करोनी । शेवटी दादांसी मुंबईहूनी । अक्कलकोटा पाठविले ॥२७॥ दादास घेऊनी सत्वरी । श्रीसन्निध आले टाळकरी । तेव्हा दादा घेवोनी तुंबरी । भजन करीत आनंदे ॥२८॥ समर्थे ऐसा समयासी । आज्ञा केली भुजंगासी । घेऊनी माझ्या पादुकांसी । मस्तकी ठेव दादाच्या ॥२९॥ मोर्चेल आणूनि सत्वरी । धरा म्हणती त्यावरी । आज्ञेपमाणे सेवेकरी । करिताती तैसेचि ॥३०॥ श्रींच्या पादुका शिरी पडता । उपरती झाली त्याच्या चित्ता । हदयी प्रगटला ज्ञानसविता । अज्ञान गेले लयाते ॥३१॥ दादा भजनी रंगला । देहभानहि विसरला । स्वस्वरुपी लीन झाला । सर्व पळाला अहंभाव ॥३२॥ धन्य गुरुचे महिमान । पादुका स्पर्श करोन । जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान । काय धन्यता वर्णावी ॥३३॥ असो दादांची पाहून वृत्ती । काकूबाई दचकली चित्ती । म्हणे समर्थे दादांप्रती । वेड खचित लाविले ॥३४॥ ती म्हणे जी समर्था । आपण हे काय करता । दादांचिया शिरी ठेविता । पादुका काय म्हणोनी ॥३५॥ समर्थ बोलले तयेसी । जे बरे वाटले आम्हासी । तेचि करु या समयासी । व्यर्थ बडबड करु नको ॥३६॥ काकूबाई बोले वचन । एकासी गोसावी बनवोन । टाकिला आपण मारुन । इतुकेचि पुरे झाले ॥३७॥ ऐकोन ऐशा वचनाला । समर्थांसी क्रोध आला । घाला म्हणती बाईला । खोड्यामाजी सत्वर ॥३८॥काकूबाईने आकांत । करुनिया मांडिला अनर्थ । नाना अपशब्द बोलत । भाळ पिटीत स्वहस्ते ॥३९॥ परी समर्थे त्या समयीं । लक्ष तिकडे दिले नाही । दादांसी बनविले गोसावी । कफनी झोळी अर्पिली ॥४०॥दुसरे दिवशी दादांसी । समर्थ पाठविती भिक्षेसी । ते पाहूनी काकूबाईसी । दुःख झाले अपार ॥४१॥ लोळे समर्थांच्या चरणांवरी । करुणा भाकी पदर पसरी । विनवीतसे नानापरी । शोक करी अपार ॥४२॥ समर्थांसी हसू आले । अधिकचि कौतुक मांडिले । दादांसी जवळ बोलाविले । काय सांगितले तयासी ॥४३॥ अनुसया तुझी माता । तिजपाशी भिक्षा माग आता । अवश्य म्हणोनी तत्त्वता । जननीजवळ पातला ॥४४॥ ऐसे बाईंने पाहोनी । क्रोधाविष्ट अंतःकरणी । म्हणे तुझी ही करणी । लोकापवादाकारण ॥४५॥ भिक्षान्न आपण सेवावे । हे नव्हेची जाण बरवे । चाळे अवघे सोडावे । संसारी व्हावे सुखाने ॥४६॥ ऐकोनी वचन । उदास झाले तिचे मन । असो दादा गोसावी होवोन । स्वामीभजनी रंगले ॥४८॥ काही दिवस झाल्यावरी । मग आले मुंबापुरी । स्वामीसुताच्या गादीवरी । बसोन संस्था चालविली ॥४९॥ कलियुगी दिवसेदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥५०॥ दोघा बंधूंचे ऐसे वृत्त । वर्णिले असे संकलित । केला नाही विस्तार येथ । सार मात्र घेतले ॥५१॥ इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत । अष्टदशोऽध्याय गोड हा ॥५३॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥ N/A References : N/A Last Updated : June 26, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP