श्री स्वामी समर्थ - तारक मंत्र

स्वामी समर्थांचा आशीर्वाद "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ॥
॥ गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॥
॥ श्री गुरुदत्तात्रेयाय - स्वामी समर्थाय नमो नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
स्वामी समर्थ महाराज की जय

हे मना रे, निर्भय हो । निःसंशयी हो ।
असे पाठीशी रे । प्रचंड स्वामी बळ हे ।
स्मृतगामी अतकर्य । अवधूत हे ।
अशक्य ते शक्य । करतील स्वामी हे ॥१॥
जेथे स्वामी चरण । असे उणे काय तेथे ।
भक्त प्रारब्ध । स्वये घडवी ही प्राय ।
न नेई तयाला । आज्ञेविण काळ ।
नसे भिती ही । परलोकी ही तयाला ॥२॥
भय हे पळेल । घेताच नाम स्वामींचे ।
आहे जवळी ही उभी । स्वामीच शक्ती रे ।
जन्म मृत्यू हा खेळ । असे जगी ज्यांचा ॥३॥
श्रद्धा ठेव रे । स्वामी मंत्रावरी ।
त्या विणा कसारे । होशील त्यांचा भक्त ।
देतात आपणा । सदैव तेच हात ।
देतील स्वामीच साथ । नको उगा घाबरु ॥४॥
घे हेच स्वामी तीर्थ । होय भयभय मुक्त ।
आहेत स्वामीच । या नाशीवंत देहात ॥
आठवी रे प्रचिती । घेऊनी या हे तीर्थ ।
न वंचिती तूला हे । स्वामी समर्थ ॥५॥
अनन्याश्चिंतयन्तो मां येजनः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तनां योगक्षेम वहाम्यहं ।
श्री स्वामी चरणारविदार्पणमस्तु ॥६॥

'' भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ''

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP