TransLiteral Foundation

श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ९

स्वामी समर्थांचा आशीर्वाद "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."

अध्याय ९
श्री गणेशाय नमः ॥ घरोघरी स्वामीकीर्तने । नित्य होती ब्राह्मण - भोजने । स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती ॥१॥
दिगंतरी गाजली ख्याती । कामना धरोनी चित्ती । बहुत लोक दर्शना येती । अक्कलकोट नगरात ॥२॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक । शूद्र आणि अनामिक । पारसी यवन भाविक । दर्शना येती धावोनी ॥३॥
यात्रेची गर्दी भारी । सदा आनंदमय नगरी । साधु संत ब्रह्मचारी । फकीर संन्यासी येती पै ॥४॥
किती वर्णावे महिमान । जेथे अवतरले परब्रह्म । ते नगरी वैकुंठधाम । प्रत्यक्ष भासू लागली ॥५॥
असो ऐशा नगरात । शंकरराव प्रवेशत । आनंदमय झाले चित्त । समाधान वाटले ॥६॥
यात्रेची झाली दाटी । कैशी होईल स्वामीभेटी । हे चिंता उपजली पोटी । मग उपाय योजिला ॥७॥
जे होते स्वामीसेवक । त्यात सुंदराबाई मुख्य । स्वामीसेवा सकळिक । तिच्या हस्ते होतसे ॥८॥
तियेची घेउनी गाठी । शंकरराव सांगती गोष्टी । करोनी द्याल स्वामी भेटी । तरी उपकार होतील ॥९॥
व्याधी दूर करावी म्हणोनी । विनंती करला स्वामीचरणी । तरी आपणा लागोनी । द्रव्य काही देईन ॥१०॥
बाईसी द्रव्यलोभ पूर्ण । आनंदले तियेचे मन । म्हणे मी इतुके करीन । दोन सहस्त्र रुपये द्याल की ॥११॥
ते म्हणती बाईसी । इतुके कार्य जरी करिती । तरी दहा सहस्त्र रुपयांसी । देईन सत्य वचन हे ॥१२॥
बाई विस्मित झाली अंतरीं । ती म्हणे हे सत्य जरी । तरी उदक घेऊनी करी । संकल्प आपण सोडावा ॥१३॥
शंकरराव तैसे करिती । बाई आनंदली चित्ती । म्हणे मी प्रार्थुनिया स्वामीप्रती । कार्य आपुले करीन ॥१४॥
मग एके दिवशी यती । बैसले होते आनंदवृत्ति । शंकरराव दर्शन. घेती । भाव चित्ती विशेष ॥१५॥
बाई स्वामींसी बोले वचन । हे गृहस्थ थोर कुलीन । परी पूर्वकर्मे यालागून । ब्रहमसमंध पीडिती ॥१६॥
तरी आता कृपा करोनी । मुक्त करावे व्याधीपासोनी । ऐसे ऐकता वरदानी । समर्थ तेथोनी उठले ॥१७॥
चालले गावाबाहेरी । आले शेखनुराचे दर्ग्यावरी । शंकररावही बरोबरी । त्या स्थळी पातले ॥१८॥
यवनस्मशानभूमीत । आले यतिराज त्वरित । एका नूतन खाचेत । निजे छाटी टाकोनी ॥१९॥
सेवेकरी शंकररावासी । म्हणती लीला करुन ऐसी । चुकविले तुमच्या मरणासी । निश्चय मानसी धरावा ॥२०॥
काही वेळ गेल्यावरी । उठली समर्थांची स्वारी । शेखनुराचे दर्ग्यावरी । येउनी पुढे चालले ॥२१॥
शंकररावे तया दिवशी । खाना दिधला फकिरासी । आणि शेखनूर दर्ग्यासी । एक कफनी चढविली ॥२२॥
मग काही दिवस लोटत । स्वामीराज आज्ञापित । बारीक वाटूनी निंबपत्र । दहा मिरे त्यात घालावी ॥२३॥
ते घ्यावे हो औषध । तेणे जाईल ब्रह्मासमंध । जाहला स्वामीराज वैद्य । व्याधी पळे आपणची ॥२४॥
स्वामीवचनी धरुनी भाव । औषध घेती शंकरराव । तयासी आला अनुभव । दहा दिवस लोटले ॥२५॥
प्रकृतीची आराम पडला । राव गेले स्वनगराला । काही मास लोटता तयाला । ब्रह्मसंमधे सोडिले ॥२६॥
मग पुन्हा आनंदेसी । दर्शना आले अक्कलकोटासी । घेउनी स्वामीदर्शनासी । आनंदित जाहले ॥२७॥
म्हणती व्याधी गेल्यानंतर । रुपये देईन दहा सहस्त्र । ऐसा केला निर्धार । त्याचे काय करावे ॥२८॥
महाराज आज्ञापिती । गावाबाहेर आहे मारुती । तेथे चुनेगच्ची निश्चिती । मठ तुम्ही बांधावा ॥२९॥
ऐशिया एकांत स्थानी । राहणार नाही कोणी । ऐसी विनंती स्वामीचरणी । कारभारी करिताती ॥३०॥
परि पुन्हा आज्ञा झाली । मठ बांधिला चुनेगच्ची । कीर्ती शंकररावाची । अजरामर राहिली ॥३२॥
अगाध स्वामीचरित्र । तयाचा न लगेची पार । परी गंगोदक पवित्र । अल्प सेविता दोष जाती ॥३३॥
श्रवणी धरावा आदर । तेणे साधती इहपरत्र । जे झाले स्वामीकिकर । विष्णू शंकर वदिती त्या ॥३४॥
श्री स्वामीसमर्थचरित्रसारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । नवमोऽध्याय गोड हा ॥३५॥
॥ श्री स्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-06-26T01:39:18.7630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

free lime

 • मुक्त चुना 
RANDOM WORD

Did you know?

पितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात? उपाय काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.