TransLiteral Foundation

श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ५

स्वामी समर्थांचा आशीर्वाद "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."

अध्याय ५
श्री गणेशाय नमः ॥ भवकानन वैश्वानरा । अज्ञानतमच्छेदका भास्करा । पूर्णसाक्षी परात्परा । भक्ता खरा सदय तू ॥१॥
गंगाजळ जैसे निर्मळ । तैसे तुझे मन कोमल । तुजसी स्तविता प्रेमळ । सत्वर त्याते पावसी ॥२॥
विशेष गंगाजळाहून । आपुले असे महिमान । पाप ताप आणि दैन्य । तुमच्या स्मरणे निवारती ॥३॥
स्वामीचरित्र कराया श्रवण । श्रोते बैसले सावधान । प्रसंगाहूनि प्रसंग पूर्ण । रसभरित पुढे पुढे ॥४॥
ज्यांचे सबळ पूर्वपुण्य । तया झाले स्वामी दर्शन । ऐसे चोळाप्पा आदीकरुन । भाग्यवंत सेवेकरी ॥५॥
अक्कलकोट नगरात । एक तपपर्यंत । स्वामीराज वास करीत । भक्त बहुत जाहले ॥६॥
वार्ता पसरली चहूकडे । कोणासी पडता साकडे । धाव घेती स्वामींकडे । राजेराजवाडे थोर थोर ॥७॥
म्हणती भोसल्यांचे भाग्य परम । स्वामीरत्न लाधले उत्तम । नृपतीही भक्त निस्सीम । स्वामी चरणी चित्त त्यांचे ॥८॥
तेव्हा कितीएक नृपती । स्वामीदर्शन घेऊ इच्छिती । आणि आपुल्या नगराप्रती । आणू म्हणती तयांसी ॥९॥
अक्कलकोटाहूनी स्वामीसी । आणावे आपुल्या नगरासी । मग कोणे एके दिवशी । सभेमाजी बैसले ॥११॥
दिवाण आणि सरदार । मानकरी तैसे थोर थोर । बैसले असता समग्र । बोले नृपवर तयांप्रती ॥१२॥
कोणी जाऊनी अक्कलकोटासी । येथे आणील स्वामीसी । तरी आम्ही तयासी । इनाम देऊ बहुत ॥१३॥
त्याचा राखू सन्मान । लागेल तितुके देऊ धन । ही वटपुरी वैकुंठभवन । वसता स्वामी होईल ॥१४॥
कार्य जाणूनीकठीण । कोणी न बोलती वचन । कोणा एका लागून । गोष्ट मान्य करवेना ॥१५॥
तेव्हा तात्यासाहेब सरदार । होता योग्य आणि चतुर । तो बोलता झाला उत्तर । नृपलागी परियेसा ॥१६॥
आपुली जरी इच्छा ऐसी । स्वामीते आणावे वटपुरीसी । तरी मी आणीन तयांसी । निश्चय मानसी असो द्या ॥१७॥
ऐसे ऐकोनी उत्तर । संतोषला तो नृपवर । तैसी सभाही समग्र । आनंदित जाहली ॥१८॥
संजिवनी विद्या साधण्याकरीता । शुक्राजवळी कच जाता । देवी सन्मानिला होता । बहुत आनंदे करोनी ॥१९॥
नृपतीसह सकळ जने । त्यावरी तात्यासी सन्माने । गौरवोनि मधुर वचने । यशस्वी हो म्हणती तया ॥२०॥
बहुत धन देत नृपती । सेवक दिधले सांगाती । जावया अक्कलोटाप्रती । आज्ञा दिली तात्याते ॥२१॥
तात्यासाहेब निघाले । सत्वर अक्कलकोटी आले । नगर पाहूनी संतोषले । जे केवळ वैकुंठ ॥२२॥
पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती । आनंद झाले चित्ती । तेथील जनांची पाहुनी भक्ती । धन्य म्हणती तयाते ॥२३॥
अक्कलकोटीचे नृपती । स्वामीचरणी त्यांची भक्ती । राजघराण्यातील युवती । त्याही करिती स्वामीसेवा ॥२४॥
आणि सर्व नागरिक । तेही झाले स्वामीसेवक । त्यांत वरिष्ठ चोळाप्पादिक । सेवेकरी निस्सीम ॥२५॥
ऐसे पाहूनी तात्यांसी । विचार पडला मानसी । या नगरातुनी स्वामींसी । कैसे नेऊ आपण ॥२६॥
अक्कलकोटीचे सकल जन । स्वामीभक्त झाले पूर्ण । स्वामींचेही मन रमोन । गेले ऐसे ह्या ठाया ॥२७॥
प्रयत्नांती परमेश्वर । प्रयत्ने कार्य होय सत्वर । लढवोनी युक्ती थोर । कार्य आपण साधावे ॥२८॥
ऐसा मनी विचार करोनी । कार्य आरंभिले तात्यांनी । संतुष्ट रहावे सेवकजनी । ऐसे सदा करिताती ॥२९॥
करोनी नाना  पक्वान्ने । करिती ब्राह्मणभोजने । दिधली बहुसाल दाने । याचक धने तृप्त केले ॥३०॥
स्वामीचिया पूजेप्रती । नाना द्रव्ये समर्पिती । जेणे सेवेकरी संतुष्ट होती । ऐसे करीती सर्वदा ॥३१॥
प्रसन्न व्हावे भक्तवत्सले । कार्य साधावे आपुले । म्हणोनी नाना उपाय केले । द्रव्य वेचिले तात्यांनी ॥३२॥
ऐशीयाने काही न झाले । केले तितुके व्यर्थ गेले । तात्या मनी खिन्न झाले । विचार पडला तयांसी ॥३३॥
मग लढविली एक युक्ती । एकांती गाठूनी चोळाप्पाप्रती । त्याजलागी विनंती करिती । बुद्धिवाद सांगती त्या ॥३४॥
जरी तुम्ही समर्थांसी । घेऊनी याल बडोद्यासी । मग मल्हारराव आदरेसी । इनाम देतील तुम्हाते ॥३५॥
मान राहील दरबारी । आणि देतील जहागिरी । ऐसे नानाप्रकारी । चोळाप्पाते सांगितले ॥३६॥
द्रव्येण सर्वे वशाः । चोळाप्पासी लागली आशा । तयाच्या अंतरी भरवसा । जहागिरीचा बहुसाल ॥३७॥
मग कोणे एके दिवशी । करीत असता स्वामीसेवेसी । यतिराज तया समयासी । आनंदवृत्ती बैसले ॥३८॥
चोळाप्पाने कर जोडोनी । विनंती केली मधुर वचनी । कृपाळू होऊनी समर्थांनी । बडोद्याप्रती चलावे ॥३९॥
तेणे माझे कल्याण । मिळेल मला बहुत धन । आपुलाही योग्य सन्मान । तेथे जाता होईल ॥४०॥
ऐसे ऐकोनिया वचन । समर्थांनी हास्य करोन । उत्तर चोळाप्पालागोन । काय दिले सत्वर ॥४१॥
रावमल्हार नृपती । त्याच्या अंतरी नाही भक्ती । मग आम्ही बडोद्याप्रती । काय म्हणोनी चलावे ॥४२॥
पुढले अध्यायी सुंदर कथा । पावन होय श्रोता वक्ता । श्रीस्वामीराज वदविता । निमित्त विष्णुदास असे ॥४३॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । पंचमोऽध्याय गोड हा ॥४४॥
श्रीरस्तुः शुभं भवतु ॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-06-26T01:35:07.8430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

MENĀ II(मेना)

 • Daughter of the Pitṛs (Manes). Pitṛs are of two kinds: Anagnis and Sāgnis. Anagnis are those who do not perform yāgas and those who perform yāgas are called Sāgnis. Anagnis are called Agniṣvāttas and Sāgnis are called Barhiṣadas. Svadhā was the common wife of all the Pitṛs. Svadhā got two daughters, Menā and Dhāriṇī. They were both very well- learned, virtuous girls and were Brahmavādinīs (expounders of Vedānta philosophy). [Chapter 10, Aṁśa 1, Viṣṇu Purāṇa]. 
RANDOM WORD

Did you know?

चांदणी चोळी म्हणजे काय
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.