मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय १४

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय १४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

कपिलगीता आयकोन ॥ भीष्मासि पुसे कुंतीनंदन ॥ कवणेपरी काइसेन ॥ प्राणी होतो पापात्मा ॥१॥

आणि धर्म कैस करितो ॥ निर्वेंदा कैसा पावतो ॥ मोक्ष कोणेरीतीं लाभतो ॥ तें सांगा मज ॥२॥

भीष्म ह्मणे कुंतीसुता ॥ रूपरसादि विषयपंचकता ॥ यांचिये ठायीं वर्ततां ॥ कामद्देष होताती ॥३॥

मग दृष्टकर्में आरंभी हावें ॥ तेणें धर्मबुद्धी नोहे ॥ लोभेद्देषक्रोधादि पावे ॥ धरी पापियाची संगती ॥४॥

तेणें पापात्मा होय जाणीं ॥ ह्मणोनि विषयादिकांचे स्थानीं ॥ पापदोषांतें देखोनी ॥ कीजे त्याग ॥५॥

साधूची संगती धरोनी ॥ स्वधर्मातें अभ्यासोनी ॥ तेणें धर्मात्मा सुष्टाचरणीं ॥ होता जाण ॥६॥

शुभकल्याणरूप होई ॥ विषयवासना त्यागी सही ॥ मग धर्मफळाच्या ठायीं ॥ निर्वेद पावे ॥७॥

तो ज्ञानचक्षूंच्या द्दारें करोनी ॥ सर्वसंगत्यागी होवोनी ॥ शांतिसुखातें पावोनी ॥ प्राणी वतें ॥८॥

आतां मोक्षप्राप्ति उपवो ॥ सांगव असे भीष्मदेवो ॥ कीं क्षेमं करोनि क्रोधोद्भवो ॥ उच्छेदावा ॥९॥

संकल्पवर्जनें करोनी ॥ कमोच्छेद कीजे ज्ञानी ॥ सत्वसंसेवनें करोनी ॥ निद्राउच्छेद कीजे ॥१०॥

अप्रमादें भय छेदावें ॥ धैर्यं द्देषकाम नाशावे ॥ इच्छा लोभ मोह जिंकावे ॥ संतोषें करोनी ॥११॥

तत्वदर्शनें जिंकावें विषय ॥ दयें कीजे अधर्मजय ॥ सांगवर्जनें अर्थजय होय ॥ अनित्यत्वें स्नेह जिंकावा ॥१२॥

योगें होय क्षुधाजय ॥ संतोषें तरी तृष्णाक्षय ॥ आत्मज्ञानें करोनि पाहे ॥ समाधिसुख पाविजे ॥१३॥

शांति आत्मनियमक जाण ॥ काम क्रोध लोभ स्वप्न ॥ या योगदोषांतें टाकोन ॥ दानाध्ययन कीजे ॥१४॥

ध्यान सत्य आर्जव क्षम ॥ आहारशुद्दी इंद्रियसंयम ॥ हे योगसाधनप्राप्ति उत्तम ॥ सेवोनि पाप नाशावें ॥१५॥

येणें विज्ञानासिद्धि होय ॥ प्राणी मोक्षमार्ग पावे ॥ हा श्रेष्ठ मार्ग आहे ॥ अन्य मार्ग कुमार्ग ॥१६॥

ऐसें योगा चारानुवर्णन ॥ ऐकोन धर्म करी प्रश्न ॥ कीं विश्व कैसें होतें उप्तन्न ॥ प्रळयीं कोठें राहतें ॥१७॥

मग ह्मणे गंगासुत इये ॥ अथीं नारद देवल असित ॥ यांचा संवाद अद्भुत ॥ तो ऐकें धर्मराया ॥१८॥

अकाश वायु जळ ॥ तेज पृथ्वी आणि काळ ॥ भावाभाव केवळ ॥ हीं आठ भुतें ॥१९॥

ययां पासाव जंतुंस ॥ हाय प्रभंव आणि नाश ॥ तो ऐसा ऐकें सावकाश ॥ भुमि पासोनि स्थूळ देह ॥२०॥

आकशा पासाव श्रवण ॥ सौरतेजापासोनि नयन ॥ वायुपासोनियां प्राण ॥ रक्त उदका पासोनी ॥२१॥

क्षोत्र त्वक चक्षु जिव्हा घ्राण ॥ हीं पांच इंद्रियें जाण ॥ शब्द स्पर्श रूप रस आघ्राण ॥ हे विषय यांचे ॥२२॥

या इंद्रियसंघाहूनी ॥ चित्तचांचल्य पर जाणी ॥ मन पर इंद्रियचित्ताहुनी ॥ मानाहुनि बुद्धी पर ॥२३॥

बुद्धिहुनियां परता ॥ क्षेत्रज्ञ जाणावा निरुता ॥ तो जीवरूपें सर्वथा ॥ आत्मांश सत्य ॥२४॥

पांच श्रोत्रादि इंद्रियें ॥ आणि चित्त मन बुद्धी इयें ॥ आठही ह्मणिजताति पाहें ॥ ज्ञानेंद्रियें ऐसीं ॥२५॥

आतां पाणि पाद शुश्न ॥ गुद वाचा मुख्य प्रधान ॥ हीं कर्मेद्रिये जाण ॥ यांचे विषय व्यापार ॥२६॥

हातीं घेवदेव कर्मकरण ॥ गुदें विसर्ग पायीं गमन ॥ मूत्रोत्सर्ग आनंद भोगी शिश्न ॥ जल्पना वाचेची ॥२७॥

शब्दादि ज्ञानेंद्रियविषयां ॥ कर्मकरणादि कर्मेंद्रियां ॥ एवं दश गूण विषय धर्मयया ॥ व्यापारासी प्रधान ॥२८॥

इंद्रियां स्वस्वकर्मापासाव ॥ उपरम तया निद्रा नांव ॥ तियेचि अवस्थेसि स्वभाव ॥ इंद्रियोपरम जालिया ॥२९॥

मन होवोनि अनुपरत ॥ विषयसंघातें सेवित ॥ तेंचि स्पप्न ह्मणिजत ॥ दुसरी अवस्था ॥३०॥

ऐसा भुतसंघ निरुतें ॥ शरीर धरी वायुसागातें ॥ शरीर पुण्यपापें पावतें ॥ तेथचि लय ॥३१॥

या पंच भौतिकीं राहे ॥ तो सुखदूःखभोक्ता पाहें ॥ पुरुष जीर्ण गृहीहूनि जाय ॥ जैसा नवे गृहीं ॥३२॥

तैसाचि जीर्ण देहापा सोनी ॥ देहांतरीं प्रवेशे प्राणी ॥ हें जाणोनियांज्ञानी ॥ शोक मोह त्यागितो ॥३३॥

मग सांख्यज्ञानें करून ॥ पुण्यपाप क्षय करोन ॥ ब्रह्मभावातें पावोन ॥ परम गती पावतो ॥३४॥

हें असितें आणी देवलें ॥ नारदासि निवेदिलें ॥ तेंचि धर्मा तुज कथिलें ॥ ह्मणे गांगेय ॥३५॥

तंव धर्म ह्मणे जी स्वामी ॥ अथर्तृष्णा करोनि आह्मीं ॥ ज्ञातिवध केला अधर्मीं ॥ ते तृष्णा केवीं निवतें ॥३६॥

मग भीष्मदेवो बोलिला ॥ कीं इये अर्थी जनकें भला ॥ मांडव्यासी उपदेश केला ॥ तो ऐकें सावधान ॥३७॥

कीं जरी अर्थ पावले वृद्धीतें ॥ तरीं दुःख देती प्राणियातें ॥ ह्मणोनि अर्थ विवेकियातें ॥ असमृद्धचि असावे ॥३८॥

अर्थ मूढां मोहकारक ॥ ग्राम्यसुख आणि दिव्यसुख ॥ तृष्णाक्षयेंविण नपवे देख ॥ शोडशीकळा ॥३९॥

जैसें धेनुसि वाढतां ॥ श्रृंगही वाढे सर्वथा ॥ तैसी वित्तवृद्धी होतां ॥ तृष्णाही पावे वृद्धीतें ॥४०॥

तरी ज्ञानें तृष्णा छेदोनी ॥ शुद्धांतःकरण होवोनी ॥ अनामयसुखातें प्राणी ॥ पावत असे ॥४१॥

अगा मोक्षधर्में करोनी ॥ लाभालाभें संतृष्ट प्राणी ॥ तोचि पाविजे पद निर्वाणीं ॥ अनामय ॥४२॥

प्राप्तकामाचिये ठायीं ॥ निरपेक्षपर दूषणही ॥ मनें चिंतिलें न बोले कहीं ॥ वाचेकरोनी ॥४३॥

तितिक्षु अतिवाद न करी ॥ प्रिय बोले सर्वत्रीं ॥ नाहीं डेगावा भीतरीं ॥ समान सर्वत्र ॥४४॥

ध्यानजाप्यपर मौन ॥ पाहे भूतांचें गमनागमन ॥ निस्पृह शांत आत्मरमण ॥ संतृष्टचित्त ॥४५॥

मन वचन क्रोधोत्थ ॥ उदरविचिकित्सा समस्त ॥ यांचे वेग विवर्जित ॥ पावे ज्ञानी मोक्षमार्गा ॥४६॥

ऐसी हे हरीतगीता ॥ भीष्म कथिली पंडुसुता ॥ तंव धर्म जाहला पुसता ॥ भीष्माप्रती ॥४७॥

ह्मणे अज्ञान प्रभवतम ॥ नासे ऐसें सांगा वर्म ॥ गांगेय ह्मणे उत्तम ॥ ज्ञानेंकरूनि तम नासे ॥४८॥

तेणें ब्रह्माप्रकाश होय ॥ इतिहास ऐकें अर्थीं इये ॥ वृत्रासुरासि शुक्राचार्यें ॥ निरुपिला जो ॥४९॥

भ्रष्टराज्य वृत्रासुर ॥ ह्मणे म्यां तप करोनि थोर ॥ ऐश्वर्य पावलों अपार ॥ परि राज्यभष्ट जाहलों ॥५०॥

ऐसेंही असोनियां काहीं ॥ शोक तरी करीत नाहीं ॥ कां जे तपोबळें सही ॥ युद्ध करितां इंद्रेंसीं ॥५१॥

तेव्हां आकाशीं नारायण ॥ म्या देखिला सनातन ॥ तरी हें तपफळ कवण ॥ प्राप्त जाहलें ॥५२॥

आणि ऐश्वर्यनाश कोण कर्मास्तव ॥ जीवनप्रवृत्ति कोणास्तव ॥ कोण फळातें पावोनि जीव ॥ निश्चळ राहे ॥५३॥

ऐसा प्रश्न आयकिला ॥ शुक्र विष्णुमहिमा सांगता जाहला ॥ तंव सनत्कुमार पातला ॥ संशयछेदार्थ ॥५४॥

तया वृत्रासुरें पूजोनी ॥ बैसविला उत्तमासनीं ॥ तेथ शुक्रज्ञेंकरोनी ॥ सनत्कुमार सांगतसे ॥५५॥

ह्मणे चराचर समस्तां ॥ एक विष्णुचि असे कर्ता ॥ लय उप्तत्ति सर्वथा ॥ त्याचेचि ठायीं ॥५६॥

तो पाविजे इंद्रियें संयमुनी ॥ प्रयत्‍नें बुद्धी करोनी ॥ सकल दोषनिवृत्ति जाणीं ॥ होइजे तेणें ॥५७॥

जेवीं अल्पसुवासें तीळ ॥ आपुला न टाकिती परिमळ ॥ मग बहुपुष्पीं वेळोवेळ ॥ योग करावा ॥५८॥

तेणें आत्मगंध सांडिती ॥ पुष्पसुगंधांतें धरिती ॥ तैसी जालिया दोषनिवृत्ती ॥ विष्णु होय प्रत्यक्ष ॥५९॥

ऐसा ऐकोनि उपदेश ॥ तेणें वृत्रासुरास ॥ विष्णुभक्तीचा विशेष ॥ प्राप्तः जाहला ॥६०॥

तंव ह्मणे पंडुनंदन कैसें वृत्रासुरांचें आख्यान ॥ मग ह्मणे ऐकें सावधान ॥ देवव्रत ॥६१॥

पूर्वी देवगणां सहित ॥ एकदा इंद्र होता जात ॥ तंव वॄत्त देखिला अद्भुत ॥ उंच पांचशत गांवें ॥६२॥

तीनी शत गांवें विस्तार्ण ॥ महा भयंकर विशाळ वदन ॥ जाला ऊरूस्तंभ देखोन ॥ सकळिकांसी ॥६३॥

मग देवां असुरांसी ॥ युद्ध प्रवर्तलें आवेशीं ॥ यक्षकिन्नरगंधर्वऋषी ॥ ब्रह्मादिदेव ॥६४॥

ऐसे पहावया आले ॥ वृत्रें मायायुद्ध मांडिलें ॥ तेणें देवेंद्रासि मोहिलें ॥ तंव आला वसिष्ठ ॥६५॥

तेणें इंद्र उपदेशिला ॥ मोहनिरास करिता जाहला ॥ मग इंद्र तेजें धावला ॥ वृत्रमायानिरासार्थ ॥६६॥

आणि महेश्वर कोपला ॥ इंद्र रक्षणा धांवला ॥ ज्वररूपें प्रवेशला ॥ शरीरीं वृत्राचे ॥६७॥

तैसाचि विष्णु कॄपावंत ॥ होवोनि लोकरक्षणार्थ ॥ प्रवेशला वज्रा आंत ॥ इंद्राचिये ॥६८॥

तंव बृहस्पती वसिष्ठ ह्मणती ॥ इंद्रा करीं वृत्रशांती ॥ तैसेंचि ह्मणे उमापती ॥ हा वृत्र महामायावी ॥६९॥

येणें साठीं सहस्त्र वरुषें ॥ तप केलेंसे आवेशें ॥ ब्रह्में संतृष्टोनि विशेषें ॥ वर दीधले ॥७०॥

योगीयांमाजी महत्व ॥ महा बळिष्ठ महत्व ॥ आतां वज्रें करीं घात ॥ ज्वरेम व्यग्र होईल हा ॥७१॥

ऐसें इंद्रे ऐकोनी ॥ उत्साहें रथीं बैसोनी ॥ चालिला वज्र उचलोनी ॥ हाणावया ॥७२॥

माहेश्वर ज्वर त्या वेळां ॥ वृत्रदेहीं प्रवेशला ॥ जाणोनि वाद्यगजर केला ॥ देवऋषीश्वरीं ॥७३॥

ऐसी ज्वरोत्पत्ती ॥ वृत्र वधितां ॥ वृत्रदेहींची विवर्णता ॥ उप्तन्न जाहली तत्त्वतां ॥ श्वासोश्वासें ॥७४॥

मृत्युवेळा प्राप्त जाहली ॥ ब्राह्म दुश्विन्हें देखिलीं ॥ गीधादि पांखरें भ्रमलीं ॥ वृत्रावरीं ॥७५॥

मग तीव्रज्वरें करोनी ॥ आरोळ्या देतसे समरंगणीं ॥ तंव इंद्रे वज्र हाणोनी ॥ मारिला वृत्र ॥७६॥

जाहले देवऋषी हर्षित ॥ इंद्र विष्णु वज्रयुक्त ॥ स्थानीं गेले समस्त ॥ आपुलाले ॥७७॥

तंव वृत्रदेहापासोन ॥ विक्राळ दाढा दशन ॥ कपाळ पिंगट वर्ण ॥ धोरनेत्रा कपालिनी ॥७८॥

कृशा रुधिरें माखली ॥ प्रेतवस्त्रखंडें नेसली ॥ ऐसी ब्रह्महत्या निघाली ॥ चालिली इंद्रा गिंवसित ॥७९॥

इंद्र स्वर्गी जात होता ॥ तंव ते आली ब्रह्महत्या ॥ देखोनि येरू जाहला पळता ॥ मानस सरोवरीं ॥८०॥

तेथ कमळिणीतंतु आंत ॥ राहिला वर्षे सहस्त्रशत ॥ परि हत्या राहिली जपत ॥ तेणें इंद्र कंटाळला ॥८१॥

मग बाहेर निघालिया ॥ हत्या आलीं धाऊंनियां ॥ गळग्रह करूनियां ॥ इंद्रा न सोडी ॥८२॥

ह्मणोनि तन्नाशकरणार्थ ॥ ब्रह्मयापें आला त्वरित ॥ तो वृत्रहत्याआक्रांत ॥ देखिला चतुराननें ॥८३॥

मग ब्रह्महत्येसि चतुराननें ॥ बोलिलें मधुवाक्यरचनें ॥ ह्मणे या देवाधिपाकारणें ॥ सांडीं ब्रह्मात्मजे ॥८४॥

तंव ते ह्मणे ब्रह्मयासी ॥ तूं पितामह त्रैलोक्यासी ॥ तरी स्थळ देई मजसी ॥ रहावया कारणें ॥८५॥

येरें ब्रहाहत्या विभागोनी ॥ येक भाग दीधली अग्नी ॥ तंव खेदखिन्न जाहला वन्ही ॥ देखोनि विधि ह्मणे तया ॥८६॥

अगा जे धूमाग्नीच्या ठायीं ॥ होमादिक करितील पाहीं ॥ तुझीं हत्या जावोनि सर्वही ॥ त्यांच्याठायें राहिल ॥८७॥

दुसरा भाग वृक्षतृणीं ॥ ब्रह्में घातला बोलाउनी ॥ तंव ते करिती विनवणी ॥ आह्मी छेद पावतों ॥८८॥

आतां तुझिये आज्ञ्र करितां ॥ आह्मीं घेतों ब्रह्महत्या ॥ त्यांसी दुःखी देखतां बोलता ॥ जाहला ब्रह्मा ॥८९॥

जो जाणोनि पर्वकाळ ॥ तुह्मांसि छेदन करील ॥ तयाप्रती हे जाईल ॥ हत्या तुमची ॥९०॥

दुर्गंध अंगींचा चीक ॥ तो इंद्रपातकाचा दोष ॥ ऐसा असे विशेष ॥ पुराणांतरीं ॥९१॥

मग अप्सरादि स्त्रियांवरी ॥ तिसरा भाग घातला झडकरी ॥ तंव त्या कोमाइल्या नारी ॥ ते निर्गती ऐसी कीं ॥९२॥

जो रजस्वलेसि मैथुन ॥ करील जरी मूढजन ॥ त्यासी हें पाप दारूण ॥ लागेल तुमचें ॥९३॥

मासिंमासी विटाळ प्राप्त ॥ तें इंद्रअंगींचें दुरित ॥ मग घातला भाग चतुर्थ ॥ उदकावरी ॥९४॥

जो उदकांत मूत्रादिमळ ॥ कश्मलादिक टाकिल ॥ तयासि हें पाप जडेल ॥ ब्रह्महत्येंचें ॥९५॥

आणि इंद्रागींचा दोष ॥ तो जळफेन सम्यक ॥ ऐसा असे विशेष ॥ पुराणांतरीं ॥९६॥

ऐसीं ब्रह्यानें स्थानें नेमिलीं ॥ मग ब्रह्महत्या तेथ गेली ॥ इंद्रें अश्वमेध तात्काळीं ॥ केला पुरश्वरणार्थ ॥९७॥

पुराणांतरमतें हे कथा ॥ दुसर्‍या स्तबकीं संपुर्णता ॥ इति वृत्रासुरव्यवस्था ॥ उपाख्यान ॥९८॥

आतां अग ज्वरोप्तती ॥ ऐकें अन्यविध विप्तती ॥ सावधानपणें प्रीतीं ॥ भीष्म ह्मणे धर्मासी ॥९९॥

पूर्वी ज्योतिष्कनामें सावित्र ॥ महामेरूचें श्रृग पवित्र ॥ तेथ राहिला शंकर ॥ ऋषिगणीं सेव्यमान ॥१००॥

तंव कोणे येके समयांतरीं ॥ दक्षप्रजापती ॥ यज्ञकरी ॥ तेथ इंद्रादिदेव ऋषीश्वरीं ॥ सहित चालिले ॥१॥

गंगाद्वारीं जातां देखोनी ॥ शिवासी बोलिला भवानी ॥ कीं तुह्मी यज्ञालागोनी ॥ कांपांजात नाहीं ॥२॥

तूं गणाधिपती नाहीं गेलासी ॥ हें दुःख होतसे आह्मासी ॥ ऐसें ऐकोनियां शिवासी ॥ आला क्रोध ॥३॥

मग नंदीभूतें पाठवोनी ॥ यज्ञ विध्वंसिला शूळपाणीं ॥ धनुष्यबाणें करोनी ॥ त्रासिले सर्व ॥४॥

यज्ञ मृगरूपें पळाला ॥ ईश्वर विंधीत पाठीं लागला ॥ परम कोपें घाम आला ॥ भूमी पडिला स्वेदबिंदु ॥५॥

तयोबुंदुपासोनि थोर ॥ काळानळोग्र भयंकर ॥ पुरुष जाहला तोचि ज्वर ॥ पीडी त्रैलोक्यासी ॥६॥

मग ब्रह्मों रुद्र स्तविला ॥ यज्ञभाग देवाविला ॥ तो यज्ञभाग पावतां वहिला ॥ रुद्रेम केला ज्वरविभाग ॥७॥

गजचिये मस्तकीं थोर ॥ अति तापरूपें ज्वर ॥ पर्वतावरी निर्धार ॥ शिलाजित नामें ॥८॥

उदकावरील नीळिका ॥ तेचि ज्वररूपें देखा ॥ सर्पाची कांती आइका ॥ ज्वररूपेचीं ॥९॥

पशूंचा ज्वर खुरकृत ॥ ऊषरभाग भूमिगत ॥ मयुरा शिखोद्भेद प्राप्त ॥ ज्वररूपेंची ॥११०॥

शुकासि हिक्का रूपज्वर ॥ व्याघ्रासि भ्रम शूळ निर्धार ॥ आणि मनुष्यासी ज्वर ॥ प्रसिद्धपणें ॥११॥

जन्मकाळीं कीं मरणांतीं ॥ मध्यही येत मनुष्याप्रती ॥ माहेश्वरज्वर व्याप्ती ॥ तोचि वृत्रासी जाहला ॥१२॥

ऐसी हे ज्वरोत्पत्ती ॥ बोलिजेली ग्रंथान्यमती ॥ तथा ऐकें दक्षप्रजापती ॥ होता वैवस्वत मन्वंतरीं ॥१३॥

हिमाचळाचे पाठरीं ॥ राज्य करी गंगाद्वारीं ॥ तेथयज्ञ बरव्यापरी ॥ करिता जाहला ॥१४॥

यक्षगण सिद्धठेव ॥ गंधर्व अप्सरा मानव ॥ यज्ञामाजी आले सर्व ॥ दक्षस्थानीं ॥१५॥

तये वेळीं दधीचिऋषी ॥ न देखोनियां रुद्रासी ॥ बोलता जाहला आवेशीं ॥ कीं रुद्राविण वृथा यज्ञ ॥१६॥

जेथ नाहीं गौरीहर ॥ तेथ अनर्थ होती थोर ॥ ऐसें बोलिला उत्तर ॥ तंव नारद गेला शिवापें ॥१७॥

सर्व वृत्तांत सांगीतला ॥ महेशासी कोप आला ॥ तंव मुखश्वासें जन्मला ॥ वीरभद्र ॥१८॥

पुढें वीरभद्रें तत्क्षणी ॥ स्वरोमकूपा पासोनी ॥ भूतगण उपजवोनी ॥ केला यज्ञविध्वंस ॥१९॥

मग देवऋषि प्रजापती ॥ वीरभद्रासि विनविती ॥ कीं आह्मी कायकरूं ते स्थिती ॥ सांगें बापा ॥१२०॥

येरू ह्मणे जगन्नाथे ॥ प्रेरिलें असें आह्मातें ॥ तरी संतोषवा तयातें ॥ शरण जावोनी ॥२१॥

ऐसें ऐकोनि त्यावेळां ॥ दक्ष स्तुति करुं लागला ॥ तंव महादेव प्रकटला ॥ अग्निकुंडांतुनी ॥२२॥

कर जोडोनि करी स्तुती ॥ वर मागे दक्षप्रजापती ॥ की माझी यज्ञसमाप्ती ॥ कीजे पूर्ण ॥२३॥

मग अष्टोत्तरशत ॥ नामें स्तविलीं ग्रथोक्त ॥ तेव्हां निवारलें समस्त ॥ विघ्न तयाचें ॥२४॥

यज्ञसिद्धीसि पावला ॥ ऐसा ज्वर उप्तन्न जाहला ॥ हा भेद दुजा निरूपिला ॥ पुराणांतरीचा ॥२५॥

हें दक्षयागविघ्वंसन ॥ तृतीय स्तबकीं असे संपुर्ण ॥ तें पुराणांतरमत जाण ॥ ह्मणे मधुकर कवी ॥२६॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ ज्वरोप्तत्तिकथनप्रकारू ॥ चतुर्दशाध्यायीं कथियेला ॥१२७॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबक चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP