मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय ९

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय ९

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ जन्मेजय ह्मणे हो मुनी ॥ सोमचरित्र ऐकिलें श्रवणीं ॥ आतां अग्रकथा मांडोनी ॥ सांगिजे जी ॥१॥

वैशंपायन ह्मणती भारता ॥ ऐकें पूर्वजांची कथा ॥ प्रीति सोमा आणि सुरनाथा ॥ वाढिन्नली थोर ॥२॥

परि पद्मदुहिते सहित ॥ स्वर्गाचि राहे नृपनाथ ॥ मग पुत्र जाहला विख्यात ॥ कालांतरीं ॥३॥

इंद्रादिक हंरिखले ॥ थोर महोत्साह केले ॥ निर्माल्ये ऋषि पूजिले ॥ केलें नामधारण ॥४॥

सोधोनि लग्नकाळ संबंध ॥ पुत्रा नांव ठेविलें बुध ॥ अभ्यास करी गुरुसंनिध ॥ सकलविद्या ॥५॥

मग समस्त परिवार ॥ तया वोळगें निरंतर ॥ लोकपाळासहित चौफेर ॥ जाय पारधी खेळावया ॥६॥

बुधासि सिकवी वज्रपाणी ॥ बारे न फिरावें अटव्यरानीं ॥ परि तो व्यसनभूत न मानी ॥ वचन कोणाचें ॥७॥

असो कोणे येके अवसरी ॥ सातक्षोणी वाद्यगजरीं ॥ निघाला मृगयेसि वनांतरीं ॥ सैन्यासहित ॥८॥

उत्तरदिशेसि खेळतां ॥ मृग येक देखिला अवचिता ॥ तो चालिला रानीं चवकता ॥ बुध पाठीं लागला ॥९॥

बुधासी होतसे शरसुटी ॥ परि मृग गेला गिरिकपाटीं ॥ येरु धांवतां न सोडी पाठी ॥ सैन्यासहित ॥१०॥

तंव चक्रपर्वतींचा राजा ॥ तोही व्याहळी खेळतां वोजा ॥ तेथें पातला नामें सुभुजा ॥ तेणें सोमात्मजा देखिलें ॥११॥

परदळ ह्मणोनि उठावले ॥ महमारीं प्रवर्तले ॥ तेणे बुधाचें दळ मोडलें ॥ तंव देखिलें पक्षिलें पक्षिराजा ॥१२॥

तयाची ख्याती असे विदित ॥ ह्मणोनि पळाला सैन्यासहित ॥ गेला चक्रपर्वताआंत ॥ वीरीं पर्वत वेढिला ॥१३॥

तेथें दुर्ग अवघड थोर ॥ काहीं नचलेचि प्रतीकार ॥ युद्ध होय निरंतर ॥ वीर पराभवले बुधाचे ॥१४॥

तेव्हा बाहिलें पक्षींद्रा ॥ ह्मणे कांही सांगिजे प्रतिकार ॥ पक्षि ह्मणे गा सोमकुमरा ॥ करुं सर्व लागी ॥१५॥

मग दळभार सन्नद जाहले ॥ सर्व लागीं झोंबिन्नले ॥ पक्षिराजे उड्डाण केलें ॥ गेला नगरांत ॥१६॥

सुभुज सैन्येंसिं उठावला ॥ थोर संग्राम वर्तला ॥ तंव पक्षिनायकें संहारिला ॥ परिवार तयाचा ॥१७॥

सुभुज धरिला पक्षींद्रें ॥ नगर विध्वंसिलें क्षणमात्रें ॥ मग बुधाजवळी वेगवत्तरें ॥ घेवोनि आला सुभुजासी ॥१८॥

बुध ह्मणे हा शरणागत ॥ ह्मणोनि सुभुजासि आलिंगित ॥ मग येरें पुसिला वृत्तांत ॥ कीं कोण तुह्मी स्वामिया ॥१९॥

तें सोमाचें सकळ चरित्र ॥ बुर्घे कथिलें सविस्तर ॥ आणी ह्मणे मी तयाचा कुमर ॥ आलो पारधीसी ॥२०॥

तंव हे जाहली व्यवस्था ॥ ऐसी सांगीतली समूलकथा ॥ मग संतोषोनि विनविता ॥ जाहला सुभुज ॥२१॥

ह्मणे तूं सत्कुळी सोमसुत ॥ तरी जा घेई चक्रपर्वत ॥ आणि होई माझा जामात ॥ वरीं कुमारिकेसी ॥२२॥

तेम माववलें सौमसुतां ॥ मग चंद्रपुतळी वरिली कांता ॥ शोभन जाहलें तें सांगतां ॥ पसरेल ग्रथ ॥२३॥

सुभुज राजा वधुवरेंसीं ॥ आनंदें आला अमरावतीसी ॥ मग भेटोनि इंद्रादिकांसी ॥ सकल वृत्तांत सांगितला ॥२४॥

इंद्रादिक संतोषले ॥ सोम निर्माल्य उल्हासले ॥ गजरीं वाधावणें लागलें ॥ अमरावतीसी ॥२५॥

हें बुधचरित्र संक्षेपता ॥ तुज कथिलें गा भारता ॥ चंद्रपुतलिका सोमसुता ॥ जोडली ऐसी ॥२६॥

मग अमरावतीसि निरंतरीं ॥ बुध नांदे सपरिवारीं ॥ तं व पुत्र जाहला काळांतरीं ॥ पुरुरवा नामें ॥२७॥

आनंद वर्तला अमरभुवनीं ॥ सोमवंश वाढला ह्मणोनी ॥ असो विद्यामात्र संपादोनी ॥ जाहला पूर्ण पुरूरवा ॥२८॥

जंव तो उपवरु जाहला ॥ तंव इद्रादिकां आनंद गमला ॥ मग विवाहो मेळविला ॥ पूर्वसंबंधें ॥२९॥

जोकां निर्माल्याचा कुमर ॥ निशंकु नामें महावीर ॥ तो नातु होय निर्धार ॥ देवेंद्राचा ॥३०॥

तयांची कुमरी सत्यवती ॥ ते दीधली पुरूरव्याप्रती ॥ वर्‍हाड करितसे सुरपती ॥ अतिजल्हासें ॥३१॥

सोम ह्मणे समस्तांसी ॥ आह्मां जाणें हस्तनापुरासी ॥ तंव सुरवर ह्मणती तयासी ॥ तुह्मी नव जावें ॥३२॥

बुधासहित सहकुटुंबे ॥ तुह्मीं स्वर्गभुवनीं रहावें ॥ पुरुरव्यासी पाठवावें ॥ हस्तनापुरीं ॥३३॥

ते सोमबुधांसि मानवलें ॥ मग पृथ्वीश सर्व संबोखिले ॥ पुरूरव्यासि दीधलें ॥ हाती तयांचे ॥३४॥

सत्यवती आणि पुरूरवा ॥ नमस्कारूनि सकळ देवां ॥ निघालीं भूपाळांसहित सर्वा ॥ भुमंडळासी ॥३५॥

वाजंत्रांच्या महागजरीं ॥ ब्रह्मांड गर्जिन्नलें थोरी ॥ मनीं दचकोनि त्रिपुरारी ॥ नारद झडकरी पाठविला ॥३६॥

येरें वृत्तांत आणोनि मनीं ॥ जावोनि कथिलें शुळपाणी ॥ जी पुरुरवा चालिला मेदिनीं ॥ ह्स्तनापुरीं बैसावया ॥३७॥

असो तो पुरूरवा सहदळीं ॥ उतरला मेरूचिये तळीं ॥ रात्रीं क्रमूनि प्रातःकाळीं ॥ चालिलें गजरें ॥३८॥

तंव हिमाचळ पावले ॥ पुरूरवसें मंत्रा जपिलें ॥ तेणें हिम वितळोनि गेलें ॥ शीघ्र आले सकळ ॥३९॥

ऐसे पावले हस्तनापुरी ॥ पुढें दूत पाठविले नगरीं ॥ त्यांहीं नागरिकां सविस्तरीं ॥ कळविलें वृत्त ॥४०॥

अवघे जनपद हरुषले ॥ नगरपताकीं श्रृंगारिलें ॥ रायाला गीं साउमे आले ॥ मग वंदिलें भूपाळां ॥४१॥

गजरें प्रवेशलें गनरीं ॥ वोंवाळिती नगरनारी ॥ तये संभ्रमाची भरोवरी ॥ परि कुसरी न वर्णवे ॥४२॥

यापरि भद्रीं बैसतां राजा ॥ आमंत्रोनि समस्त द्विजां ॥ ह्मणे मुहूर्त काढावा वोजा ॥ श्वेतवाहन प्रधान ॥४३॥

तैं कृतयुग संपलें ॥ आणि त्रेतायुग लागलें ॥ वैशाखशुद्धी प्रवेशलें ॥ तृतीयेसी ॥४४॥

त्रेयायुगाचे दिवस ॥ अतिक्रमले असती द्दादश ॥ पाडवा शुक्रवार विशेष ॥ चंद्रबळेंसी ॥४५॥

तिये दिवशीं प्रधानें ॥ बोलावोनि रायराणे ॥ केला पुरुरव्या कारणें ॥ राज्यभिषेक ॥४६॥

धनकण अश्वकुंजर ॥ नाना वस्तुअळंकार ॥ देवोनियां केले अभर ॥ परिवार आणि मागते ॥४७॥

समस्त राजे पांमकिले ॥ ते आपुलाले देशीं गेलें ॥ ऐसें पुरूरवें राज्य केलें ॥ भुमंडळीचें ॥४८॥

जन्मेजयासि ह्मणे वैशपायन ॥ पुरुरवा बैसला जैंहून ॥ वाढला सोमवंश तेंहून ॥ राया तुमचा ॥४९॥

येकछत्री पुरूरवा याणीं ॥ राज्य केलें ये मेदिनी ॥ तंव पुत्र जाहला नृपमणी ॥ सत्यवतीयेसी ॥५०॥

तो गव्य नामें प्रौढिवंत ॥ परिवार वोळंगे समस्त ॥ येकदा पारधीसि अरण्यांत ॥ गेला सहित सैन्येंसी ॥५१॥

तंव देखिला तडांग थोरु ॥ मग टाकोनि गेला वारू ॥ थदिये कौतुक पाहे स्थिरु ॥ जळदेवतांचें ॥५२॥

त्या नग्नाखेळती सातजणी ॥ ह्मणती ऐकें गा नृपमणी ॥ तुज प्रीती असेल मनीं ॥ तरी उडी जीवनीं घालिजे ॥५३॥

येरें तत्क्षणी उडी घातली ॥ तंव त्या घेवोनि गेल्या पाताळीं ॥ इकडे द्ळभार आला पाळीं ॥ सरोवरीचे ॥५४॥

त्यांहीं देखिली मोकळा वारू ॥ परि न दिसेचि राजकुमरु ॥ सैन्य पडिला विचारु ॥ काय रायासी सांगावें ॥५५॥

थोर हलकल्लोळ जाहला ॥ दूत पाठविले रायाजवळां ॥ त्याहीं वृत्तांत सांगतिला ॥ की गव्य बुडाला सरोवरीं ॥५६॥

तंव जन्मेजयो ह्मणे हो मुनीं ॥ सरोवरकथा आणिजे श्रवणीं ॥ ऋषी ह्मणे चित्त देवोनी ॥ ऐकें राया ॥५७॥

तो मानससरोवर पूर्वी ॥ वैकुंठीं होता स्वभावीं ॥ तैसीच मणिकर्णिका बरवी ॥ कैलासी होती ॥५८॥

तयांकारणें चतुर्मुखें ॥ तप केलें कोटिवरुषें ॥ मग आभारोनि त्र्यंबके ॥ दीधली दोन्ही ॥५९॥

ब्रह्मा ह्मणे जी शुळपाणी ॥ हीं दोन्हीं रत्‍नें मेदिनी ॥ वसवावीं करोनि करणीं ॥ जन उद्धरार्थ ॥६०॥

मग उभयासि ह्मणे पिनाकी ॥ तुह्मी वर्तावेम मृत्युलोकी ॥ येरी आज्ञा मनोनि हरिखीं ॥ जाहलीं येती ॥६१॥

ब्रह्मयासी ह्मणितलें शिवें ॥ तुज मानेल तेथ स्थापावें ॥ म्ग ब्रह्मा आला स्वभावें ॥ मेरूतळवटीं ॥६२॥

देखोनि समस्तळ मेदिनी ॥ सरोवरु कल्पिला मनीं ॥ तंव शतयोजनें धरणी ॥ भरली जळें पूर्ण ॥६३॥

मनापासोनि जन्म जाहलें ॥ ह्मणोनि मानससरोवर बोलिलें ॥ तंव जन्मेजयें आणिक विनविलें ॥ कीं कष्ट केले कं चतुर्मुखें ॥६४॥

वैशपायन ह्मणे जन्मेजया ॥ सकळतीर्थे ओळगती तया ॥ ह्मणोनि मानवां पवित्र कराया ॥ ब्रह्में आणिला मृत्युलोकी ॥६५॥

मग तेथोनि निघाली यमुना ॥ जियेचा महिमा नेणवे त्रिभुवना ॥ तियेसंगमीं स्थिरावली जाणा ॥ गंगा मंदाकिनी हे ॥६६॥

गुप्त सरस्वतीमिश्रित नीरीं ॥ ह्मणोनि आले त्रिपुरारी ॥ मग मणिकर्णिका झडकरी ॥ स्थापिली तेथें ॥६७॥

रम्य स्थळ देखोनि शंकरु ॥ तेथें राहिला सपरिवारू ॥ तो जाणोनि बडिवारु ॥ ओळंगती सर्व तीर्थे ॥६८॥

ब्रह्मा संतोषल देखोनी ॥ महिमा न वर्णवे चहूं वदनीं ॥ असो येणेंपरी आला मेदिनी ॥ पूण्यतडाग ॥६९॥

मेरूचिये उत्तर्दिशे ॥ कैलासगिरीचे पश्चिमे असे ॥ तेथें सरोवरू हा वसे ॥ तेपासहस्त्र योजनें ॥७०॥

हें भविष्योत्तरींचें मत ॥ परि रामायणीं संस्कृत ॥ कीं केदारापलीकडे सांगत ॥ तेहीं सत्य जाणावें ॥७१॥

तेथें कनकपक्षी हंसादिक ॥ दिव्यदेह होय स्पर्शिता उदक ॥ कनककमळीं शोभाधिक ॥ तो सरोवरु ॥७२॥

असो गव्यपुत्राचा वृत्तांत ॥ ऐकोनि पुरूरवा भयभीत ॥ गडवडां धरणीं लोळत ॥ अतिदुःखें करोनियां ॥७३॥

सत्यवती करी कोल्हाळ ॥ आंदोळला ब्रह्मगोळा ॥ मग सपरिवार भूपाळ ॥ गेला सरोवरासी ॥७४॥

सत्यवती गोत्रकुंटुंब ॥ करिताती आर्त शब्द ॥ तंव परिवार आला सन्निध ॥ गव्यासर्वेंचा ॥७५॥

ह्मणती कुमर नेला जळदेवतीं ॥ तंव विचार करीं भूपती ॥ कीं मरता तरी जळावरती ॥ तरत येता ॥७६॥

ह्मणोनि देवतीं नेला हा निर्धारू ॥ मग उपसों आदरिला सरोवरू ॥ तो आकांत वर्तला थोरु ॥ जळचरांसी ॥७७॥

तंव सरोवरु द्विज जाहला ॥ येवोनि रायापुढें ठेला ॥ देखतां पुरूरवा संतोषला नमस्कारिला ब्राह्मण ॥७८॥

ब्राह्मणे आशिर्वाद दिला ॥ होई पुत्रवंत गा भूपाळा ॥ तंव रायासि गहिंवर लोटला ॥ येरें पुसिला वृत्तांत ॥७९॥

मग तयासि सांगोनि समग्र ॥ ह्मणे आतां हें उपसीन नीरें ॥ तंव द्दीज बोलिला उत्तर ॥ कीं हें सरोवर अंगाध ॥८०॥

राया तूं नकरीं आंधी ॥ तुझा पुत्र आणीन स्वबुद्दीं ॥ रावो ह्मणे तरी त्रिशुद्धी ॥ नकरीं चिंता ॥८१॥

मग अदृष्ट जाहला ब्राह्मण ॥ जळदेवतांच्या स्थानीं जाउन ॥ ह्मणे कां आणिला नंदन ॥ पुरुरव्याचा ॥८२॥

येरी ह्मणती गा परियेसीं ॥ हा रंगला अष्टभोगांसी ॥ ह्मणोनि राहिला अहर्निशीं ॥ संगतीं आमुचे ॥८३॥

जन्मेजय ह्मणे हो मुनी ॥ गव्य कैसा होता जीवनीं ॥ मुनि ह्मणे चित्त देवोनी ॥ ऐकें राया ॥८४॥

त्या सप्त देवतांहीं तत्क्षणीं ॥ आपुलालें तेज काढोनी ॥ एकी निर्मिली नंदिनी ॥ ते दीघली गव्यासी ॥८५॥

तियेचें नाम संयोजिता ॥ तियेसि संभोग भोगितां ॥ पुरुरवा याचिये सुता ॥ क्रमले दिवस ॥८६॥

असो तेथें गव्य असतां ॥ द्विज जाहला बोलता ॥ ह्मणे आलसे तुझा पिता ॥ घात आमुचा करावया ॥८७॥

आतां घेवोनि हे सुंदर ॥ तूं चालें गा वेगत्तर ॥ अनर्थ मांडिला असे थोर ॥ तुझेन बापें ॥८८॥

मग सप्त अप्सरा दारासुत ॥ गव्य चालिला द्विजासहित ॥ येवोनि भेटला सहर्षित ॥ मातापितरां ॥८९॥

तेथ आनंद वर्तला थोर ॥ तो लिहितां होईल विस्तार ॥ मग अदृष्ट जाहला द्विजवर ॥ देवतेंसी ॥९०॥

असो पुरुरवें काय केलें ॥ वधुवरां पाटीं बैसविलें ॥ वर्‍हाड संभ्रमें केलें ॥ तेथेंचि देखा ॥९१॥

तया गव्यापासूनि कुमर ॥ जाहला अल्यु नामें नृपवर ॥ तो शौर्य वीर धीर ॥ महायोद्धा ॥९२॥

मग तें मानससरोवरींचें राज्य ॥ अल्यासीच दीधलें वोजें ॥ निशाणीं भूगोळ गाजे ॥ आनंदलें विश्व ॥९३॥

ऐसा मानससरोवर कथिला ॥ तेथें सोमवंश वाढिन्नला ॥ मग पुरुरवा दळेंसीं चालिला ॥ आपुले नगरीं ॥९४॥

सवें गव्य अल्यु कुमर ॥ जो सोमवंश राज्यधर ॥ निशाणांचा नाद थोर ॥ ब्राह्मंड गांजे ॥९५॥

प्रवेशले हस्तनापुरीं ॥ नगरीं श्रृंगारिली गुढियामखरीं ॥ आनंद जाहला नरनारीं ॥ राव परिवारीं नांदत ॥९६॥

अल्यु बैसतां सिंहासनीं ॥ परिवार वोळंगे नित्यानीं ॥ तंव जन्मेजय ह्मणे हो मुनी ॥ संदेह मनीं येक असे ॥९७॥

गव्य पिता असतां परियेसी ॥ कां पां राज्य दीधलें अल्यासी ॥ हे तरी अनीति सर्वाशीं ॥ नसे कोठें ॥९८॥

मुनि ह्मणे गा अवधारीं ॥ गव्य उपजला दुराचारी ॥ ऐसें पुरूरवा विचारी ॥ मनामाजी ॥९९॥

कीं हा स्त्रीलंपट अज्ञानी ॥ उडी घातली महाजीवनीं ॥ पारधी खेळतांचि वनीं ॥ जोडिला अपावो ॥१००॥

तरी यासी राज्य देतां ॥ हा दवडील सर्वथा ॥ ह्मणोनि दीधलें त्याचिये सुता ॥ पुरुख्यानें ॥१॥

तरीं भारता परियेसीं ॥ जो आसक्ता काममदेंसीं ॥ तो मुकलाचि जाण सर्वाशीं ॥ जगीं होय अपकीर्ती ॥२॥

आतां असो हे व्यवस्था ॥ अल्यु पुत्रासि राज्य करितां ॥ पुरुरवा जाहला विचारिता ॥ कीं करूं याचा विवाहो ॥३॥

चंपावती नामें नगरी ॥ तेथें काश्मीर रावो राज्य करी ॥ तयाची रुद्रसेना नामें कुमरी ॥ मेळवावी आल्यासी ॥४॥

मग चक्रेश्वर विप्रा पाचारिलें ॥ तयासि विवाहवॄत कथिलें ॥ परिवार देखोनि पाठविलें ॥ चंपावतीसी ॥५॥

येरू भेटोनि काश्मीरासी ॥ सकळ कथिलें तयासी ॥ येरू ऐकोनि जाहला संतोषी ॥ कीं सोमवंशींचा सोयरा ॥६॥

लग्नमुहूर्त निर्धारिला ॥ माघशुद्ध अष्टमीसि प्रतिष्टिला ॥ वस्त्रालंकारीं पामकिला ॥ चक्रेश्वर ब्राह्मण ॥७॥

तो येवोनि हस्तनापुरीं ॥ रायसि सांगे सविस्तरीं ॥ जी काश्मीरें दीधली कुमरी ॥ चला झडकरी लग्नासी ॥८॥

मग निशाणीं घावो दीधली ॥ अल्यु नोवरा श्रृंगारिला ॥ सर्वें गव्य पिता दीधला ॥ ऐसे चालिले द्ळभारें ॥९॥

तो सांगतां वर्‍हाडाविस्तारू ॥ वाढेल कथाकल्पतरु ॥ असो सैन्येंसि नृपवरु ॥ चालिलासे ॥११०॥

अकराक्षोणी रहंवर ॥ छत्तीसक्षोणी असिवार ॥ सात प्रयुतें कुंजर ॥ पायदळ चारीपद्में ॥११॥

सातशतें कुंजरांवरीं ॥ वाद्यें वाजती नाना परी ॥ निघाले सकळ सामुग्री ॥ सहित देखा ॥१२॥

तंव जन्मेजय ह्मणे हो मुनी ॥ सोमाची वाद्यें आठ क्षोणी ॥ तरी येथ कां जाहली उणीं ॥ पुरुरव्यासी ॥१३॥

मुनी ह्मणे ऐकें भूपती ॥ सोमासर्वें सकळ नृपती ॥ ह्मणोनि साठी क्षोणी गणती ॥ होती वाद्यांची ॥१४॥

ते देशोदेशींचे भूपाळ ॥ गेले आपुलालें स्थानीं सकळ ॥ ह्मणोनियां वाद्यें बहुळ ॥ उणीं जाहलीं ॥१५॥

असो हे गव्यादि झडकरी ॥ पातलें चंपावती नगरीं ॥ मग केली वर्‍हाडाची परी ॥ काश्मीरैश्वरें ॥१६॥

तो विवाहो सविस्तारें ॥ सांगतां कल्पतरु नावरे ॥ चारीदिवस आनंदगजरें ॥ जाहला देखा ॥१७॥

अल्युरुद्रसेना वधुवरें ॥ दोघें सुलक्षणीं सुंदरें ॥ वर्‍हाड जालिया अहेरें ॥ परस्पर पूजिले ॥१८॥

मग काश्मीरासि गव्य ह्मणे ॥ आतां आह्मासि आज्ञा देणें ॥ तंव येरु आदरमानें ॥ विनविता जाहला ॥१९॥

जी रुद्रसेनेसी पुत्र होय ॥ तंववरी रहावें स्वामियें ॥ तें मानोनि संवत्सर गव्य ॥ क्रमिता जाहला तेठायीं ॥१२०॥

मग रुद्रसेनेसि जाहला बाळ ॥ तेणें हरुषल गव्य भूपाळ ॥ उत्सवें नाम ठेविलें नळ ॥ त्या आत्मजासी ॥२१॥

गव्य ह्मणे काश्मीरासी ॥ आतां आज्ञा दीजे आह्मासी ॥ तंव राव ह्मणे नळ बाळासी ॥ मेळविणें नोवरी ॥२२॥

बर्‍हाड जालिया नंतरें ॥ बीजें कीजे सपरिवारें ॥ आणि योजिलें काश्मीरेश्वरें ॥ मनामाजी येक ॥२३॥

कीं कनकमेरू पुत्र आपुला ॥ तयाची कुमरी चकोरकमळा ॥ ते देऊं दौहीत्रा नळा ॥ ह्मणोनि मांडिला विवाहो ॥२४॥

वर्‍हाड जाहलें महोत्साहें ॥ तो सोहळां सांगतां नये ॥ मग आज्ञ घेवोनि गव्यरायें ॥ निघाला परिवारेंसी ॥२५॥

हस्तनापुरीं प्रवेशले ॥ समस्तां सुख जाहलें ॥ मग नगर श्रृंगारिलें ॥ भेटले परस्परें ॥२६॥

गव्यें अल्यें विचारिलें ॥ राज्य नळासी दीधलें ॥ आनंदभोज वर्तलें ॥ त्रैलोक्यासी ॥२७॥

चकोरकमळा सुंदरीं ॥ नळरावो राज्य करी ॥ केथा कैसी वर्तली पुढारीं ॥ तें सांगेल मधुरकवी ॥२८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ बुधादिनळचरित्रप्रकारू ॥ नवमोऽध्यायी कथियेला ॥२९॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP