श्री परशुराम माहात्म्य - अध्याय १३

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरामचंद्राय नमः ॥

जयजयाजी सद्गुरु भक्तजनींसी कल्पतरु सच्चिदानंदा लक्ष्मीवरु तारीतारी आह्मासीं ॥१॥

आपले अवतार विभूती सांगावें शिष्य भीष्मासी ह्मणती सांगीतल्या वांचूनि कैसी प्राप्ती तव कथांमृताची ॥२॥

तव कथामृत तप्तासी जीवित कलिदोष जात भीष्म ह्मणे ॥३॥

कथांमृत पाहूनि मुक्तीही त्यजोनी ऐकती ते मुनी सनकादिक ॥४॥

जरी दया असेल शिष्यावरी सकळ तरी तुह्मीं सांगाल भक्ताभिष्ट ॥५॥

तुझें नाम जरी रामकृष्ण हरी वाचेसी उच्चारी तोचि मुक्त ॥६॥

धर्म अर्थ काम अथवा निष्काम तयासी श्रीराम उदार ते ॥७॥

परशुराम अति संतोषीं सांगे आपुले अवतारासी कांही एक तें भीष्मासी सुविस्तारी इच्छेनें ॥८॥

आदौ यज्ञसु सूकर घेऊनि आअवतार मारिला असुर उत्धरिली क्षोणीते स्तविती तेव्हां ऋषीहि ते ससुर ॥९॥

रुची ऋषीची पत्‍नी अकुती तयापासूनि यज्ञ ह्मणती आवतार प्रख्यात त्रिजगतीं पुराणीं वर्णिला ॥१०॥

कदर्म देवहुती पासूनी कपिल ते आवतारुनी ॥ मातेसी उद्धारोनी **** राहिले ॥११॥

आत्रीपासूनि दत्त जाले ते प्रख्यात आवतार अद्भूत त्रिभुवनी ॥१२॥

सनकादिकी सन विभूती महान उद्धरिती जन ज्ञानामृतें ॥१३॥

मूर्ति पतीधर्म तेथोनि अवतार नारायण नर यशस्वीते ॥१४॥

उद्धरिला ध्रुव होऊनि वासुदेव पद तें अढळत्व दिल्हें त्यासी ॥१५॥

पृथू अवतारुनी भूमी दुहउनी मनोरथ केलेनी सकळांचे ॥१६॥

गुरुपीठा कारण हंसते परम तत्वोपदेश काम आवतारतो ॥१७॥

हयग्रीव नामें दैत्यासि वधोन नासिके निगम उत्धरीले ॥१८॥

मत्स्य जाले शुद्ध ॥ मनूसी ते लुब्ध मुनी ही नानाविध प्रळयीं रक्षिले ॥१९॥

समुद्र मंथन असुर सुमने केले तेव्हां महान कूर्मरुप ॥२०॥

नरसिंह रुपें प्रल्हादाच्या कृपे क्रोधतो नाटोपे दैत्यावरचा ॥२१॥

दैत्य तो मारुनी प्रल्हाद रक्षूनी साधूची या ध्यानीं राहिले ते ॥२२॥

अवतार श्रीहरी गजेंद्र उत्धारी संकटें निवारी स्वभक्तांचीं ॥२३॥

बळीचिया द्वारीं उदकतें करीं घेऊनी पदहारी इंद्राचे तें ॥२४॥

देऊनी इंद्रासी बळीचा द्वारासी गुप्त भरवसी ॥ अद्यापी ते ॥२५॥

जाले श्रीनिवास अवतार महिदास कृपेनें ज्ञानास विस्तारीलें ॥२६॥

राजराजेश्वर व्यापी आवतार निग्रहिले वीर दुष्ट साचे॥२७॥

स्वयमेव हरी जाले धनवंतरी सर्व रोग निवारी स्वऔषधें ॥२८॥

औषध प्रख्यात अच्युत अनंत गोविंद अमृत सत्य ह्मणे ॥२९॥

दुष्ट ते क्षत्रिय तयासी नाशय धरिलें हें काय विप्राचे मी ॥३०॥

दशरथा घरीं जाले रावणारी तेव्हां राज्यकरी अपूर्व ते ॥३१॥

हनुमंत प्रिय सिताराम काय दुरितनाशाय स्मराआधीं ॥३२॥

अवतारपूर्ण ध्यानीय श्रीराम ध्यातो मोक्षकाम चंद्रमौळी ॥३३॥

वसुदेवा घरीं प्रगटले हरी जाले ते कैवारी पांडवांचे ॥३४॥

तयाचें कीर्तन असे तें महान योगीयांसी ध्यान तेंचि सत्य ॥३५॥

भगवद्गीता ज्ञान सत्य सुधापान गृहीता अर्जुन काय वर्णूं ॥३६॥

बळाचा तो राशी बळ नाम त्यासीं वदतां पापासी जाळीतसे ॥३७॥

कलियुगीं बौध्य आपण निद्रिस्त परी भक्तार्थ समस्त देत असे ॥३८॥

कलंकी ते उभे अश्‍वाची या सभे आपुलीया प्रभे दुष्टनाशी ॥३९॥

आपुले आवतार सांगे फरशूधर अनंत अपार भीष्म ह्मणे ॥४०॥

माझीया विभूती वर्णनाची शक्ती नसे मज निश्चिती काय सांगूं ॥४१॥

भूमी रजः कण मोजीतो आपण परी अवतार प्रमाण मीही न करी ॥४२॥

अनंत वीभूती अनंत त्या शक्ती गुणाची ती मिती अनंतची ॥४३॥

ह्मणूनी अनंत पुरुष अच्युत ह्मणती साधुसंत सनकादीक ॥४४॥

जैशा माझ्यामूर्ती योगीजन ध्याती तैसी त्या प्रचीती सत्य सत्य ॥४५॥

जैसें एक सुवर्ण अनेक होती अलंकार गुण तैसे ईश अवतीर्ण परी चिद्रुप एकची ॥४६॥

मनोमयमूर्ती जे स्थिर करिती सिद्धी त्यांसी पावती अणिमादिक ॥४७॥

तो ईश ऐश्‍वर्य जाणतो षड्‌चक्राचा भेद करितो मृत्यूसी जिंकितो सहज पैं ॥४८॥

आदौपुर कुंभक रेचक प्राणायाम करा अनेक त्‍हृदयीं ध्यावा देव एक दाता सर्व सित्धींचा ॥४९॥

शुद्ध मानस सरोवर तेथें विज्ञानोदय दिनकर तेणें प्रफुल्ल त्‍हृत्कमल सुखासन कल्पावें ॥५०॥

चार्वायत चतुर्बाहू सुजात रुचिरानन आहू पद्मपलाशाक्ष पाहूं सुंदर भूसुनासिक ॥५१॥

सुद्विज सुकपोल दिसे सम कर्ण कुंडल प्रीती प्रहसीत कोमल कुरळ केश शोभती ॥५२॥

पद्म केसरा परी अंबर मेखला वलय नृपुर ॥ किरीट कुंडलें तेजाकार अपादले बिनी वनमाळा ॥५३॥

आणीक माळा वैजयंती शंख चक्र गदा पद्म हातीं वक्ष स्थळीं श्रीवत्स ह्मणती कंठीं कौस्तुभ विराजे ॥५४॥

स्कंध असती सिंहापरी वाम स्तनस्थलापरी लक्ष्मी राहे रेखेसरी सुवर्णाचिया ॥५५॥

खोल असे नाभी विवर वलिमत् पल्लवोदर समचरण शोभा अपार नखें नक्षत्रेंचि पैं ॥५६॥

स्निग्ध घनःशाम विग्रह सर्व सौंदर्य संग्रह श्रीभूदुर्गेच्यासह अनुपम विराजे ॥५७॥

हें प्रियतम सूक्ष्म रुपाचें ध्यान सर्वेंद्रिय गुणासी अंजन सर्वमाया दुःखासी भंजन पाविजे ध्यायिल्या ॥५८॥

हें सूक्ष्म रुपचि ध्यानीय जेणें भक्ति योग अभय आत्मशुद्धीसी उपाय स्वधर्मनिष्ठ निष्ठासी ॥५९॥

केशवादि प्रतिमेचें दर्शन पूजास्तुती अभिवंदन सर्वांभूतीं मद्भावन सत्यत्व आणि वैराग्यें ॥६०॥

महानाविषयीं बहूमान ॥ हीनाविषयीं करुण आप्ल्या समत्वीं मैत्री करुन द्वेषियांसी उदासीन असावें ॥६१॥

नवविधा भक्तीचें सेवन ईशावतारीं ऐक्यावलोकन अहंकृती रहीत दास्य जाण पूर्ण मद्धर्म आचरावे ॥६२॥

सर्व देही यांसी दुर्लभ निष्ठावंतासी सुलभ कुयोगियां अलाभ हा भक्ती योग ॥६३॥

जयां भक्तियोगें ईशकृपा तया काय असे दुरापा तरी हरी चरणीं दास्य तपा पुनः पुनः इच्छितीते ॥६४॥

तेथेंचि नसे मृत्यु व्याल कीं गरुडसेवीत पादमूल तत्र प्राप्त जालिया सकळ इच्छीत पावती ॥६५॥

भक्तिज्ञान प्राप्त्यर्थ सत्संग तोचि करावा अभंग तेणें पाविजे वैराग्य सांग यदर्थीं संशय नाहीं ॥६६॥

इहलोकीं करोनि सत्संग अज्ञान संशय करावा भंग निर्मळ करोनि अंतरंग प्रसन्न मन होइजे ॥६७॥

प्रसन्न मन जालियावरी ध्यान योगें आकळावा हरी तेथें शीर ठेऊनि चरणावरी तन्मय व्हावें ॥६८॥

हा भक्तियोग ज्ञानयोग पूर्वीं सांगितला विभूती योग ऐकतां करी दुःख बंध त्याग पूर्ण भक्ती पाविजे ॥६९॥

आता परम गुत्द्य तत्वज्ञान माझिया विज्ञानें परिपूर्ण तें अतिसुबोध जाण सांगतों मीं ॥७०॥

तत्व शब्द दोन ठिकाणीं वस्तु विशेषाला रुढि वाचकांनीं आणि ज्ञानार्थ बोलिला वेदानी जीवजे त्यास ॥७१॥

तो कसा परीस कीं त्याचा तूं आहेस तन्मय आहेस तेव्हां सत्धर्मानें हरिपदीं ये ॥७२॥

जितुकीं रुपें आणि भाव जयाहूनि ह्मणती वासुदेव तेचि तत्वज्ञान सर्व ममानुग्रहें तुज असो ॥७३॥

ऐसी ऐकतां श्रीरामवाणी कृतार्थ ह्मणे तो भीष्मगुणी प्रश्न करी अति संतोषोनीं नमोनियां चरणासी ॥७४॥

जरी पात्र आपुल्या कृपेस तरी सांगा मज विशेष जो नित्य अवश्य ब्राह्मणास पूजा योग तो ॥७५॥

परशुराम चरित्र कामधेनू दोग्धा भीष्म काय वर्णूं तें ऐकतां प्रसन्न तनू होय स्थीर ॥७६॥

पुढें कथा होय सुरस ऐका श्रोते स्वस्थ मानस नम नमी भार्गवास करोनियां सांगतों ॥७७॥

स्वस्तीश्री परशुराम विजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु त्रयोदशोध्याय गोड हा ॥१३॥श्रीपरशुरामार्पण मस्तु॥शुभं भवतु॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP