श्री परशुराम माहात्म्य - अध्याय २

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरामचंद्राय नमः ॥

आर्या ॥ श्रीवासुदेवचरणी ॥ ठेउनि मस्तक ह्मणेन मी शरणी ॥

झालों तुमच्या स्मरणीं ॥ सेउनि तव भक्ति करि नमी करणी ॥१॥

तुमचे करीन सत्कथन ॥ भगवद्गुण पूर्ण जसा सुधासिंधू ॥

वर्णिती ब्रह्मादिकजन ॥ लक्ष्मीवर म्हणती सुजन बंधू ॥२॥

ओव्या ॥ वेदव्यास शिष्य सुमती महाज्ञानी सूताप्रती नैमिषी शौनकादिख्याती प्रश्न करिती अपूर्वकथा ॥३॥

व्यास शीष्या महाप्राज्ञा अहो सूता अह्मा आज्ञा सांगीतल्या पुराण संज्ञा परी नोहे संतोष ॥४॥

अंह्मा गुह्य विज्ञान कथा आतां सांगा **** संथा जैसी सीतार्दितासी कंथा ब्रह्मवार्ता तैसी द्यावी ॥५॥

अज्ञान सागरीं बुडणारासी तारु चि आलासी अह्मासी देउनि गौप्य ज्ञान नौकेसी परतीरी नेइजे ॥६॥

पूर्वी वेदांची केली व्यवस्था व्यासनाम पावले स्वस्था यासाठीं केली आस्था ॥ अवतारुनि ईश्‍वरानी ॥७॥

वाटीले वेदऋषीसी पंचमदिला वैशंपायनासी ॥ छतीस दिली तुजसी द्वादशास मुख्य तत्व ॥८॥

व्यासें सांगीतले तूसी साद्यंत भक्तितत्वासी गौप्य ह्मणून तव कर्णेसी ऐसें सूता ऐकिलें ॥९॥

मुख्य ज्ञान वेदपुराणीं भक्तिविना न जाणती कोणी तूंचि तत्वज्ञ भक्तगुणी व्यासप्रसादें विस्तारिशी ॥१०॥

भक्तासी सांग तत्वासी तूसी आज्ञा आहे ऐसी ह्मणून व्यासपीठासी दिलें तुह्मा पौराणिका ॥११॥

ऐकोन मुनींचीं वचनें महाभक्त संतुष्ट मने बोले तो सूत भक्तीनें व्यास चरणीं नमोनी ॥१२॥

धन्य धन्य तुमची वाणी ऐसें न विचारिलें कोणी तुम्हां सांगेन गौप्यवाणी ॥ वेदीं पुराणीं आहेती ॥१३॥

वेदादिकांचे अर्थ त्रिविध सात्विकादि नानाविध सोहंदासोहं द्विविध बलिष्ट मार्ग दोनचि ॥१४॥

तामस मार्गाचें लक्षण नव्हे परब्रह्म लक्ष्मी रमण ऐशा ज्ञानें ब्रह्माचेही जाण शिर कापिलें मन्युजानें ॥१५॥

सात्विक मार्गाचीं लक्षणें मी नारायणाचा दास ह्मणणें भजन पूजन भक्तीनें करणें ऐशा ज्ञानें मुक्त्यादिक ॥१६॥

रजोगुणार्थ निश्चित नोहे प्रंपच केवळ मुख्य आहे ॥ आहे तों खावें भोगावेंहें कोण पाहे मेल्यावर ॥१७॥

ज्याला नाहीं ज्ञानाज्ञान कुळीं पडलें जैसें साधन आमुचे हेंचि मुख्य निधान दुसर्‍याचें ज्ञान काय आह्मां ॥१८॥

ऐसे अर्थ त्रिविध जाणा मुख्यार्थ नकळे कोणा सात्विक भक्तिज्ञान गहना वैष्णवा वांचोनि न जाणिती ॥१९॥

पुढें केली फार दुष्ट त्यांत भक्तांसी बहुत कष्ट ह्मणून भक्त्या भजनें संतुष्ट कलौपुण्य अनंत असे ॥२०॥

जैसी असे ग्रहण पर्वणी तेव्हां कैसी पुण्यखाणी तैसें कलिपर्वी पुण्यकरणी परंतु नसे तात्काळ सिद्धी ॥२१॥

दुराचरण करती त्यांसी धनमिळे थोड्या सायासी अत्मायू पापी मरणासी पावतील पुण्यहीन ॥२२॥

लौकिकार्थ कांहीं नेमधर्म लोकांचें काढिती वर्म भक्तीनें न करिती कर्म कैसी सित्धी पावेल ॥२३॥

कांहीं भक्त यथार्थ भजनपूजन परमार्थ त्यांसी न होय प्रपंचार्थ कलि प्रभाव ऐसा असे ॥२४॥

ब्राह्मणांचा कर्ममार्ग एक भक्तिमार्ग असती अनेक वादी त्यांत होती मूक परस्पर भांडोनियां ॥२५॥

पूर्वीं तत्वज्ञ ऋषींनीं मुख्य कोण शोधिला मनीं वैष्णव मार्ग वरिष्ठ पाहोनी ब्रह्मकर्मी योजिला ॥२६॥

सोहं भावाचे मार्ग दुष्ट त्यांत नसे भक्ति वरिष्ठ दासोहं यांत भक्तिसुष्ट ह्मणूनि भक्तियुक्त सेवावा ॥२७॥

वैष्णवां वांचोनि जी भक्ती त्यांसी न होय कदा मुक्ती या करितां सन्मार्ग सक्ती करावी हीतेच्छुनी ॥२८॥

दासोहं यांत एक ब्रह्मेशादी ज्याचे सेवक तोस्वतंत्र जीव परतंत्रक ऐसा भेद अखंड ॥२९॥

तो सर्वदा चिदानंदमय मुक्तींत जीव आनंदमय मुक्ति विना हे द्विधामय सर्वजीव असती ॥३०॥

सज्जीवानी एक सेवन जेणें होय मुक्ति साधन ब्रह्मकर्म भजन पूजन अहंभाव त्यजूनि करावें ॥३१॥

भक्तीवांचूनि वेदांत त्यासी नकळे निर्णयांत तेभवाब्धींत बुडत अनी‍श्‍वर वादीते ॥३२॥

दासोहं सोहं हे दोन अहेत देव दैत्यांपासून याचि कारणानें उत्पन्न परीक्षार्थ सत्ताऽसत्ता ॥३३॥

दासोहं हा सज्जनपक्ष सोहं असे असत्यक्ष सज्जनांनीं सद्भक्तिलक्ष करावें सर्वदां ॥३४॥

हरिकथा मृत श्रवण भूततत्वाचें विचारण आणि ध्यान योगाभ्यासन हे अवश्य होय ॥३५॥

अनन्यभावें विष्णुभक्ति करु नये मिश्रसक्ति अर्पूनि करावी मुक्ति घेऊनि तीर्थत्रिवार ॥३६॥

विष्णू वांचूनि नैवेद्य खाऊन येकदाप्रज्ञ सप्तजन्म श्‍वान सत्य अन्यदेव नैवेद्यानें ॥३७॥

शाल ग्रामासी निवेदित खावें द्विजांनीं सतत मिश्र प्रतिमासीं अर्पित शिवस्व होतें निःसंशय ॥३८॥

भोजनानंतर अर्पितदल भक्षणें आचमन फळ चांद्रायणाचें पुण्यसकळ होय त्यासी निश्चयें ॥३९॥

आतां सांगेन मुख्य गोष्ठ गृहीं असावींच हीं षष्ठ यासम नसे लोकीं वरिष्ठ ब्राह्मणांसीं पाहिजेत हीं ॥४०॥

शिला शंख गोपीचंदन द्वारका चक्र तुलासीवन पुरुष सूक्त गायत्रीसमान सहा मुख्य ब्राह्मणांला ॥४१॥

ब्राह्मनासी पंचतिलक जलमृत्तिका गंध सुवासीक कुंकुमोपरी भस्म तिलक ऐसें चिन्ह द्विजाचें ॥४२॥

असा हा मार्ग ज्ञानाचा सद्गुरुवांचोनि न कळे साचा व्यासप्रसादें निरोपिला वेचा आणीक काय तुह्मां सांगूं ॥४३॥

ऐसे पूर्वीं शिवापासुनी मुख्य ज्ञानधर्म नारदमुनी ऐकोनि जाला धन्य मनीं सूतें सांगीतलेंतें ऋषीसी ॥४४॥

ज्यासी असे नियम ज्ञान त्यासी क्षमादिक गुण त्याला होती योगादि साधन त्यासीच अंतीं ब्रह्मपद ॥४५॥

ईश्‍वर एकवर्णनीय अन्य वर्णनीं फळ काय वर्णावा एक निरामय श्रीहरी ॥४६॥

भू जेव्हां दुष्टें व्यापित तेव्हां ब्रह्माविष्णूसी स्तवित भवेंद्रादि सहित स्त्रवोनी प्रसादिले ॥४७॥

प्रगट होवोनि लक्ष्मीवर केला असे अभयकर ह्मणती नाशाय भूभार अवतारु धरुं ॥४८॥

ऐसें बोलोनि नारायण कराया शरणांगत रक्षण अवतार धरिला जो परशूराम तें चरित्र वर्णितों ॥४९॥

चरित्र हें भाविकांनीं सेवन करावें सुमनीं यथामती कौतुकेनी ईश्‍वर कथांमृत वर्णितों ॥५१॥

उत्तम परशुराम चरीत्र श्रवणें होती कर्णपवित्र सूतशौनकादि याचें सत्र प्रख्यात असे नैमिषीं ॥५२॥

हें परशुराम चरित्र केलें अमृताचें सत्र तृप्त व्हा श्रोते पवित्र सावधान परिसीजे ॥५३॥

स्वस्तीश्री परशुराम विजय कल्पतरु वर्णितां महात्म्य आपारु ऐकतां निःपाप होती नरु ॥

द्वितीयोध्याय गोड हा ॥२॥श्रीपरशुरामार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP