मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
तूं कसा हरीरे गोकुळांत अव...

भक्ति गीत कल्पतरू - तूं कसा हरीरे गोकुळांत अव...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


तूं कसा हरीरे गोकुळांत अवतरला ।

त्या गोपाळांच्या संगे प्रेमें रमला ॥धृ०॥

किती भाग्य गोपींचे सहज झाली त्या प्राप्ती ।

परब्रम्ह खेळाया रात्रंदिवस त्या हातीं ।

त्या प्रेमभराने नाचुनी गाउनि रमती ।

ते चुंबन घेउनि स्वानंदित त्या होती ॥चाल॥

किती सुंदर रुप तें दिसें मनोहर ।

पाहतां भुलती नारी आणि नर ॥चा.पू.॥

आजवरी रुप हें दाखविलें न कोणाला ।

पाहतां मदन तो मोहुनिया हो गेला ।तूं कसा० ॥१॥

ऐकतां भागवतीं तुझे रे पोवाडे ।

ते ऐकुनि प्रेमळ भक्त होतीरे वेडे ।

तव गुण ऐकुनी प्रेम अंतरीं वाढें ।

त्यामुळे वृत्तीला वस्तु दुजी नावडे ॥चाल॥

तव विरहाने ती झाली व्याकुळ ।

तूं गेलास सोडुनी जेव्हा गोकुळ ॥चा.पू.॥

त्या वेळीं जैसे झालें हो गोपीनला ।

त्या परी वृत्ती ही आवरेना हो मजला ।तूं कसा० ॥२॥

तूं धाउनि येई आता बा सत्वरी ।

तव विरह होईना सहन आता क्षणभरी ।

तूं जाऊन बसला सांग कुठे श्रीहरी ।

तुज मोहियलें कां राधेने कुंजविहारी ॥चाल॥

तो पाश जबर असे राधेचा ।

त्या पुढे पाड तो काय आमुचा ॥चा.पू.॥

परी दीनदयाळु म्हणती रे तुजला ।

म्हणे वारी अनन्य शरण मी हरीपद कमला ।तूं कसा० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP