मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
आनंदाचा कंद हरी हा । हृदय...

भक्ति गीत कल्पतरू - आनंदाचा कंद हरी हा । हृदय...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


आनंदाचा कंद हरी हा । हृदय मंदिरीं पाहिला ॥

अस्ति भाती प्रिय जो आत्मा । सद्‌गुरुनी मज दाविला ॥धृ०॥

स्थूल सूक्ष्म कारण टाकुनी । माहाकारणी राहिला ।

सद्‌गुरुकृपें अंजन लेवुनी । स्वयंप्रकाशीत देखीला । आनंदाचा कंद० ॥१॥

पंचकोशांतीत असुनी । अंतर बाह्य व्यापला ।

भक्‍ताचीया प्रेमासाठी । सगुण सुंदर तो झाला । आनंदाचा कंद० ॥२॥

सत्‌चित सुखमय अखंड अद्वय । वेद श्रुतीने गायीला ।

सद्‌गुरुकृपें वारी म्हणे मी । अखंड हृदयीं ध्यायीला । आनंदाचा कंद० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP